Skip to main content

हे मन सैरभैर....!

लेखक फिझा यांनी सोमवार, 11/08/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे मन सैरभैर....! मृगजळाच्या मागे धावते तप्त उजाड वाळवंट त्यात …. मोकळं मोकळं निळं आभाळ ढग पांढराही नसे त्यात …. दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. खोल खोल दाट काळोख आसवांचे काजवे त्यात … थकली पावलेही अंधारात मऊ मऊ काट्यांची वाट … दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. बरसुनही मुसळधार कधीचे परत दाटुनी आले त्यात …… प्रत्येकाचं भिजणं वेगळं पाऊसही चिंब आज तशात ………. दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. शांत भासतो समुद्र जरी फेकीतो लाटांवर लाट … छोटीच होडी वाचलेली , मोठी नौका गिळंकृत ……. दिसे बुडणारा सूर्यही कुठलासा ,इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. ठाव मनाचाच घेण्यासाठी रोखले श्वास आज उरात ……. पण श्वासातील अंतर ऐकावी फक्त धडधड जी हृदयात …… भासे !!! सापडले मन कुठलेसे …… इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. ............फिझा ……
लेखनविषय:

वाचने 1551
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कमाल केली आहेस!!! __/\__!!

कमाल केली आहेस!!! __/\__!!