मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बँकेची कर्जवसुली आणी कारवाई (माहीती हवी आहे )

विलासराव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझे वडील पंचायत समीतीमधे काम करत असत.२००३ ला ते गेले. त्यानंतर रीतसर पेपर्स जमा केल्यावर आईला पेन्शन चालु झाली.तब्बल १० वर्षांनी २०१३ ला पंचायत समीती मधुन आईला फोन आला की तुम्हाला डबल पेन्शन येत आहे. आनी तुम्हाला जवळपास ६ लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही येउन भेटा. आई तर घाबरुनच गेली. मला फोन आला, मी तिला म्हनालो मग भरुन टाकु ,तुझ्याकडे असतीलच ना जादाचे पैसे. ती म्हणाली मला काय माहित होते का? मी आलेले पैसे खर्च केलेत. थोडेफार आहेत पन ईतके? मग मी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला. त्यांचा फोन आला तर त्यांना तसं पत्र पाठवा अशी विनंती करायला सांगीतले.मग माझा मुलगा येउन काय ते पाहील असे तीने सांगितले. कुठलेही पत्र न देता पंचायत समीती मधुन २ महीन्यांनी तिची पेन्शन अर्धी ( डबल होती ती सिंगल) करण्यात आली. मी म्हणालो जाउ दे. चुक झाली असेल त्यांची ती त्यांनी सुधारली. २०१४ ला एका बँकेचे लोक घरी आले आनी वडीलांनी १९८७ ला घरासाठी १५००० कर्ज घेतले म्हणुन वसुलीला आलो असे सांगीतले.व्याज वगैरे लावुन ७५००० हाजार भरावे लागतिल असे म्हणाले. परत मला फोन मी त्यांना वडीलांनी घेतलेले कर्ज मला माहीत नाही म्हणुन तुम्ही त्याचे कागद्पत्र द्या. त्यांनी फक्त स्टेटमेंट पाठवले. कर्ज दिल्याचे कागदपत्र नाही.परत फोन आला, मी बेसीक १५००० भरतो म्हणालो तर नाही चालणार म्हणाले , मी वकीलांचा सल्ला घेतो असे सांगीतले. परत एकदा ते घरी गेले , आईने मला फोन लावला तर माझा फोन बंद. ते म्हणाले आत्ता ५००० भरा मग अधिकारी लोक निर्णय घेतील की कीती व्याज माफ करायचं आनी फायनल किती भरायचे. मी सांगुन ठेवलेले असल्याने तिने नकार दिला. मग ते म्हनाले की ता इथे सही करा, आम्ही खरच येउन गेलो हे बँकेला कळावे म्हणुन. आईने सही केली. २-३ महीन्यांनी परत अर्धी पेन्शन झाली. बँकेत चौकशी केल्यावर ते म्हनाले पंचायत समीतीकडुनच तेवढी आली. तिकडे गेल्या वर ते म्हनाले वसुली चालु केलीय. आता मला वाट्ले हे पंचायत समीतीकडुनच जादाचे आलेले पैसे वसुल करत आहेत.मी माहीती काढली ओळखीने तर ती अशी की पेंशन सिंगल झालीय आणी तेवढी बँकेत जातेय. पण पासबुकवर तर त्यातली अर्धीच जमा होतेय. म्हणजे पंचायत समीतीकडुन पेंशन सिंगल झाली आणी ज्या बँकेत जमा होते तिथे पासबुकवर अर्धिच दाखवली जाते अर्धी घरासाठी जे कर्ज होते त्या बँकेकडे जातेय हप्ता म्हणुन. आपल्या़कडे फक्त पेन्शनचे पासबुक आहे कागदपत्र म्हणुन. आता प्रश्न आहे की आपण कोर्टात कोणाला खेचायचे? मुळात आपली बाजु वैध आहे काय? पेंशन जी त्या व्यक्तिच्या पत्नीला मिळते त्यातुन वसुली करता येते का? मूळात आपल्याला काहीही पत्र न देता पंचायत समीतीने पेन्शन अर्धी केली. आनी बँकेनेही त्यातील अर्धी परस्पर दुसर्या बँकेला कशी काय दिली. आई फार शिकलेली नसल्याने तिने सही केलेला कागद बहुदा वसुलीला परवानगी दिल्याचा असावा अशी माझी शंका आहे. आता नेमकं हे त्रांगडं सोडवायचं कस?

वाचने 2608 वाचनखूण प्रतिक्रिया 4

खटपट्या Fri, 08/15/2014 - 09:07
तुमच्या लिखाणावरून तुम्ही घरापासून दूर राहता असे तीसतेय. शक्य असेल तर सुटी काढून घरी या. पंचायतीमध्ये आणि बँकेमध्ये जावून संपूर्ण म्हणणे ऐकून घ्या. हि सर्व माहिती वकिलाला सांगून त्यांचा सल्ला घ्या.

In reply to by खटपट्या

विलासराव Fri, 08/15/2014 - 10:00
आई गावाला मी मुंबईला असतो.व्यवसाय असल्याने, मी आजकाल त्यातही लक्ष देत नसल्याने सुट्टीची अडचण नाही.

पैसा Fri, 08/15/2014 - 09:16
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या.

In reply to by पैसा

विलासराव Fri, 08/15/2014 - 10:20
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. हरकत नाही बरोबर केली तर. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. कर्जाचा आईशी काहीही संबंध नाही.कर्ज घेतले होते हे मला माहीत आहे म्हणुनच तर मी १५००० भरायची तयारी दाखवली होती. जे दोन जामीनदार होते तेही आता हयात नाहीत. परंतू कर्ज १९८७ ला घेतले होते त्यानंतर काही हप्तेही भरले गेलेत. वडीलांनी १९९१ ला राजीनामा दिला होता. त्यांना पेंशनही मिळत होती. ते २००३ ला गेले. तोपर्यंत हे लोक का आले नाहीत. आलेही असतील तर अशाप्रकारे वसुली का झाली नाही. बर त्यानंतर १० वर्षांनी हे लोक कसे काय आले? मला खात्री नाही आईने नेमक्या कोणत्या कागदावर सही केली. पण एका बँकेने दुसर्या बँकेला पैसे( पेंशन) वळवले यावरुन मला तरी तसे वाटते. कर्जदार बँकेचे लोक आधी आलेच नव्ह्ते. पण आमच्या गावाला त्यांची शाखा २०१२ ला सुरु झाली. आई ब्रम्हाकुमारीला जात असते, ते पाहुन ते म्हणाले मावशी हे बँकेचे पैसे आहेत, काहीही झाले तरी भारावेच लागतील आम्ही कशाला खोटं सांगु तुम्हाला. आमची नोकरी आहे. आम्हीही ब्रह्माकुमारीमधे जात असतो मधेमधे. आनी सही घेतली. असो. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या. ज्या बँकेचं कर्ज आहे तेथील एक डायरेक्टर दुसर्या बँकेचेही( पैसे वळवलेल्या ) डायरेक्टर बोर्डावर आहेत. बघतो आता वकीलांना भेटुन.