
काल बर्याच दिवसांनी मराठी नाटक बघण्याचा योग आला. नाटक बघण्यातली मजा, नशा काही औरच असते. पण ज्या प्रमाणात सिनेमे बघतो त्या प्रमाणात नाटके मी बघत नाही. त्याला कारण काही प्रमाणात नाटकेच कारणीभूत आहेत. विनोदाचा सरळधोपट फॉर्मुला वापरून आलेली बरीच नाटके बघून हिरमोड झाला असल्या कारणाने जेव्हा अर्धांगाचा फतवा निघाला, “बर्याच दिवसात नाटक बघितले नाही, ह्या आठवड्यात नाटकाला जाऊया.” आता ही विनंती नसून आज्ञा आहे हे इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर कळून चुकल्याने निमूटपणे, बघण्यासारखी काय काय नाटके चालू आहेत, ते बघायला बसलो (https://www.ticketees.com/). शक्यतो विनोदी नाटकांच्या वाट्याला जायचे नाही हे ठरवले होते. पण काही वेळ घालवावाच लागला नाही. ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ ह्या नाटकाचे पोस्टर बघितले आणि पोस्टर बघूनच नाटक फिक्स केले. मुख्य कारण म्हणजे मधुरा वेलणकर, माझा वीक पॉइंट. दुसरे कारण वेगळे आणि गूढतेचे वलय असलेले पोस्टर उत्सुकता चाळवून गेले. लगेच ऑनलाईन बुकिंग करून टाकले आणि बायकोला आश्चर्याचा धक्का देऊनच टाकला.
नाटकगृहात गेलो तर स्टेजवर दोन LCD मॉनिटर्सवर (डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक) नाटकांच्या जाहिराती चालू होत्या. मनात म्हटले, “च्यामारी, काळ बदलला! बालगंधर्वच्या प्रेक्षागृहात सर्वत्र कुबट वास पसरला आहे पण जाहिरातबाजीच्या शो साठी चक्क LCD मॉनिटर्स व्वा!” बायकोशी गप्पा मारता मारता सहज मागे बघितले तर अजून दोन दोन LCD मॉनिटर्स. जरा बुचकळ्यातच पडलो पण मनाशी म्हटले, “सोड LCD मॉनिटर्स, मधुरा वेलणकरला प्रत्यक्षात बघणार आहेस, कशी दिसेल प्रत्यक्षात ती?”
मिसळपाव
प्रतिक्रिया
जमल्यास बघीन...
नक्कीच बघणार!
नाटकाचा पूर्वार्ध उत्तम आहे..
In reply to नक्कीच बघणार! by अत्रुप्त आत्मा
बघायला हवं नाटक.
नाट्य आस्वाद उत्सुकता वाढवून गेला.
नाटकाचे परीक्षण बरेच सविस्तर
थीम छान वाटते
मी बघितलंय.