माफ करायचं...
लेखनप्रकार
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने.
मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर.
वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते.
माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.
ज्या व्यक्तीने दुखावले त्या व्यक्तीचा बदला घेण्याची भावना प्रबळ होत जाते.
हा सुड कसा घेता येईल याचे मन सतत चिंतन करु लागते.
समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या नादात आपणच सुडाच्या, क्रोधाच्या आगीत जळत राहतो.
किंवा अगदीच तसं झालं नाही तरी आपल्या दु:खाला कुणीतरी दुसरा कारणीभूत आहे या विचारांनी मन खिन्न होते.
तो असं बोलला नसता किंवा त्याने असं केलं नसतं तर हा विचार मनात पिंगा घालू लागतो.
दुसर्याला त्रास कसा देता येईल किंवा दुसर्यामुळे आपण कसे दु:खी आहोत या विचारांनी आपली झोप उडते.
आपणच पेटवलेल्या वणव्यात आपणच होरपळत आहोत हे आपल्या गावीही नसते.
हा वणवा विझवून आपण आपल्या जखमेवर हळूवार फुंकर मारु शकतो हे आपल्याला कळत नसते.
फार काही करावं लागत नाही त्यासाठी.
ज्याने आपल्याला दुखावले, शब्दांतून किंवा कृतीतून, त्याला माफ करायचे.
अगदी मनापासून.
तुमच्या-आमच्यासाठी माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले त्याच्याकडे दुर्लक्ष करणे.
खरं नाही ते तितकंसं.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं.
ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे.
मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
कधी कधी नुसताच स्पर्श राहतो.
मात्र असे माफ करण्यासाठी आपल्याला दुखावणार्या व्यक्तीला समजून घ्यावे लागते.
मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, करुणा निर्माण व्हावी लागते.
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे.
माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले, ती व्यक्ती माणूस म्हणून स्खलनशील आहे, तिच्याकडून चूका होऊ शकतात हे स्विकारणे.
माफ करणे म्हणजे दुसर्या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे.
आपणच पेटवलेल्या क्रोधाच्या, सुडाच्या वणव्यावर हळूवार फुंकर मारणे.
थोडासा आपल्याला दुखावणार्या माणसाचा विचार करायचा.
तो ही आपल्यासारखाच माणूस आहे, चूका करु शकणारा.
स्वतःबद्दलच्या आणि सभोवतालच्या जगाबद्दलच्या भ्रामक विचारांच्या जाळयात अडकलेला.
कुठेतरी सुरक्षितता, मान-सन्मान, स्विकृती शोधणारा.
परिस्थीतीवर ताबा ठेवू पाहणारा.
स्वतःच्या जगाबद्दलच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे भेदरलेला.
आणि या सार्याच्या मागे असलेला तो आहे तुमच्यासारखंच निसर्गाचे लेकरु, मनःशांतीच्या शोधात असलेला.
न जाणो त्याने लहानपणापासून काय झेललं असेल, कशा-कशाला तोंड दिलं असेल.
त्याला कसं घडवलं गेलं असेल, तो कसा घडला असेल.
कुठल्या विचारांना त्याने आपलंसं केलं असेल, कुठल्या विचारांना त्याने धुडकावून लावलं असेल.
आजचे त्याचे विचार, त्याची कृती कदाचित स्विकारण्याजोगी नसेल.
पण आत खोलवर कुठेतरी हा त्याच्यापरीने मार्ग शोधण्याचा प्रयत्न असेल.
म्हणूनच, सोडून दयायचं.
माफ करायचं...
वाचने
28321
वाचनखूण
प्रतिक्रिया
106
आवडलं आणि पटलंही!!
In reply to आवडलं आणि पटलंही!! by सूड
+१
छान लेख.
In reply to छान लेख. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
एक चुक माफ करु शकतो नव्हे
लेख उत्तम आहे, पण अंशतःच पटला
लिखाण आवडलं.
In reply to लिखाण आवडलं. by प्यारे१
बर्याचदा व्यक्ती स्वभावाच्या
In reply to बर्याचदा व्यक्ती स्वभावाच्या by धन्या
दारुचा अम्मल नि स्वभावाचा
केलं.. मिपावरच्याच एका आयडीला
In reply to केलं.. मिपावरच्याच एका आयडीला by पिलीयन रायडर
खुप "ब्याटींग" करायचा का "तो"
In reply to खुप "ब्याटींग" करायचा का "तो" by टवाळ कार्टा
दोन्ही चुक..!!
In reply to दोन्ही चुक..!! by पिलीयन रायडर
संतोष जाहला
In reply to केलं.. मिपावरच्याच एका आयडीला by पिलीयन रायडर
बेशर्त स्विकृती
मस्त लिहिलं आहेस धन्या. आवडलं
In reply to मस्त लिहिलं आहेस धन्या. आवडलं by यशोधरा
+१
धन्यवाद..
लेख
In reply to लेख by तिमा
झालेली घटना पुर्णतः पुसून
In reply to लेख by तिमा
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण
In reply to लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण by विलासराव
सुंदर प्रतिसाद विलासराव.
In reply to लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण by विलासराव
जबरदस्त !!
In reply to जबरदस्त !! by अर्धवटराव
प्रयत्न करुन पहातो.तीन
In reply to प्रयत्न करुन पहातो.तीन by विलासराव
सगळं पटतं...
In reply to सगळं पटतं... by अर्धवटराव
जेनेटीक बदल असेच होतात. शरीर
In reply to सगळं पटतं... by अर्धवटराव
जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर,
In reply to जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, by विलासराव
छान!
In reply to जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, by विलासराव
विलासरावांचे प्रतिसाद बर्याच
In reply to लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण by विलासराव
खूप सुरेख प्रतिसाद. आवडला.
In reply to लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण by विलासराव
विलासरावांना इतक्या दिवसांनी
In reply to विलासरावांना इतक्या दिवसांनी by कवितानागेश
माउ जरी मला विपश्यनेची अगोदर
In reply to माउ जरी मला विपश्यनेची अगोदर by विलासराव
मंगलमैत्री म्हणजे? आणि ती
In reply to मंगलमैत्री म्हणजे? आणि ती by यशोधरा
मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात
In reply to मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात by विलासराव
अच्छा. ओके.
In reply to मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात by विलासराव
मंगलमैत्री पोचते.
मस्त रे आवडलं
लिहितोस, छान लिहितोस.
नाय नाय नाय
In reply to नाय नाय नाय by प्रसाद गोडबोले
>>अज्याबात माफ करायचं नाय
In reply to >>अज्याबात माफ करायचं नाय by सूड
हे घे
अथर्ववेद संहिता
*diablo*In reply to हे घे by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by बॅटमॅन
खि:खि
In reply to खि:खि by स्पा
खि:खि नाय रे मेल्या खूंखार !!
In reply to खि:खि by स्पा
त्यांचे प्रताप इतके मोठे होते
In reply to त्यांचे प्रताप इतके मोठे होते by बॅटमॅन
गो प्रो ककन्शि सह्म्त
In reply to गो प्रो ककन्शि सह्म्त by स्पा
मि प्न तुझ्हयशि सह्मत.
In reply to >>अज्याबात माफ करायचं नाय by सूड
सूड
महाभारत . वनपर्व २८ -६ -८
हेच आमचे ह्या विषयावरील अंतिम मत !! येवढे बोलुन मी माझे चार शब्द सम्पवतो !In reply to सूड by प्रसाद गोडबोले
आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना.
In reply to आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. by प्यारे१
तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही
In reply to तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही by बॅटमॅन
सूडातून तात्कालिक समाधान
In reply to सूडातून तात्कालिक समाधान by प्यारे१
हॅ हॅ हॅ. नुसती बडबड जशी
In reply to आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. by प्यारे१
>> माझ्या मते लेखातल्या
In reply to आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. by प्यारे१
"आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना
In reply to "आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना by स्वप्नांची राणी
आमी काय बोल्लो का ताई?
In reply to नाय नाय नाय by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ by बॅटमॅन
हरकत नाही.
In reply to हरकत नाही. by धन्या
आमच्या मते
In reply to आमच्या मते by प्रसाद गोडबोले
बाजीला महाराजांनी मारले हे
In reply to बाजीला महाराजांनी मारले हे by बॅटमॅन
सहमत. आणि त्या धाडीत
In reply to आमच्या मते by प्रसाद गोडबोले
रैट्ट.
In reply to नाय नाय नाय by प्रसाद गोडबोले
अगदी असच म्हणावसं वाट्टं, पण
माफ करायचे
Always Forgive the Wrongdoers
In reply to Always Forgive the Wrongdoers by मृत्युन्जय
असेच म्हणतो
असं कसं चालेल? परत फसवलं तर?
In reply to असं कसं चालेल? परत फसवलं तर? by यसवायजी
अशा वेळीही माफ करायचं. मात्र
In reply to अशा वेळीही माफ करायचं. मात्र by धन्या
मात्र तसे करत असताना मनात
In reply to मात्र तसे करत असताना मनात by यसवायजी
गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच
In reply to गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच by धन्या
(No subject)
एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल
In reply to एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल by एसमाळी
माफ करणे म्हणजे समोरच्याचे
खूप आवडलं.माफ करणे म्हणजे
अंशतः सहमत.
In reply to अंशतः सहमत. by प्रभाकर पेठकर
i forgive my enemies but
In reply to अंशतः सहमत. by प्रभाकर पेठकर
सहमत..
आवडला.
सुन्दर
छान विचार मांडलेत.
कळतेय, वळत मात्र नाहीये, फक्त
लेख
प्रत्येक वेळी माफ करण शक्य नसत
स्वाल्लिड रे धन्या!
अजुन लिही ...
छान लिहिलंस
In reply to छान लिहिलंस by पैसा
अत्यंत सहमत. बहुतेक वेळा
In reply to अत्यंत सहमत. बहुतेक वेळा by नगरीनिरंजन
दिल के बात
मोठ्या मनाची लक्षणं आहेत हि.
कुछ इस तरह मैंने अपनी जिंदगी
In reply to कुछ इस तरह मैंने अपनी जिंदगी by मनिष
क्या बात है।
In reply to कुछ इस तरह मैंने अपनी जिंदगी by मनिष
सुंदर आणि समर्पक ओळी !!!
बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण