५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .
मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"
तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."
परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .
आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?
माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .
बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .
इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .
आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .
इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .
पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .
हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .
लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
वाचने
34410
प्रतिक्रिया
134
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न गळे काढण्याचा नाही,
In reply to >>"There is no sexual value by सूड
>>राहिला प्रश्न वन नाईट....
In reply to प्रश्न गळे काढण्याचा नाही, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा गळेकाढू चर्चा प्रतिसादातूनच काही तरी होत असतं.
In reply to >>राहिला प्रश्न वन नाईट.... by सूड
>>फरक पडतो. चारित्र्यावबद्दल
In reply to अशा गळेकाढू चर्चा प्रतिसादातूनच काही तरी होत असतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आब्बो..
In reply to तुमचीच वाट बघत होते सगळे by पुण्याचे वटवाघूळ
काय सांगता?
In reply to आब्बो.. by चिगो
>>तोपर्यंत या वन नाईट
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
आमचेच म्हणणे ...
In reply to भंपक छद्मविज्ञान by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ?
In reply to आमचेच म्हणणे ... by चौकटराजा
चौरा, त्याला `विदाबाधा'
In reply to हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ? by संजय क्षीरसागर
स्टॅटिस्टिक मराठे
In reply to हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ? by संजय क्षीरसागर
या या या.....चर्चेत मी आपली वाट पाहात होतो...
In reply to भंपक छद्मविज्ञान by ३_१४ विक्षिप्त अदिती
सिमोन द बुव्हाच्या सेकंड
In reply to या या या.....चर्चेत मी आपली वाट पाहात होतो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदिती ताई,
डॉक्टर साहेब, बरे केलेत हा
In reply to आदिती ताई, by सुबोध खरे
ब्ररोब्बर!
In reply to डॉक्टर साहेब, बरे केलेत हा by प्रसाद१९७१
संदर्भ - मी ज्या पुस्तकात हे
In reply to आदिती ताई, by सुबोध खरे
अदिती ताई
In reply to संदर्भ - मी ज्या पुस्तकात हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
नाही म्हणजे आम्ही थेट भोंगळ
In reply to कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक by ३_१४ विक्षिप्त अदिती
हायला हा धागा पंचशतक करणार.
--ज्या धाग्यात गांधी सावरकर
In reply to हायला हा धागा पंचशतक करणार. by प्रमोद देर्देकर
..अरे व्वा हा इथे उगवला तर .....!!!!!
In reply to --ज्या धाग्यात गांधी सावरकर by नानासाहेब नेफळे
http://www.psychologytoday
बचाव्व्व्व्व्व्व्व्व्व्व!!!!!!!!!!
कल्पना विलास.ही कल्पना कोण ते मला आइशप्प्थ माहीती नाही ओ. `वन नाइट स्टँड' पेक्षा मला "७० डे नाईट स्टँड्" भावले. मी आधी कुठलाही धागा न काढ्ता जाउन आलो. आन मग स्वतःच गावभर बोंब ठोकली. पहा आमची पहीली परदेशवारी!!! नशीबाने कोणीतरी भक्ताने ती अलीकडेच वरती आणलीय, फक्त वाचल्यावर कोणताही स्टँड घ्या किंवा घेउ नका. आपल्या जबाबदारीवर करा म्हणजे झालं. लोक काहीबी बोलत्यात पण मी सांगतो आपला या कल्पनाशी काहीही संबंध नाही हो. पण कुरुक्षेत्र ब्राझील असल्याने आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल . असं काही मनाला शिवलेसुद्धा नाही बॉ.किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ?
In reply to बचाव्व्व्व्व्व्व्व्व्व्व!!!!!!!!!! by विलासराव
>>>>>हा प्रश्न मुख्यत्वे
In reply to किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? by संजय क्षीरसागर
अर्थात!
In reply to >>>>>हा प्रश्न मुख्यत्वे by विलासराव
विलासराव
In reply to बचाव्व्व्व्व्व्व्व्व्व्व!!!!!!!!!! by विलासराव
सर, हे तर मी पहेले छूटच बोल्लेलो!
In reply to विलासराव by सुबोध खरे
>>>विलासराव
In reply to विलासराव by सुबोध खरे
चुकीच्या माणसाला प्रश्न
In reply to विलासराव by सुबोध खरे
ऐसी अक्षरे या संकेत
च्यायला!
In reply to ऐसी अक्षरे या संकेत by पिंपातला उंदीर
जोरदार टाळ्या.
In reply to च्यायला! by संजय क्षीरसागर
कुठल्याशा का हो? चांगला हिट
In reply to जोरदार टाळ्या. by विलासराव
अर्रे वा!
In reply to कुठल्याशा का हो? चांगला हिट by असंका
पोलचे पर्याय फारच कन्फ्युजिंग
In reply to ऐसी अक्षरे या संकेत by पिंपातला उंदीर
पोल थोडा गोंधळाच वाटतोय. आणि
In reply to पोलचे पर्याय फारच कन्फ्युजिंग by बाळ सप्रे
दुसर्या टोकाची खाप पंचायत
संस्कार महत्त्वाचे.
नाय हो ...
In reply to संस्कार महत्त्वाचे. by प्रभाकर पेठकर
अत्यल्प...
In reply to नाय हो ... by चौकटराजा
One Night Stand
>>आमचे मित्र तर भरभरुन चर्चा
In reply to One Night Stand by प्रसाद गोडबोले
अमक्या तमक्याने काय केलं
In reply to >>आमचे मित्र तर भरभरुन चर्चा by सूड
जाता जाता --
In reply to One Night Stand by प्रसाद गोडबोले
IIPS (इन्डियन इन्स्टित्युट ऑफ
In reply to जाता जाता -- by सुबोध खरे
डॉ. साहेब, शरीरसंबंध येणं हे
In reply to जाता जाता -- by सुबोध खरे
लईच
समूहावर कोणी वन नाईट स्टँडचा
लोल...खुपच अपेक्शा ठेवता
In reply to समूहावर कोणी वन नाईट स्टँडचा by तुमचा अभिषेक
माझा अनुभव असता तर केला असता
In reply to लोल...खुपच अपेक्शा ठेवता by टवाळ कार्टा
Quora.com वर विचारा.
In reply to समूहावर कोणी वन नाईट स्टँडचा by तुमचा अभिषेक
डोळे
नारायण ! नारायण ! घोर कलियुग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisनारायण ! नारायण ! घोर कलियुग
In reply to नारायण ! नारायण ! घोर कलियुग by मदनबाण
एक सांगा
नॉट क्वाइट
In reply to एक सांगा by पैसा
ज्या व्यक्तीला (स्त्री अथवा
७ 'दिवस' झाले, 'वन नाईट'
अरे वा!
जराशा अघळपघळ गप्पा.
@दिलीप बिरुटे प्रतिसाद
In reply to जराशा अघळपघळ गप्पा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे