Skip to main content

प्रेमाची कहाणी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 11/08/2014 10:56 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो ।

बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।।

प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी ।

संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।।

प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात ।

जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।।

प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत ।

कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।।

कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई ।

कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।।

भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले ।

"ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।।

आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग ।

तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।।

परिणाम होवो काही । अनुभूतीला पर्याय नाही ।

प्रेमात पडता देही । वाटे हवाहवाई ।।५।।

वाचणे नुसते प्रवासवर्णन । त्याहुनी प्रत्यक्ष फिरणे छान

सकल जगाचे ज्ञान । अंगी येई ।।६।।

म्हणून म्हणतो लोकहो । एकदा तरी प्रेम करा हो ।

पुढचे पुढे पाहो । जे नशिबी येई ।।७।।

जो जिंकतो ह्या जुगारात । त्याचे दाखले दिले जातात ।

तिचे नाव त्याच्या शिधापत्रिकेत । दाखल होई ।।८।।

काही न झाले तर बसावे शांत । समजावे हा आपुला न प्रांत ।

पुढील जन्मी असेल नशिबात । जाणावे ठायी ।।९।।

अशी ही प्रेमाची कहाणी । ऐकावी मास श्रावणी ।

आठवणींचा गंध मनी । दरवळत राही ।।१०।।

लेखनविषय:

वाचने 2305
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात ।

जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।।
__________

प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :)

छान!


In reply to by मार्क ट्वेन

आम्हाला नाही ब्वा मिसळीसारखं तिखटजाळ प्रेम करता येत …आम्ही आपले गोग्गोड प्रेम करतो