बँकेची कर्जवसुली आणी कारवाई (माहीती हवी आहे )
लेखनप्रकार
माझे वडील पंचायत समीतीमधे काम करत असत.२००३ ला ते गेले. त्यानंतर रीतसर पेपर्स जमा केल्यावर आईला पेन्शन चालु झाली.तब्बल १० वर्षांनी २०१३ ला पंचायत समीती मधुन आईला फोन आला की तुम्हाला डबल पेन्शन येत आहे. आनी तुम्हाला जवळपास ६ लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही येउन भेटा. आई तर घाबरुनच गेली. मला फोन आला, मी तिला म्हनालो मग भरुन टाकु ,तुझ्याकडे असतीलच ना जादाचे पैसे. ती म्हणाली मला काय माहित होते का? मी आलेले पैसे खर्च केलेत. थोडेफार आहेत पन ईतके? मग मी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला. त्यांचा फोन आला तर त्यांना तसं पत्र पाठवा अशी विनंती करायला सांगीतले.मग माझा मुलगा येउन काय ते पाहील असे तीने सांगितले.
कुठलेही पत्र न देता पंचायत समीती मधुन २ महीन्यांनी तिची पेन्शन अर्धी ( डबल होती ती सिंगल) करण्यात आली. मी म्हणालो जाउ दे. चुक झाली असेल त्यांची ती त्यांनी सुधारली. २०१४ ला एका बँकेचे लोक घरी आले आनी वडीलांनी १९८७ ला घरासाठी १५००० कर्ज घेतले म्हणुन वसुलीला आलो असे सांगीतले.व्याज वगैरे लावुन ७५००० हाजार भरावे लागतिल असे म्हणाले. परत मला फोन मी त्यांना वडीलांनी घेतलेले कर्ज मला माहीत नाही म्हणुन तुम्ही त्याचे कागद्पत्र द्या. त्यांनी फक्त स्टेटमेंट पाठवले. कर्ज दिल्याचे कागदपत्र नाही.परत फोन आला, मी बेसीक १५००० भरतो म्हणालो तर नाही चालणार म्हणाले , मी वकीलांचा सल्ला घेतो असे सांगीतले.
परत एकदा ते घरी गेले , आईने मला फोन लावला तर माझा फोन बंद. ते म्हणाले आत्ता ५००० भरा मग अधिकारी लोक निर्णय घेतील की कीती व्याज माफ करायचं आनी फायनल किती भरायचे. मी सांगुन ठेवलेले असल्याने तिने नकार दिला. मग ते म्हनाले की ता इथे सही करा, आम्ही खरच येउन गेलो हे बँकेला कळावे म्हणुन. आईने सही केली.
२-३ महीन्यांनी परत अर्धी पेन्शन झाली. बँकेत चौकशी केल्यावर ते म्हनाले पंचायत समीतीकडुनच तेवढी आली. तिकडे गेल्या वर ते म्हनाले वसुली चालु केलीय. आता मला वाट्ले हे पंचायत समीतीकडुनच जादाचे आलेले पैसे वसुल करत आहेत.मी माहीती काढली ओळखीने तर ती अशी की पेंशन सिंगल झालीय आणी तेवढी बँकेत जातेय. पण पासबुकवर तर त्यातली अर्धीच जमा होतेय.
म्हणजे पंचायत समीतीकडुन पेंशन सिंगल झाली आणी ज्या बँकेत जमा होते तिथे पासबुकवर अर्धिच दाखवली जाते अर्धी घरासाठी जे कर्ज होते त्या बँकेकडे जातेय हप्ता म्हणुन. आपल्या़कडे फक्त पेन्शनचे पासबुक आहे कागदपत्र म्हणुन.
आता प्रश्न आहे की आपण कोर्टात कोणाला खेचायचे?
मुळात आपली बाजु वैध आहे काय?
पेंशन जी त्या व्यक्तिच्या पत्नीला मिळते त्यातुन वसुली करता येते का?
मूळात आपल्याला काहीही पत्र न देता पंचायत समीतीने पेन्शन अर्धी केली. आनी बँकेनेही त्यातील अर्धी परस्पर दुसर्या बँकेला कशी काय दिली.
आई फार शिकलेली नसल्याने तिने सही केलेला कागद बहुदा वसुलीला परवानगी दिल्याचा असावा अशी माझी शंका आहे.
आता नेमकं हे त्रांगडं सोडवायचं कस?
वाचने
2608
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
तुमच्या लिखाणावरून तुम्ही
In reply to तुमच्या लिखाणावरून तुम्ही by खटपट्या
आई गावाला मी मुंबईला असतो
वकिलाचा सल्ला घ्या
In reply to वकिलाचा सल्ला घ्या by पैसा
वकिलाचा सल्ला जरूर घ्या.