Skip to main content

नव्या भोंडल्यातले एक गाणे

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 21/10/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी, त्रिवेणी दोघी बहिणी काव्यात नव्हतं तिसरं कोणी काव्याची गेयता चोरली कोणी मी नाही चोरली कवितेनी चोरली विडंबनदादा येईल गं दादाच्या मांडीवर बसीन गं दादा तुझी कविता चोरटी अन् मला म्हणते पोरटी घातली काठी कवितेच्या पाठी काव्यातून, काव्यातून चारोळी मोठी.. फुटली कविता झाल्या चारोळ्या नवागतांनी वाजवल्या टाळ्या ...
लेखनविषय:

वाचने 2427
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by सहज

खिरापत ओळखायची असते. त रीपण सांगतो - "दोन चारोळ्या ".. आणि त्या लगेच देणार आज, आत्ता, ताबडतोब.. वाचा "नवागताच्या चारोळ्या"