Skip to main content

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 17/08/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.

१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....

फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!

नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!

झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!

पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!

तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!

लेखनविषय:

वाचने 2472
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

रचना आवडली असं कसं म्हणु ? डोळ्यात पाणी आले...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis