✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणेश उत्सव २०१४ भाग १

म
मदनबाण यांनी
Sat, 08/23/2014 - 14:14  ·  लेख
लेख
मंडळी गणपती उत्सव आता काही दिवसांवरच येउन पोहचला आहे. :) मूर्तीकार मूर्त्यांचे काम करण्यात मग्न आहेत, आणि विविध गणपती घरी पोहचण्याच्या आधी बाप्पाची काही विविध रुपे मी टिपली आहेत. :) वेळ मिळाल्यास उत्सवातील बाप्पा टिपायची इच्छा आहे,तसे झाल्यास भाग २ सुद्धा येइल. रंगकामात मग्न मूर्तीकार G1 G2 G3 G4 G5 G6 या वेळी झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेतील खंडेरायांच्या रुपातील गणेश मूर्तीला विशेष मागणी आहे. रंगकाम होण्याच्या आधी खंडेरायाच्या रुपातील गणपती बाप्पा. :) G7 यळकोट यळकोट जय मल्हार ! :) रंगकाम पूर्ण झाले आहे,फक्त रंगीबेरंगी खडे लावायचे काम तेव्हढे बाकी आहे. :) G8 {हौशी फोटुग्राफर} :)

मदनबाण.....

कॅमेरा :- निकॉन डी-५१०० * रॉ-प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
  • गणेश उत्सव २०१४ भाग २

Book traversal links for गणेश उत्सव २०१४ भाग १

  • गणेश उत्सव २०१४ भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12382 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

वा

इरसाल
Sat, 08/23/2014 - 14:30 नवीन
छान, अप्रतिम काही उतरवुन घ्यावे म्हणतो.
  • Log in or register to post comments

वाह !

सस्नेह
Sat, 08/23/2014 - 14:53 नवीन
सर्वच बापा कसे सुंदर आहेत ! त्यातल्यात्यात पहिले पाच तर अप्रतिम ! पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ?
  • Log in or register to post comments

पण सगळ्या मूर्ती जरा

मदनबाण
Sat, 08/23/2014 - 19:50 नवीन
पण सगळ्या मूर्ती जरा लंबुळक्या का दिसताहेत बरं ? ह्म्म...मला तर तसं नाही वाटत की फोटोच्या लांबी-रुंदीची थोडी इकडे-तिकडे केली तर अजुन नीट दिसेल बहुधा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... ;) :- Har Dil Jo Pyaar Karega
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सुंदर आहेत सगळ्या मूर्ती. आता

कवितानागेश
Sat, 08/23/2014 - 15:13 नवीन
सुंदर आहेत सगळ्या मूर्ती. आता कसं खरंच गणपती येतायत असं वाटतय... :)
  • Log in or register to post comments

येकच णंबर !

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/23/2014 - 15:33 नवीन
येकच णंबर !
  • Log in or register to post comments

जबरदस्त मस्त फोटु आहेत.

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/23/2014 - 17:17 नवीन
जबरदस्त मस्त फोटु आहेत. पैजारबुवा
  • Log in or register to post comments

कलाकार आहेत ही मुर्तीकार

किसन शिंदे
Sat, 08/23/2014 - 20:30 नवीन
कलाकार आहेत ही मुर्तीकार मंडळी. फोटो आवडले नेहमीप्रमाणेच.!
  • Log in or register to post comments

सुंदर.

प्रभाकर पेठकर
Sat, 08/23/2014 - 20:45 नवीन
दागदागिन्यांनी जखडलेल्या मूर्तींपेक्षा ६ क्रमांकाची साधी आणि सोज्वळ मूर्ती जास्त आवडली. बिन रंगविलेला खंडेराय आणि रंगविलेला खंडेराय ह्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत, असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

अगदी खरं आहे काकाश्री...

मदनबाण
Sat, 08/23/2014 - 21:17 नवीन
अगदी खरं आहे काकाश्री... :) रंगीत फोटोतल्या मूर्तीवर चंद्र नाही, तसेच तलवारी बद्धल सुद्धा फरक आहे. मूर्तीच्या सांच्यां मधला फरक असावा... रंग नसलेली एका जागची तर रंगवलेली मूर्ती दुसर्‍या ठिकाणची आहे. बाप्पा कुठल्या पोझ मधे दिसेल ते सांगता येत नाही.... सुपारीच्या गणपती पासुन ते चक्क स्पायडर मॅन गणपती. ;) Image removed. {चित्र जालावरचे आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Pehli Baar Hua Hai... Wink :- Har Dil Jo Pyaar Karega
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तलवारी :- याच्या जागी खड्ग

मदनबाण
Sat, 08/23/2014 - 21:19 नवीन
तलवारी :- याच्या जागी खड्ग अर्थात खंडा असे हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त रे मदनबाणा!

प्यारे१
Sat, 08/23/2014 - 22:30 नवीन
मस्त रे मदनबाणा! बाकी हे गणपतीचे चि वि आकार लई डोक्यात जातात राव. गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ. अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो. गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ?
  • Log in or register to post comments

हो बरोबर, तो स्पायडर मैन च्या

खटपट्या
Sun, 08/24/2014 - 06:08 नवीन
हो बरोबर, तो स्पायडर मैन च्या रूपातला गणपती पाहून कसतरीच होतंय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार

मदनबाण
Sun, 08/24/2014 - 09:06 नवीन
गणपती न हुआ कोई फिल्म्स्टार हुआ. अजुन रजनीकांत गणपती पाहिला नाहीये मी... तो सुद्धा दिसेल काही सांगता येत नाही. उत्सवाचे बाजारीकरण झाल्यावर या गोष्टी त्यात येणार. तसेही हल्ली कोणी कशाला आणि कसे आवरायचे हेच समजत नाही,न्यायालयाचे आदेश असुन सुद्धा दहीहंडीच्या वेळी त्याचे पालन झाले ? अगदी शिवाजीमहाराज, साईबाबा, कृष्ण ह्या रुपातला गणपती सुद्धा बघायला नको वाटतो. ह्म्म... मला स्वतःला यात शाडु मातीचे साधे गणपतीच जास्त भावतात, पण काही वेगळ्या स्वरुपात सुद्धा बाप्पाला बघायला आवडते...पण स्पायडर मॅन गणपती नक्कीच नको ! { एक उदा. द्यायचे म्हणुन मी तो फोटो इथे दिला आहे.} अती उंच मूर्ती सुद्धा नकोश्या वाटतात,विसर्जनाच्या वेळी त्यांना नेताना पहाताना जरा भितीच वाटते.नवसाला पावणारा म्हणुन बाजार भरतो हे काही वेगळेपणे सांगायला हवे ? हल्ली गल्लोगल्ली "अमुक राजा " तमुक राजा" पहायला मिळतोच ना ? गणपती... गणपती. सिम्पल आहे. कशाला गोंधळ? खरयं... बाप्पा शूर्पकर्ण आहे, पण या बाजारातील :- उत्सव, शांतता आणि पावित्र्य शोधताना त्याचाही गोंधळ होत असावा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेराही जलवा... :- Wanted
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मस्त! मस्त!! मस्त!!!

पैसा
Mon, 09/01/2014 - 16:33 नवीन
सगळे फटु झक्कास! तुम्ही स्पायडीच्या गणपतीला हसताय, पण कोकणात असे वेगवेगळ्या रूपातले गणपती लै फ्येमस. गणपतीबरोबर बरोबर बाई असेल तर त्या चित्राला बावली गणपती (बाहुली-गणपती) म्हणतात. मी लहान असताना एकाकडे पाहिलेला राजेश खन्नाच्या रूपात गुरुशर्ट बेलबॉटम प्यांट घातलेला आणि स्कूटरला टेकून उभा असलेला गणपती आणि त्याला टेकून उभी बेलबॉटमवाली साक्षात हेमामालिनी अगदी चांगली आठवते आहे!
  • Log in or register to post comments

खड्यांचा अतिरेक वाटतोय.

सूड
Mon, 09/01/2014 - 16:48 नवीन
खड्यांचा अतिरेक वाटतोय. म्हणजे मसाल्याने मसालितावर मात केल्यासारखी वाटली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा