Skip to main content

प्रेमाची कहाणी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 11/08/2014 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो । बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।। प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी । संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।। प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत । कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।। कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई । कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।। भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले । "ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।। आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग । तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।। परिणाम होवो काही । अनुभूतीला पर्याय नाही । प्रेमात पडता देही । वाटे हवाहवाई ।।५।। वाचणे नुसते प्रवासवर्णन । त्याहुनी प्रत्यक्ष फिरणे छान सकल जगाचे ज्ञान । अंगी येई ।।६।। म्हणून म्हणतो लोकहो । एकदा तरी प्रेम करा हो । पुढचे पुढे पाहो । जे नशिबी येई ।।७।। जो जिंकतो ह्या जुगारात । त्याचे दाखले दिले जातात । तिचे नाव त्याच्या शिधापत्रिकेत । दाखल होई ।।८।। काही न झाले तर बसावे शांत । समजावे हा आपुला न प्रांत । पुढील जन्मी असेल नशिबात । जाणावे ठायी ।।९।। अशी ही प्रेमाची कहाणी । ऐकावी मास श्रावणी । आठवणींचा गंध मनी । दरवळत राही ।।१०।।
लेखनविषय:

वाचने 2284
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

स्वसंपाद्नासाठी मदत दुवा हवा आहे….

प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। __________ प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :) छान!

In reply to by मार्क ट्वेन

आम्हाला नाही ब्वा मिसळीसारखं तिखटजाळ प्रेम करता येत …आम्ही आपले गोग्गोड प्रेम करतो

श्रावणातलं पारायण चांगलं जमलय!