टोलनाक्यावर...
लेखनप्रकार
मी टोलनाक्यावर उभा असतो.
हौसेने नाही राहात.
टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब.
मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभा असतो.
..
तसा मी ब्राह्मणाचा.
अण्णाआईसोबत चांगला होतो.
अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत.
आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत.
मोहरी करपली, तडतड थांबली..
मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं.
अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर.
मग वर्षं वर्षं.
एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली.. आणि गेले निघून.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या जिवाच्या वर्षामागून वर्षं..
आईच्या जिवावर..
अन नानांच्या..
अण्णा गेले अन नाना आले.
आईच्या मदतीला खूप जण पैदा झाले एकदम..
नानांनीच आईसमोर शाळा घेतली माझी.. ताळ्यावर ये म्हणे. गाव सोड म्हणे. शिक्षण नाही म्हणे.. शिपाई म्हणूनही लायकी नाही म्हणे.
नानांनीच लावला टोलनाक्यावर.
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
..
दिवसभर टोलनाक्यावर मी उभा असतो.
रापरापून कातडीचा बामणपणा कंप्लीट गेलाय.
मला कलेक्शनला पण नाही उभे करत.
लायकी नाही माझी... नाना म्हणालेले तशी.
मी फक्त उभा राहतो. बूथपासून लांब. दबा धरुन.
टोल चुकवून पळणार्या गाडीला कोलदांडा घालायला.
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
दिवसात एकतरी माजुरडा भेटतो.
कोणाकोणाची नावं सांगून टोलऐवजी कचाकचाकचा बडबडत राहतो.
कलेक्शनवाले त्याच्यावर चढतात.
मी कोलदांडा काढत नाही.
मागून अडकलेल्या गाड्यांच्या केकाटण्याचा जोर मिन्टामिन्टाला डब्बल होत असतो.
मला काम मिळाल्याचा आनंद असतो.
शेवटी त्याने नोटा भिरकावल्या की मी कोलदांडा काढतो.
अस्सा माजुरडा दोन दिवस भेटला नाही तर नोकरीची चिंता लागते..
पायाचे नळ आणखीन दुखतात. कंटाळा येतो.
उन्हात जळत मी टोलनाक्यावर उभा असतो.
टोल भरताना दरेक गाडीची खिडकी उघडते अन माझ्यापर्यंत पोचेस्तो बंद होते.
वर सरकणार्या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
त्या बंद होणार्या काचेतून मधेच दिसतो एक गोर्या गोर्या छातीचा तुकडा. आणि त्यात एक घळ.
पायातली ताकद एकदम जाते.
पण कोलदांडा पकडून मी उभाच असतो.
दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभाच असतो.
......
वाचने
18519
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
अस्वस्थ केलत.
द्येवा... __/\__!!
In reply to द्येवा... __/\__!! by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
ह्म्म !!
जबरदस्त!
अगदी!
In reply to अगदी! by पैसा
अगदी अगदी.
In reply to अगदी अगदी. by धन्या
धन्या, गवि आणि इतर
In reply to धन्या, गवि आणि इतर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्या, गवि आणि इतर
In reply to धन्या, गवि आणि इतर by धन्या
सेम हीअर
In reply to धन्या, गवि आणि इतर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माहित नाही
In reply to माहित नाही by पैसा
सहमत...
In reply to माहित नाही by पैसा
या नाक्यावरच्या मुलाला त्या
In reply to माहित नाही by पैसा
या नाक्यावरच्या मुलाला त्या
In reply to माहित नाही by पैसा
पैसे उपलब्ध करून देणे आणि
लेखनशैली गविष्टाईल!
In reply to लेखनशैली गविष्टाईल! by रेवती
+++१११
एक मोठ्ठा ____/\_____
In reply to एक मोठ्ठा ____/\_____ by वेल्लाभट
+१
हम्म
हम्म
छान!
जबरा
अप्रतिम
छान...
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
सुरेख !जातीय 'टच' देण्याचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pareshaan IshaqzaadeIn reply to सुरेख !जातीय 'टच' देण्याचा by मदनबाण
जातीय 'टच' देण्याचा मोह का
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
जातीय 'टच' देण्याचा मोह का
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
जातीय टच देण्याचा मोह नव्हे.
In reply to जातीय टच देण्याचा मोह नव्हे. by गवि
इतरत्रही दिसून येतं.
In reply to इतरत्रही दिसून येतं. by प्रभाकर पेठकर
खानदानी मराठा दाखवला असता तरी
In reply to खानदानी मराठा दाखवला असता तरी by गवि
प्रत्येकाची मते....
In reply to प्रत्येकाची मते.... by प्रभाकर पेठकर
मूळ भाव पोचला..
In reply to खानदानी मराठा दाखवला असता तरी by गवि
उच्चवर्णिय....
In reply to उच्चवर्णिय.... by प्रभाकर पेठकर
पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही
In reply to पण फक्त ब्राह्मणांमध्ये नाही by बाळ सप्रे
??
In reply to जातीय टच देण्याचा मोह नव्हे. by गवि
नको नको नको. धाग्याचा विस्फोट
In reply to छान... by प्रभाकर पेठकर
जातीय 'टच' देण न देण हे
एक जबरदस्त चटका लावणारा लेख..
जातीय 'टच' देण्याचा मोह का
मनाला भिड्ला !!!
खरोखरच दंडवत
....अगदी नेहमीप्रमाणे परिणामकारक उत्तम लेख....!!
पाचगणीमध्ये रहायला असताना अशा
In reply to पाचगणीमध्ये रहायला असताना अशा by प्यारे१
थोडक्यात म्हणजे तुम्ही
In reply to थोडक्यात म्हणजे तुम्ही by काळा पहाड
शिकायला असणं वेगळं तुम्ही
कडवट
आवडले..
गवि...
गवि जातीयतेच्या टच संदर्भात
.....वास्तव.
कसली जात लावुन बसलाय.
In reply to कसली जात लावुन बसलाय. by बाबा पाटील
सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं
In reply to सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं by बाळ सप्रे
लेखनस्वातंत्र्य.
In reply to सर्वांनी खाउन पिउन सुखी असावं by बाळ सप्रे
+१
वास्तव!
मस्त!
In reply to मस्त! by दादा कोंडके
काय झालय तरी काय मला?!
In reply to मस्त! by दादा कोंडके
उलट बामनाची पोरं काय नापास
आवडले.
सुरेख!
भयाण परिस्थिती
In reply to भयाण परिस्थिती by आयुर्हित
३)
In reply to ३) by प्रभाकर पेठकर
असमाधानी रहा!
सुरेख
माझ्या मते कवींनी एकदा अशी
ही
कळ
लेखन आवडलं. अगदी मोजक्या