शाळेत असतांना एक कविता शिकलो होतो ती अशी होती.
आडवाटेला दूर एक माळ । तरू त्यावरती थोरला विशाल ।
आणि त्याच्या बिलगूनिया पदासी । जीर्ण पाचोळा पडे तो उदास ।।
इथे तर हमरस्त्यापासून जवळच ओक, मेपल आदि ताडमाड उंच वृक्षांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या आणि त्यांच्या पायथ्याशी गळलेल्या पानांचा इतका खच पडला होता की त्याखालची जमीन व त्यावर उगवलेली हिरवळ त्या पाचोळ्याच्या दाट थराखाली झाकली गेली होती. हे आता वाढतच जाणार होते आणि वार्याच्या झुळुकेने त्यातल्या कांही पानांना उडवले तरी ती बाजूला पडलेल्या पाचोळ्याचा थरच वाढवत होती.
प्रतिक्रिया
छान
चित्र
पाचोळा