श्रावण सोमवार विशेष - कर्टोलीची भाजी
कर्टोली ही खास पावसाळ्यात व त्यातही श्रावणात मिळणारी भाजी. श्रावण सोमवारी उपास सोडताना केळीच्या पानावर ही भाजी हवीच.
माझ्या पत्निच्या वतीने पाककृती येथे देत आहे.
साहित्य
कर्टोली २०० ग्रॅम
भिजवलेली चणा डाळ एक वाटी
हिरव्या मिरच्या ३
फोडणीसाठी तेल २ टेबल स्पून
मोहरी पाव टी स्पून
हिंग पाव टी स्पून
हळद अर्धा टी स्पून
सजावटीसाठी खवलेला नारळ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर
कर्टोलीची दोन्ही बाजूची डेखं कापुन बारीक काचर्या चिराव्या. कर्टोली कोवळीच घ्यावी, त्यातल्या बिया काढाव्या लागत नाहीत. जून असल्यास डेख कापल्यावर ते कोरुन पोकळ करावे म्हणजे बिया निघुन जातील. मग पातळ चकत्या कराव्या.
भिजवलेली डाळ, मिरची थोडं मीठ किंचित पाणी घालुन जाडसर वाटुन घ्यावी
कढईत तेल गरम करुन मोहरी, हळद व हिंगाची खमंग फोडणी करावी
फोडणीत चिरलेली कर्टोली व वाटलेली डाळ घालावी. व्यवस्थित ढवळुन मंद आचेवर झाकण घालुन शिजवावी. भाजी शिजली व डाळ मोकळी झाली की चवीप्रमाणे मीठ घालुन भाजी ढवळुन घ्यावी.
गरम गरम भा़जी वाढपाच्या भांड्यात घेऊन वर खवलेला ओला नारळ व कोथिंबिरीने सजावट करावी.

वाचने
12625
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
कर्टोली आणि सर्वसाक्षी दोन्ही
मस्त रेसिपी...
वाह!
आवडली पाकृृ.
वा!
सर्वसाक्षींचे फोटो म्हणजे
मेड ईन इंडिया मस्त !! च !!!
आयशपथ, मस्त!!!
In reply to आयशपथ, मस्त!!! by पिवळा डांबिस
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by इरसाल
+१...
सहीच....खूप दिवस झाले कर्टोली
मस्त दिसतेय भाजी
कर्टोली आणि सर्वसाक्षी दोन्ही
मस्त हो काका. काकुंना
ऐशप्पथ! बेस्ट. करटुलाची भाजी
आम्हीपण कंटोलीच म्हणतो.
झालेल्या चुकीची दुरुस्ती
आईशपथ
मस्त दिसतेय भाजी. इंगजीमध्ये
In reply to मस्त दिसतेय भाजी. इंगजीमध्ये by सखी
इंग्रजी नाव , 'इथं' वगैरे
In reply to मस्त दिसतेय भाजी. इंगजीमध्ये by सखी
सापडले
'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत
In reply to 'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत by मार्क ट्वेन
धन्यवाद पैसाताई आणि मार्क
मस्त..
ही भाजी कधी खाऊन बघितली नाही.
कर्तोलीची भाजी.
मस्तं.
कालच केली होती...मस्तं जमली.
सही फोटो!
आता कंटोली आणायला शेतावर