श्रीकृष्ण आमचा देव आहे
दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे
आज तरुणाईला चेव आहे
म्हणूनच
आयोजकांचा धंदा आहे
सामान्यांचा वांदा आहे
वर चढणारा गोविंदा आहे
म्हणूनच
जोश थोडा मनात आहे
उसन्या नशेची साथ आहे
ही संस्कृतीवर मात आहे
म्हणूनच
टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे
ट्रकमधून ओसंडते विकृती आहे
ही मुळी न आपली संस्कृती आहे
म्हणूनच
डीजेचा ठणाणा आहे
गोविंदांचा धिंगाणा आहे
आयोजकांचा ताठ बाणा आहे
म्हणूनच
थरावर लावायचा थर आहे
समोर पैशाचा डोंगर आहे
वाट बघणारं घर आहे
म्हणूनच
ही आयोजकांची स्पर्धा आहे
गोविंदांची त्रेधा आहे
बघ्यांचा जीव अर्धा आहे
म्हणूनच
स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही
नशा आहे आता, केवळ गोडी नाही
काळजी आहे तुमची, तीही थोडी नाही
म्हणूनच
नाही असं कोण म्हणतंय?
कुणी म्हटलं तरी कोण ऐकतंय?
'सांभाळून!' इतकंच सांगावं वाटतंय
म्हणूनच
- अपूर्व ओक
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2692
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली......
आवडली......
खरं आहे!
आवदली
मनापन आवदली.
In reply to खरं आहे! by नूतन
मनापन आवदली.
आवल्ली.
In reply to मनापन आवदली. by धन्या
आवल्ली.
आवलेंनी आवल्ली की आवलेंना
In reply to आवल्ली. by प्यारे१
आवलेंनी आवल्ली की आवलेंना आवल्ली?
थँक यू!
:) थँक यू!
सद्यस्थिती पाहता कविता जास्तच
सद्यस्थिती पाहता कविता जास्तच आवडली.
खरं आहे…
संस्कृतीच्या नावावर गल्लोगल्ली धटिंगण माजलेत
गोविंदाच्या भविष्याचे मात्र बारा वाजलेत
जे काल थरावर होते तेच आज फोटोत जाउन बसलेत
म्हणूनच….
ये बात!
In reply to खरं आहे… by माम्लेदारचा पन्खा
ये बात!
वेल्लाबद ..आवदली क्विता
वेल्लाबद ..आवदली क्विता ;)
(हा डॉल्बी डि़जीटल चा शोध कोणी लावला रे , मला भेटला तर मी मारुन टाकेन.... मायचा भोपळा त्याच्या )
आभार! सुहास, शिद, मामलेदार...
आभार! सुहास, शिद, मामलेदार...
कविता आवडली. बेवडे आणि मुजोर
कविता आवडली. बेवडे आणि मुजोर पोर आणि गोविंदा ? साला बाईक वरुन जाताना हॉर्नचा कर्कश्य आवज करुन जातात ही मवाली मुले आणि हे गोविंदा म्हणुन फिरतात म्हणे, त्यांच्या बरोबर माजलेले सांड नेते सुद्धा तेव्हढेच जवाबदार आहेत या विकॄतीकरणाला. ठाण्यातले पोलीस बहुतेक कोमात असावेत कारण कारवाईची भाषा करत होते त्याचा अजुन काही पत्ता लागला नाही.बहुधा त्यांना "सघर्ष" टाळावा असे वाटले असावे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
कविता आवडली!
कैक वर्षांपूर्वी गिरणगावतल्या कामगारांचा तो एक मर्दानी खेळ होता. काही संघ अस्सल व्यायामपटूंचे होते. ते थर रचणं अजूनही खूप थरारक वाटतं. हळूहळू सणाचा इव्हेंट झाला, जी काही थोडीफार शिस्त निवडक संघांमध्ये होती, ती ही कुठे दिसेनाशी झाली. आजकाल दिसणारं विद्रुपिकरण तुमच्या कवितेत पुरेपुर उतरले आहे.