नमस्कार मिपाकर
सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे,
१) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच. `काढा देते करून चांगला' या काढ्याचं स्वरूप साधारण असं असतं की, चार कप (अंदाजे) पाणी घेऊन त्यात धने, जिरे, पाती चहा, थोडी मिरी या गोष्टी उकळवायच्या, पाणी अर्ध होईपर्यंत. गरम गरम प्यायचा. सर्दीवर जबर ईलाज. फरक पडायला दोन दिवस जातात पण सर्दी प्रदीर्घ काळासाठी बरी होते.
२) गरम पाणि विथ लिंबू - हे सतत, म्हणजे अक्षरशः कंटाळा आला की घेत रहावं. लिंबू सी विटॅमिन पुरवतं, प्रतिकार्शक्ती वाधते, सर्दी बरी होते.
३) सी विटॅमिन च्या गोळ्या - सेलिन किंवा लिमसी किंवा सिट्रावाईट नावांच्या च्युएबल, म्हणजेच चघळता येणा-या गोळ्या कुठल्याही औषधांच्या दुकानात मिळतात. त्या दिवसाला ४ खाणे. येता जाता मस्तपैकी. यांचा अपाय नाही. जास्त घेतल्या तरीही. यामुळेही सी विटॅमिन बूस्ट मिळतो, प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी बरी होते. आपसुक. हा उपाय एका डॉक्टरांनीच सांगितलेला आहे.
४) मासा खा - हा मी शोधलेला उपाय. आपापल्या जबाबदारीवर हे करावं. परंतु ही ट्रिक मला तरी लागू होते. सर्दी, खोकला, कणकण वाटली की हॉटेलात जाऊन (तुम्हास घरी बंदी नसल्यास घरी) एखादा पापलेट, सुरमई फ्राय खावा. तेल कमी सांगावं. माशातील बी विटॅमिन, प्रोटीन, इत्यादी गोष्टींमुळे ताकद येते, व सर्दी तापाची लक्षणं बळावण्याच्या आतच त्या गोष्टी दूर पळतात.
५) साखर निलगिरी - हा उपाय माझ्या चुलत भावाने सांगितला. इट वर्क्स. एक चमचा भरून साखर घ्यावी. त्यात दोन थेंब निलगिरी तेल टाकावं. आणि रात्री झोपताना खावं. वर पाणी पिऊ नये. सकाळी आराम मिळतो. पूर्ण नाही तरी बराच मिळतो. असंच दोन दिवस केल्यास पूर्ण बरं व्हायला होतं.
६) महासुदर्शन काढा - कुठल्याही औषधांच्या दुकानात मिळतो. सकाळ दुपार संध्याकाळ खाण्यानंतर घ्यावा. सर्दी गुल - ३ ४ दिवसात.
७) कपाळाला वेखंड लावणे - हाही आईचा उपाय. सर्दीमुळे डोकं धरलेलं असेल तर हे बेस्ट. गरम गरम चटके लागत वेखंड लावावं कपाळाला, छातीला. सर्दी पूर्णपणे खेचून घेतं. आराम मिळतो. हे गारही लावलेलं चालतं, नुसतं उगाळून.
असे अनेक उपाय आहेत. आत्ता इतकेच आठवले. माझी खात्री आहे तुम्हालाही असे अनेक हुकमी, हटके, उपाय ठाऊक असतील. ते वाचण्यास उत्सुक आहे...
वाचने
37668
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सोज्वळ उपाय सांगीतले
ठाऊक आहे !
In reply to अतिशय सोज्वळ उपाय सांगीतले by सुहास..
सर्दी झाल्यास वृद्ध
In reply to ठाऊक आहे ! by वेल्लाभट
बरोबर ओळखलंत.
In reply to सर्दी झाल्यास वृद्ध by धन्या
लोक स्व"देशी" चा आग्रह धरत
In reply to सर्दी झाल्यास वृद्ध by धन्या
पुजारी स्वदेशीच
In reply to लोक स्व"देशी" चा आग्रह धरत by नाव आडनाव
गरम पाण्यातून?
In reply to ठाऊक आहे ! by वेल्लाभट
मिपावर मध्यंतरी सर्दी वर गाढ
६० मिलीवोडका जाळुन त्याची
उपाय
+ १
In reply to उपाय by पिवळा डांबिस
'क्रोज ओव्हर व्हीटफील्ड' - व्हॅन गॉग
'यलो ऑकर' ची लिंक
In reply to 'क्रोज ओव्हर व्हीटफील्ड' - व्हॅन गॉग by एस
नाही सापडत.
In reply to 'यलो ऑकर' ची लिंक by संजय क्षीरसागर
जबरदस्त... कथा वाचण्याची
In reply to नाही सापडत. by एस
संदीप खरेची कथा??
In reply to 'क्रोज ओव्हर व्हीटफील्ड' - व्हॅन गॉग by एस
काळी मिरी + ६० मिली वोडका
झोपायच्या आधी तळपायाला
माहिती बद्दल धन्यवाद
मला अॅलर्जीची सर्दी होती.
जलनेती हा खात्रीशीर आणि जालिम
जलनेतीची माहीती दयाल का?
In reply to जलनेती हा खात्रीशीर आणि जालिम by पिंगू
धन्याशेठ,
In reply to जलनेतीची माहीती दयाल का? by धन्या
जलनेती प्रत्यक्ष शिकून
In reply to जलनेतीची माहीती दयाल का? by धन्या
धन्यवाद पिंगूशेठ आणि माउतै.
In reply to जलनेती प्रत्यक्ष शिकून by कवितानागेश
@ खात्रीशीर आणि जालिम उपाय >>
In reply to जलनेती हा खात्रीशीर आणि जालिम by पिंगू
हो, प्राणायामाचा नक्की फायदा होतोच
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात
In reply to सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात by सस्नेह
आरोग्यविषयक पुस्तकान्ची
In reply to सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात by धन्या
खेकड्याचा रस्सा प्यावा. >>>
In reply to आरोग्यविषयक पुस्तकान्ची by सस्नेह
खर सांगतो मला मागील 12 वर्षात
आमचे चार आणे
कोरफडीचा गर बाजारात विकत
In reply to आमचे चार आणे by स्पा
धन्य मिळत असावा,
In reply to कोरफडीचा गर बाजारात विकत by धन्या
@रात्री झोपताना (गार)
In reply to धन्य मिळत असावा, by स्पा
अंम्मळ गडबड होतेय काय ?
In reply to कोरफडीचा गर बाजारात विकत by धन्या
*
रोज
जुनी पुस्तके कपाट इत्यादीची
ह्या शिर्यात एक-दोन चमचे
In reply to जुनी पुस्तके कपाट इत्यादीची by कंजूस
टोटल विश्रांतीसाठी हा प्रकार
In reply to ह्या शिर्यात एक-दोन चमचे by पिंगू
सर्दीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर ती सुखदायी होते.
आयुर्हीत यांचा एकही प्रतिसाद
त्यांना व्यनि करा. ते सांगतिल
In reply to आयुर्हीत यांचा एकही प्रतिसाद by खटपट्या
किंमत.....
In reply to त्यांना व्यनि करा. ते सांगतिल by कवितानागेश
(No subject)
In reply to किंमत..... by प्रभाकर पेठकर
*डीसक्लेमर खालील माहिती
डिस्क्लेमरच्या छत्रीखाली बरीच