मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजार!

कवितानागेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजार हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन. स्किझोफ्रेनिया -Paranoid schizophrenia या आजाराबद्दल खरं तर फार लहानपणीच कळले होते. कधीतरी मेंदूतच काहीतरी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो इतके नक्की माहित होते. हे लोक अचानक विनाकारण चिडतात, त्यांचा सोशल सेन्स संपतो. पण अजूनही अश्या पेशंट्स चे नक्की कधी, कसे काय बिघडते हे अज्ञातच आहे. फक्त कुठल्यातरी गोष्टीचा अचानक आत्यम्तिक 'गंड' निर्माण होतो, आणि सतत त्याबद्दल बोलतात. रोजच्या गोष्टी, जमेनाश्या होतात. अगदी जेवण आणि झोपदेखिल बिघडते. जवळच्या नात्यात एकाला भास व्हायचे, की त्याचे मित्र त्याला मारणार आहेत. शिवाय त्याच्या घरी येऊन सर्वांनाच मारणार आहेत. वास्तविक त्या मित्रांनीच त्याला अनेक महिने सांभाळले होते आणि घरच्यांना त्याच्या मानसिक परिस्थितीची कल्पना दिली होती. अतिशय बुद्धिमान, दहावी बारावीत उत्तम मार्क मिळवून सिव्हील इन्जीनीअर झालेला हसरा आणि आनंदी मुलगा भीतीनी त्रासांनी रडताना आणि चिडताना पाहिला होता. एकदा रागाचा उद्रेक झाल्यावर आणि त्या भरात त्यानी खिडकीची काच फोडल्यावर घरातले जागे झाले आणि औषधे सुरु केली. गेली २० वर्षे हा मनुष्य औषधांवर आहे. भरपूर झोपतो. भरपूर जेवतो. बोलतो ते तर्काला धरून अजिबातच नसते. तरीही त्याला मुंबई सुधारायची आहे. अजून एक मित्र आहे. त्याला ६ वर्षाचा असल्यापासून एक अद्रुश्य बुवा येउन सांगतोय की भारत-पाकिस्तान आणि चीन यांना एकत्र आणण्याचे काम तुला करायचे आहे. त्यासाठी तू लग्न करायचे नाहीस. त्याच्याशी इतरही 'अद्रुश्य' लोक बोलतात. अगदी नेहरु आणि बाबासाहेब आंबेडकरदेखील. तशातही तो १०वीला मेरीटमध्ये आला होता. प्रत्येक महत्वाच्या परीक्षेला आजारी पडायचा. तरीही एम कॉमला ८४% आहेत. पण पुढे काही नाही. त्याच्या नकळत घरून औषधे सुरु आहेत. आई वडील डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात. त्याला दर ६ महिन्यांनी नवीन डॉक्टर सापडतो त्यावेळेस तो आधीच्या डॉक्टरला शिव्या देतो 'he/she has ruined my health completely. But this doctor is really an angel' हे वाक्य नेहमीच ऐकायला मिळते. कुलदेवता स्वत: त्याला दर्शन देते आणि सांगते की भारत आणि चीन यांना सांधला जाणारा एकमेव दुवा तूच आहेस. एका काकाना मागे भेटले होते. ते न्यूटनचा कुलिंग कर्व कसा चुकीचा आहे हे समजावून सांगत होते. सुरुवातीला मी उत्सुकतेनी ऐकले. थोड्या वेळानी सगळे लक्षात यायला लागले. पण काहीच इलाज नव्हता. 'विचित्र माणूस आहे झाले.' असे म्हणून सोडून दिले.... मध्ये वाचण्यात आले, की अल्बर्ट आईन्स्टाएनच्या धाकट्या मुलाला देखिल असा मनोविकार होता आणि शॉक्स द्यावे लागले होते. यामध्ये भास- hallucinations होणे हा तर खूप पुढचा टप्पा झाला. पण त्यावेळेस बाकीच्यांच्या लक्षात येऊ लागते की काहीतरी बिघडलंय. पण तोपर्यंत वास्तवापासून हे लोक फार दूर निघून गेलेले असतात. या वर एक अतिशय ताकदीनी तयार केलेला मराठी सिनेमा आहे. देवराई. हा सिनेमा पर्यावरणाबद्दल आहे असेच खूपजणांना सुरुवातीला वाटले. घोर अज्ञान! ('रात्र आरंभ' देखील आहे. पण थोडा बटबटीत आहे. beautiful mind देखील आहे.) देवराईमधला अतुल कुलकर्णीचा अभिनय बघताना अंगावर काटा येतो प्रत्येक वेळेस. अश्या पाहिलेल्या खर्‍या व्यक्ती उभ्या राहतात डोळ्यासमोर. त्यातल्या 'शेष' हा मूळातला संवेदशील, बुद्धीमान मुलगा. तो जरा चिडका, विक्षिप्त आहे, त्याला जबाबदारीची जाणीव नाही, असे घरातल्या इतरांचे मत असते. तो जेंव्हा खात्रीपूर्वक त्याच्या बहिणीला सांगतो की गावाकडच्या पार्वतीचा तिच्या नवर्‍यानी- शंभूनी खून केलाय, तेंव्हा ती बहीण हादरते. दुसर्‍या दिवशी फोन करून ते दोघे खुशाल आहेत, हे कळल्यावर अजूनच हादरते.... मग कशीबशी भावाची सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते. त्याला घरातली कामाची बाई पार्वती, देवळातली पार्वती आणि देवराई या तिन्ही एकच आहेत असेदेखिल वाटत असते! उपचार केंद्रात गेल्यावर दिसते की तिथल्या व्यवस्थापक बाईंचा मुलगा देखील याच रोगाचा बळी आहे. त्याला औषधोपचार सुरु असतात, पण तरीही गेली काही वर्षे तो सतत आईला शिव्या देऊनच बोलत असतो! वास्तवापासून इतकी दूर गेलेली माणसे पाहिली की अगदी कालवते पोटात. कुठलाही साधा सामाजिक, नैसर्गिक नियम त्यांना कळू शकत नसतो. फार कमी लोक यातून स्वत:ला सावरताना दिसतात. जालावरून मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ १% लोक या रोगाचा शिकार आहेत. आणि याची सुरुवात १५ वर्षाच्या आतबाहेर सुरु होते, कधीकधी फार लहानपणीच... नक्की कारण माहित नाही!! इतकेच कळतंय की.... there are neurological, biological, genetic, social factors involved. smiley औषधांनी फक्त लक्षणे नियंत्रित केली जातात. त्यामुळे फक्त पूर्वीच्या माणसासारखाच दिसणारा एक विचारशक्तीहीन, कल्पकताहीन माणूस डोळ्यासमोर उठता बसताना दिसतो. रोजच्या औषधांमुळे कल्पकता कमी होऊन भास व्हायचे बंद होतात. माणूस उत्तेजित होत नाही. पण त्यातला 'अर्क' संपतो, मंदपणा येतो. कठीण अवस्था होते, अशी माणसे सांभाळायची म्हणजे.... या सर्व रोग्यांना स्वत:चे रोजचे आयुष्य सोडून कुठल्यातरी भल्या मोठ्या प्रश्नाला हात घालायचा असतो. आणि आपल्याशिवाय हा प्रश्न सोडवणारे कुणीही नाही, याबद्दल खात्रीच असते. स्वतःला/ इतरांना कुणीतरी वेगळीच व्यक्ती समजू लागतात. पण अर्थातच त्यावर ते घेत असलेली अ‍ॅक्शन तर्काला/ शहाणपणाला धरुन नसते. beautiful mind सारखी केस फारच क्वचित निघते. कुणाला वाटते आपण आंतरराष्ट्रीय सहज प्रश्न सोडवू शकतो , कुणाला वाटते कि आपण पेट्रोलला पर्याय शोधला आहे. बघणार्‍याला वाटते की हा माणूस त्याला जे काम करायचं ते करता येत नाही म्हणून frustrate होतोय, चिडतोय, भांडतोय. वास्तविक, ही सगळी फक्त वरवरची निमित्त असतात. मेंदूतल्या स्त्रावांचा गोंधळ कधीचाच होऊन बसलेला असातो. टोकाच्या स्थितीत तर माणसाना स्वत:च्या कपड्यांचीदेखील शुद्ध नसते! देवराईतल्या 'शेष'ला वाटत होते कि तो पर्यावरणाची हानी थांबवू शकेल..... अजून एका ओळखीच्या मुलीला ११-१२वी पासून त्रास आहे, घरी बसल्या बसल्या अचानक तिला वाटायला लागले की क्लासमधले सगळे आपल्याभोवती जमून छी-थू करतायत. पण घरच्यांनी लगेच सायकोलॉजिस्ट्कडे नेले. त्यांचा काउन्सिलिन्गवर भर असतो. ६ महिन्यातून एखद्यावेळेस तिला औषधाची गरज पडते. तिला समजावलय की तिच्या भावाबहिणींसारखा खूप खूप अभ्यास करुन तिला मोठी डीग्री मिळवता येणर नाहीये. पण हातातल्या कलेचा वापर करता येइल. ती मुलगी सतत छान छान वस्तू बनवण्याच्या उद्योगात मग्न असते. ४-४ तास बसून मेंदी काढते. डी.एड. करुन जवळच नोकरी करते. मात्र जालावर शोधून, आणि प्रत्यक्ष बघण्यातही काही अश्याही केसेस दिसल्या की उपाययोजना करूनही कधीकधी एखाद्या फसव्या वेळेस, सगळेच हातातून निसटून जाते आणि पेशंट काहीतरी नाही ते करून बसतो... यातील सगळ्या केसेसमध्ये अकारण भिती, अकारण तीव्र स्वरुपाचा राग, संशय आणि सोशल सेन्स संपणं, कम्युनिकेशन गॅप हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहे. बर्‍याचवेळेस अशा पेशंट्सना अगदी बाबापुता करुन डॉक्टरकडे न्यावं लागतं. कधीकधी कम्युनिकेशन गॅपमुळे तेही शक्य होत नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांची चर्चा केल्यावर ते म्हणाले की, अती ताणामुळे/ विचारामुळे/रागामुळे 'पित्तप्रकोप' होउन हे असे बदल होउ शकतात मेन्दूमध्ये. सुरुवातीला तात्पुरते असतात, उपाय केला नाही तर वाढतात. जालावर मिळालेली थोडी माहिती इथे देतेय.. According to Medilexicon's medical dictionary: Paranoid schizophrenia is schizophrenia characterized predominantly by delusions of persecution and megalomania. Paranoid schizophrenia is a schizophrenia subtype in which the patient has false beliefs (delusions) that somebody or some people are plotting against them or members of their family. People with paranoid schizophrenia, as with most subtypes may also have auditory hallucinations - they hear things that are not real. The individual may also have delusions of personal grandeur - a false belief that they are much greater and more powerful and influential than they really are. An individual with paranoid schizophrenia may spend an extraordinary amount of time thinking about ways to protect themselves from their persecutors. What are the signs and symptoms of paranoid schizophrenia? The patient will have relatively stable, frequently paranoid delusions, which are usually accompanied by auditory hallucinations (hearing things that are not there) and perceptual disturbances. Some schizophrenia symptoms are not prominent, such as disturbances of volition, affect, speech and catatonia. Auditory hallucinations - hearing voices that are not there (they don't exist). Visual hallucinations are possible, but rare. Delusions - beliefs that are not real; false personal beliefs that are not subject to reason or contradictory evidence. The patient may firmly believe something, even though there is incontrovertible evidence that it is false. En example may be a belief that a neighbor is plotting to kill or poison the patient. Anxiety - a patient with paranoid schizophrenia will usually suffer from periods of high anxiety. Anger - this emotional state may range from mild irritation, which most healthy individuals sometimes have, to fury and rage. Anger may raise heart rate, blood pressure and levels of adrenaline and noradrenaline. Detachment - the patient may sometimes be physically or emotionally; reserved and remote (aloofness) Aggression and violence - aggression may reach levels in which violent outbursts occur. Quarrels Condescension - sometimes the patient may seem patronizing; perhaps they may feel they know stuff other people don't and subsequently assume such a manner. Suicidal thoughts and behavior - these may be noticeable by people around the individual, with statements such as "I wish I were dead", I am going to kill myself", or "I wish I had never been born". The patient may go further and obtain the means to kill himself/herself, such as getting a weapon or accumulating pills. People with schizophrenia are at increased risk of having a number of other mental-health conditions, committing suicide, and otherwise dying earlier than people without this disorder. Medications that have been found to be most effective in treating the positive symptoms of schizophrenia are first- and second-generation antipsychotics. Psychosocial interventions for schizophrenia include education of family members, assertive community treatment, substance-abuse treatment, social-skills training, supported employment, cognitive behavioral therapy, and weight management. Cognitive remediation, peer-to-peer treatment, and weight-management interventions remain the focus topics for research. बर्‍याच केसेस पाहून आणि वाचून, राहून राहून एक प्रश्न पडतोय.... साध्या सर्दीसाठी अपण ४-४ वेळा आल्याचा चहा करुन घेतो. मग मन रडत असताना 'आपोआप ठिकाणावर येइल', असे म्हणून सोडून का देतो? खरोखरच जग इतके वाईट आहे का की अतिसंवेदनशील माणसाना ते सामावून घेऊ शकत नाही? का त्यांना असे वास्तवाचे भान सोडून, वेगळ्याच जगात का पळून जावसे वाटत असेल? त्यातूनही पुन्हा जगातूनच का पळून जावसे वाटत असेल? हे खरोखरच थांबवता येईल का?

वाचने 5568 वाचनखूण प्रतिक्रिया 29

प्यारे१ Sat, 08/16/2014 - 14:55
>>> साध्या सर्दीसाठी अपण ४-४ वेळा आल्याचा चहा करुन घेतो. मग मन रडत असताना 'आपोआप ठिकाणावर येइल', असे म्हणून सोडून का देतो? >>> खरोखरच जग इतके वाईट आहे का की अतिसंवेदनशील माणसाना ते सामावून घेऊ शकत नाही? का त्यांना असे वास्तवाचे भान सोडून, वेगळ्याच जगात का पळून जावसे वाटत असेल? त्यातूनही पुन्हा जगातूनच का पळून जावसे वाटत असेल? >>> हे खरोखरच थांबवता येईल का? हे महत्त्वाचं आहे. लवकर उपाय झाले तर शक्य होतं. मुळात मानसिक आजार होऊ नयेत म्हणून मनाचा खुराक योग्य आणि संतुलित असणं आवश्यक आहे. 'अति सर्वत्र वर्ज्य' केलं की किमान जमायला हरकत नाही. बाकी केस स्टडीज आणि त्यावर उपाय हे तज्ज्ञ लोकांचं काम आहे. मुळात 'केस आहे' हे समजून घेतलं गेलं पाहिजे. 'सर्दीपासून कॅन्सर' पर्यंत पेशन्टच तसं 'रडू फुटणं ते आत्महत्या करावीशी वाटणं' पर्यंत पेशन्टच.

अवघड आहे, देवराई मधुन या विषयाच गांभिर्य समजले होते. दुर्दैवाने या आजराने ग्रस्त लोकांची संख्या आजुबाजुला वाढताना दिसते आहे. पैजारबुवा,

राजेश घासकडवी Sat, 08/16/2014 - 15:37
लेख आवडला.
साध्या सर्दीसाठी अपण ४-४ वेळा आल्याचा चहा करुन घेतो. मग मन रडत असताना 'आपोआप ठिकाणावर येइल', असे म्हणून सोडून का देतो?
हे वाक्य कळीचं आहे. अजूनही मानसिक आजारांबाबत पुरेशी जागरुकता नाही.
एकदा रागाचा उद्रेक झाल्यावर आणि त्या भरात त्यानी खिडकीची काच फोडल्यावर घरातले जागे झाले आणि औषधे सुरु केली.
असं काहीतरी टोकाचं दिसतं तेव्हाच उपचार केले जातात. जेव्हा आपला दात दुखतो तेव्हा आपण स्वतःलाच दोष देऊन 'मीच असा का?' असा प्रश्न विचारत नाही. दाताला जशी कीड लागू शकते तशी मनालाही लागू शकते. अनेक वेळा ती योग्य उपचारांनी बरीही करता येते. दात व्यवस्थित असले तरीही डेंटिस्टकडे दर सहा महिन्यांतून एकदा जाऊन दाखवून यावेत हा सल्ला स्वीकारार्ह वाटतो. मात्र दर सहा महिन्यांतून एकदा सायकॉलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून यावी असं म्हटलं तर ते आपल्याला विचित्र वाटतं. 'मला काही झालं नाही, मी ठीकठाक आहे, हे जे थोडंफार होतं ते सगळ्यांनाच होतं की...' असंच म्हणण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा आपण अशा रोगाने ग्रासलेल्या कोणाकडे बघतो तेव्हाही आपल्याला आत कुठेतरी, काहीतरी बिनसलेलं असावं असं जाणवतं. बऱ्याचवेळा हिमनगाच्या टोकाप्रमाणे ते अगदीच नगण्य असतं. सामान्यच पण थोडंसं वेगळं काहीतरी वर्तन वाटावं असं. पाण्याखाली किती दडलेलं आहे हे सांगता येत नाही. काय करावा हेही कधी कधी कळत नाही. जवळच्या लोकांनी इंटरव्हेन्शन करणं हा एक मार्ग असतो. त्यासाठी असे रोग असतात, त्यांची लक्षणं ही ही असतात आणि यावर समजुतीचे चार शब्द सांगण्यापलिकडे उपाय असतात याची माहिती असणं महत्त्वाचं ठरतं. एके काळी उपचार घेणं म्हणजे वेड्यांचं हॉस्पिटल, शॉक ट्रीटमेंट वगैरे ढोबळ समजुती होत्या (निदान माझ्या तरी). गेल्या काही दशकांत याबाबत जागृती वाढते आहे. पण जितकी गरज आहे त्यामानाने ती नगण्यच आहे.

अजया Sat, 08/16/2014 - 15:57
या रोगाने अक्षरश:ग्रासलेला एक परिचीत आहे.तो नेहेमी ग्रँड स्केलवर बोलायचा.त्याच्यात काहीच आजार नाही अशी कुटुंबियांनी समजूत करुन घेतली.त्याला जगात सर्वत्र लागणारे काँम्प्युटर पेपर्स त्याचे संशोधन आहे आणि ते कोणीतरी चोरले आहे असे वाटते.पण तू हे संशोधन करायला कुठे ,कधी गेला होतास,हे सांगताना त्याच्या मेंदुमध्ये काहीतरी गडबड आहे वाटायला लागले होतेच.त्याच्या घरच्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी कायमचे अामच्याशी बोलणे टाकले होते.तो काहीही नोकरी धंदा करु शकत नसे हा म्हणे त्याचा करारी स्वभाव.त्याचे लग्न झाले.हळुहळु तो आक्रमक होऊन घरच्यांवर धावून जाणे,तर कधीकधी महिना महिना अस्वच्छ राहून मौनात.त्यात त्याला मुलगाही झालेला तोवर.दुर्दैैवाने आता त्या मुलातही मानसिक आजार आहे पण त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केली आहे.

कवितानागेश Sat, 08/16/2014 - 18:20
बर्‍याचवेळा हा 'आजार' आहे, आणि बरा होउ शकेल हीच जाग नसते. 'देवराई' बघतान तर हे 'फॅक्ट' सतत अंगावर येतं. अशक्य नाही, पण Paranoid schizophrenia मध्ये काहीही करणं फार कठीण जातं. कारण मूळात रुग्णाचा आपल्यावरचा विश्वास कुठल्या क्षणी उडेल याचच भरवसा नसतो. इतर मानसिक आजारात कुठे ना कुठेतरी युक्तीनी काही करणं शक्य नसतं. मी पाहिलेल्या बर्‍याच केसेस् मध्ये जवळच्या नातेवाईकांवर रुग्णाला नकळत औषधे देण्याची वेळ आलेली आहे.

सस्नेह Sat, 08/16/2014 - 18:20
एलोपथीमधे मनोरोगावर औषध हे बहुशः संवेदना बधीर करणारी सीडेटिव्हज असतात. ही औषधे वर्षानुवर्षे घ्यावी लागतात.

In reply to by सस्नेह

कवितानागेश Sat, 08/16/2014 - 18:32
खरं तर वर्षानुवर्षं घ्यायची गरज नसते. पण आजाराला 'हिंसक' वळण लागण्याच्या भितीनी डॉक्टरांकडून/ नातेवाईकांकडून ती सुरु ठेवली जातात. सुरुवातीला थोडंफार कामिन्ग करुन कौन्सिलिन्ग आणि बेहेविअरल थेरेपीनी आजार अटोक्यात येतो. पेशन्स हवा. आणि पूर्ण लक्ष हवं. माझ्या ओळखीच्या एका केसमध्ये तो मुलगा औषधे घ्यायला तयारही झाला होता. पण २ दिवस घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं की खूपच मंदपणा येतोय. डॉक्टरना याबद्दल विचाराल्यावर त्या खो खो हसल्या. आणि म्हणाल्या. तू यापुढे आयुष्यात अभ्यस करावास अशी आमची अपेक्षाच नाहीये. तू एक झेरॉक्स मशीन टाक आणि तुझे पोट भर!! :( सायकिअ‍ॅट्रिस्टकडून हे वागणं अगदीच अनपेक्षीत आहे. त्यानी पुढे कधीही ती औषधे घेतली नाहीत. पण त्याला नातेवाईकांकडून इतका खंबीर आधार आहे, की त्याची गाडी फारशी घसरत नाही.

In reply to by कवितानागेश

सस्नेह Sat, 08/16/2014 - 18:42
सायकिअट्रिस्टना कौन्सेलिन्ग करताना कधी पाहिले नाही. किवा पेशंटची स्टेज बघून कौन्सेलरकडे पाठवत नाहीत. ते , आला पेशंट की टोच सीडेटिव्ह , हेच सरसकट करताना दिसतात.

In reply to by धन्या

एस Sat, 08/16/2014 - 23:16
मानसोपचारतज्ञांच्या कार्यपद्धतीबाबत फारशी प्रत्यक्ष माहिती नाही, पण समुपदेशक कसे काम करतात हे पाहिले आहे. थोडेफार स्वतःही केले आहे. कुणीही अशा पद्धतीने पेशंटला वागवताना पाहिले नाहीये. वरील बाई ह्या कदाचित अतिशहाण्या असतील. पण सर्वच सायकियाट्रिस्ट हे अशाच सरधोपट पद्धतीने उपचार करतात असे सामान्यीकरण व्हायला नको. आधीच मानसिक आजारांबाबत आणि त्यांच्यावरील उपचारांबाबत समाजात इतके गैरसमज आहेत. त्यात अजून भर पडायची. कृपया अशा संवेदनशील विषयांबाबत विधाने करताना किंवा आपले मत देताना थोडीफार दक्षता आपण सर्वांनीच बाळगली पाहिजे असे सुचवावेसे वाटते. इथे लेख वा प्रतिसादांचा वैद्यकीय सल्ला म्हणून वापर व्हायला नको असा डिसक्लेमर टाकणे आवश्यक.

In reply to by एस

सस्नेह Sun, 08/17/2014 - 09:06
ही चर्चा आहे, सल्ले नव्हेत. आणि आम्ही आपले अनुभव लिहिले आहेत,विधाने नाही. कौन्सेलर्सचा अनुभव मलाही अतिशय चान्गला आहे. पण सायकिअट्रिस्टस कौन्सेलिन्गचा पर्याय फाट्यावर मारतात, हा अनुभव आहे.

In reply to by सस्नेह

धन्या Sun, 08/17/2014 - 10:26
मी स्वानुभवावरुन लिहीले आहे. पुण्यातील एका नामांकित इस्पितळाच्या सायकीयाट्री विभागाच्या ओपिडीला गेलो. डॉक्टरीण बाईंना माझी समस्या सांगितली. कुठल्याही संगणक अभियंत्याप्रमाणे मी माझ्या समस्येसंबंधीत विषयावर "आता बास झाले" असे वाटेपर्यंत आंतरजालावर वाचले होते. बाई एमडी सायकीयाट्री गोल्ड मेडलिस्ट. बराच वेळ आमची चर्चा चालू होती. "You know a lot on this topic. What you want me to do now?" बाईंचा प्रश्न. "मला माझी समस्या आणि तिचे उत्तर जरी माहिती असले तरी ते प्रत्यक्षात कसे अंमलात आणावे हे कळत नाही ", माझे उत्तर. बाईंनी प्रोडेप की कसलेसे नांव असलेल्या एंटीडीप्रेसंट गोळ्या दिल्या. मी घरी आल्यावर त्या गोळ्या मी फेकून दिल्या. एंटीडीप्रेसंट हे माझ्या समस्येचं उत्तर नव्हतं. यथावकाश मी समुपदेशकाकडे गेलो.

In reply to by एस

कवितानागेश Sun, 08/17/2014 - 13:13
तुमचे बरोबर आहे स्वॅप्स. पण इथे सल्ला किंवा उपचारपद्धती दिलेली नाही. फक्त 'संवेदनशीलतेने पहायला हवं' इतकंच सुचवायचय. मी दोन्ही प्रकारच्या केसेस पाहिल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनी सावरलेले लोक पाहिले आहेत. विषेश प्रॉब्लेम्स नसताना एका १० वर्षाच्या मुलाला सायकोथेरॅपिस्टकडे नेउन, तो त्यांच्या प्रश्नांमुळे हैराण होउन, पुढे आठवडाभर रात्री रदत उठलेला पण पाहिला आहे. म्हणूनच असं सुचवायचय, की हल्लीच्या ताण वाढलेल्या काळात तरी प्रत्येकाला मानसिक आजारांची योग्य माहिती हवी. त्याकडे 'काहीतरी भयंकर कमीपणाची गोष्ट' म्हणून न बघता 'बरा होउ शकणारा आजार' म्हणून बघावं.

प्रभाकर पेठकर Sat, 08/16/2014 - 18:21
खरं पाहता अतिसंवेदनशिल व्यक्तीने अशा विषयावर अतिवाचनही करू नये. ह्याच विषयाच्या भोवती भोवती आपली विचारचक्र फिरत राहून आपल्यातही ह्या मनोविकाराची लक्षणे दिसू लागतात. नाटकात सतत, मन लावून, वेड्याची भूमिका करून शेवटी शेवटी त्या, अन्यथा सर्वसामान्य, नटाला देखिल वेडाचे झटके आल्याचे ऐकले आहे.

पैसा Sun, 08/17/2014 - 00:09
अतिशय माहितीपूर्ण आणि संवेदनाशील लिखाण. लेख खूप आवडला आणि एका जवळच्या पाहण्यातल्या मुलाची शोकांतिका जी विसरायचा आत्यंतिक प्रयत्न केला आहे ती परत मनात ठाण मांडून बसली. आणखी एका मूळच्या अत्यंत हुशार नातेवाईकाला ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर भाजीपाल्यासारखे आयुष्य जगताना पाहिले आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे सगळे घर आजारी बनलेले पाहिले आहे. स्वॅप्स, तुमचे म्हणणे बरोबर आहे, हा लेख सायकिअ‍ॅट्रिस्ट डॉक्टरने लिहिलेला नाही, आणि यावर कोणी उपाय आधारित ठेवणार नाही, पण जवळच्या नात्यातला काही जणांबरोबर सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेल्यावर त्या डॉक्टरने जनरल प्रॅक्टिशनरसारखी औषधे लिहून देताना खूप पाहिले आहे. बहुधा सायकिअ‍ॅट्रिस्ट लोकांना कौन्सेलिंगसाठी आवश्यक वेळ देता येत नसावा. यापैकी काही डॉक्टर्स एक/दोन सेशन्सनंतर दुसर्‍या अनुभवी सायकॉलॉजिस्टवर अवलंबून राहतात आणि पेशंट आला की आधीची प्रिस्किप्शन्स पाहून जुजबी प्रश्न विचारून पुढच्या महिनाभरासाठी औषधे लिहून देतात. माझा डेंटिस्टसुद्धा यापेक्षा जास्त वेळ माझ्यासाठी खर्च करतो. अर्थात वेळ कमी आणि पेशंट्स जास्त अशी अवस्था असल्याने हे होत असेल हे मान्य आहे.

In reply to by पैसा

एस Sun, 08/17/2014 - 21:13
हा लेख सायकिअ‍ॅट्रिस्ट डॉक्टरने लिहिलेला नाही, आणि यावर कोणी उपाय आधारित ठेवणार नाही
पैताई, बरोबर आहे. पण आजही निदान भारतात तरी प्रत्यक्ष त्या विषयातील तज्ञांऐवजी अोळखीपाळखीच्या लोकांकडून मिळालेले सल्ले वा माहिती जास्त विश्वासपूर्ण मानण्याची रीत आढळते. विशेषतः अमुक डॉक्टरचा गुण चांगला येतो असं ऐकल्यावर इतरही लोक त्या डॉक्टरांकडे जाऊ लागतात हे आपण सर्वांनीच कमीअधिक प्रमाणात आपल्या आजूबाजूला पाहिलं असेल. त्यातही आधीच कमी माहिती वा जागृती असलेल्या ह्या विषयाबद्दल लोकांचे गैरसमज होण्याची शक्यताही तुलनेने जास्त असते. म्हणून मी माझे मत व्यक्त केले इतकंच. बाकी चर्चा व्हावयास हवीच याबाबत दुमत नाही.

मयुरा गुप्ते Tue, 08/19/2014 - 01:11
माऊ ताई लेख आवडला. खरचं खुप खुप संवेदनशील म्हणता येईल असा विषय आहे. ह्या आणि तत्सम विषयांची व्याप्ती एवढी मोठी आहे की आता प्रसिद्ध अभिनेते रॉबिन व्हिलियमस यांचे डिप्रेशन मुळे आत्महत्या झाल्यावर एकदम जाग आल्यासारखी प्रसिद्धि मिळाली असं वाटतयं( मला कल्पना आहे कि हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत तरिही). पैसा ताई म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण घर आजारी पडतं. त्या रुग्णाच्या नातेवाईक विशेषतः आई वडील, भाउ बहीण ह्यांची घरात आणि घराबाहेर जी कुंचबणा, अवहेलना होते त्याची मोजदाद शक्यच नाही. बरेच वेळेस ह्या आजाराचा बराचसा वेळ अक्षरशः वाया जातो असचं बघण्यात आलयं. शिवाय ह्यामध्ये स्वःत रुग्ण एका वेगळ्याच विश्वात असल्यावर डॉ. कडे घेउन जाणं हे ही तितकच दिव्य आहे. म्ह्णजे अशी उदा. पाहिली आहेत की खुप अतिउच्चित शिक्षण घेतलेले, किमान २ विषयांत पीएच्डी मिळवलेले, पण व्यवहार माहीती नाही.. मुलांची काळजी आईची जबाबदारी..फक्त आणि फक्त २४ तास घरात बसुन राहाणे हेच एक आवडते काम. लेख आणि प्रतिसादांमधुनही बरीच माहीती मिळते आहे. -मयुरा.

कंजूस Tue, 08/19/2014 - 03:45
पाहिला आहे असला पेशंट .पूर्वी याला घराण्यातच यांच्या वेड आहे म्हणत .एखाद्या कुटुंबात आत्महत्या करणारे ,थोडेसे भ्रमिष्ट ,ठार वेडे ,अधुनमधून वेडे निपजतांना दिसतात .थोडेसे अनुवंशिक आहे .आता राहिला प्रश्न उपचारांचा आणि त्याला समजून घेण्याचा .इतर शारिरिक रोगांसारखे या मानसिक रोगाचे रुग्ण स्वत: औषध मागायला जात नाहीत .यांना धरून न्यावे लागते आणि नेणाऱ्यालाही थंड राहाण्याची गोळी सतत घ्यावी लागते .

सूड Tue, 08/19/2014 - 12:42
हे आनुवंशिक असू शकतं का? >>खरोखरच जग इतके वाईट आहे का की अतिसंवेदनशील माणसाना ते सामावून घेऊ शकत नाही? हे खरोखरच थांबवता येईल का? दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'माहित नाही' असंच द्यावंसं वाटतंय, निदान आता तरी!!