Skip to main content

बोले तो ...!!!

लेखक योगी९०० यांनी गुरुवार, 31/07/2014 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते. त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका.. 1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही. 2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे.. 3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव... 4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून... 5) ह्या..!! रोज रोज काय italian खायचे म्हणून आज Indian food च बनवले.. 6) चार्ली रेड का !!! छान वास आहे. मला आता अरमानीचा कंटाळा आला आहे. 7) मला ईमेल कर मी घरी जाऊन वॉश घेतला की निवांत पाहीन माझ्या आय-पॅडवर... 8) आजकाल रिक्षावाले फार माजूरड्यासारखे चालवतात. कालच माझ्या होंडा सिटीला एकजण धडकणार होता.. 9) खूप काम आहे राव...घरनं पण ऑफीसची भांडी घासतोय...उगाच प्रमोशन accept करून मॅनेजर झालो. त्यापेक्षा सिनीयर टिममेट होतो तेच बरे होते. 10) आमची ही फारच भारी बिर्याणी बनवते. परवा कमिशनरसाहेबांनी तर चारदा मागून खाल्ली. 11) अय्या किती मोठी झाली ग ही...!! शी बाई...!! उगाच यांच्याबरोबर स्वीडनला राहीले. त्यामुळे तुझ्या मुलीचे बालपण मिस केले ना मी... 12) काल अण्णांचा आवाज बरोबर नाही लागला मैफीलीत...त्यापेक्षा राहूल देशपांडे बरेच उजवे गायला. अण्णा स्वतः मला म्हणाले की आता त्यांना रिटायर व्हायला हरकत नाही. (नेहमीप्रमाणे हे एक गंमत म्हणून घ्या... कोणालाही टारगेट केलेले नाही येथे...).

वाचने 27517
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

हा अनुभव बर्याच वेळेला आलेला आहे.

In reply to by हाडक्या

प्रत्येक धाग्यावर मी पयला प्रतिक्रिया देतो..मराठी वाचायला वेळ आहे कोणाला?...माझ्या सेक्रटरीला सांगून ठेवलेय की नवीन लेख पडला की "मी पयला" असे पडलेच पाहिजे, नाहीतर तुझे appraisal ताजऐवजी कोठल्यातरी ३ स्टार हॉटेलमध्ये घेईन. (म्हणजे appraisal घेणार म्हणजे घेणारच...फक्त जागा बदलीन).

In reply to by योगी९००

अरे व्वा.. छानच आहे की तुमची "अप-रेझल"ची पद्धत. :D 8)

वैताग आला बाबा सारखा विमानाने प्रवास करुन आजकाल मी एस टी ने कमी आणि विमानाने जास्त फिरतो.

त्याचं काय आहे न…की समोरचा त्यांना हवा तसा प्रश्न विचारत नसतो काही केल्या…ह्यांचा जीव इथे वर खाली…. बर माहिती तर सगळी द्यायची असते इत्थंभूत, पण फक्त स्वतःविषयी (थोडक्यात स्वताचे तुणतुणे वाजवून दाखवायचे असते !) पण समोरचा ह्यांना हव्या त्या मुद्द्यावर येत नसल्यामुळे ह्या अशा प्रकारातून त्यांना तो विषय त्यांना हवा तसा फिरवायचा आणि असं काहीतरी वेचक/ वेधक/दिलखेचक बोलावंच लागतं …इलाज नाही हो त्याला …

मी मुलींकडे बघतही नाही पण (जीन्स पँट आणि लूझर शर्ट परीधान केल्याने) त्याच माझ्याशी बोलायला येतात.

Mazhyaa Ipad Air varoon marathi lihita yet nahiye koni help karel ka pls!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

१. पैशाचं आपल्याला काही वाटत नाही. परवाच अमुक एवढे दिले एका संस्थेला. निनावी बरंका. नाव करुन करायचं काय नाहीतरी? २. अहंकार, मीपणा वगैरे अजिबात नाही हो आपल्याला. परवा एका कार्यक्रमात गेलेलो. स्टेजवरुन बोलावणं आलं राजांनी पाहिल्याबरोबर. पण म्ह्टलं इथंच बरंय. कार्यक्रम रंगात आलेला असताना आपल्यामुळं कशाला उगाच त्रास. शेवटी जेवायला नेलंच. ३. पाऊस. भयाण पाऊस. २० घरांची वाडी. वीज नाही, घरं पडायला आलीत. मंडळाची पोरं आणि मी. आणलंय शक्य तेवढं. जमेल. (फोटोसहित) ४. थँक्स गॉड! बेस्ट डे ऑफ माय लाईफ. (फोटो आहेच)

हा हा, मस्त! वाचत राहीन, पण आपण सगळेचजण अनवधानाने काही ना काही बोलून जात असतो. आठवले तर लिहीन. एकदा एकांकडे गेल्यावर (त्यांनी बोलावले म्हणून) घरच्या सधन मालकिणबाईनी सगळ्यांपुढे चहा ठेवला व "मी आणि माझी मुलगी आज शॉपिंग स्प्रीवर आहोत" असे म्हणून निघून गेल्याचे अंधुकसे आठवते. अगदी (मराठी) शाळकरी असल्याने मला काहीच समजले नव्हते. तसेही त्यावेळी शॉपिंगला जाणे हे मध्यमवर्गात फारसे प्रचलित नव्हते. नस्ते खर्च कमी करण्याकडेच कल असे (आणि तसे करताना कधीकधी अतिरेक होई.) तर स्प्रीवर कसे जाणार? ;) त्यावेळी हे लोक खूपच श्रीमंत आहेत एवढेच जाणवले होते.

In reply to by रेवती

पब्लिक मध्ये वाटण्यासाठी conversation pieces म्हणून भरपूर खाद्य मिळणार आहे, तेंव्हा हा धागा वाचत रहायला हवा :-) [8 हा क्रमांक टाईप करून कंस दिला की 8) ही स्मायली तयार होते हे कळलं ;-) ]

हल्ली कोणी विचारलं नाही तरी मी युरोपातील रस्ते, तिथली शिस्त आणि भारतातील रस्ते आणि आपली बेशिस्त ह्यावर, उगाच येताजाता उसासे सोडत असतो. कांही जणं गळाला लागतात आणि युरोप सहलीचा तपशिल विचारतात. 'आम्हालाही कधीचं जायचं आहे पण पैशाची गणितं जमत नाहीत.' वगैरे ऐकवतात. तेव्हढंच बरं वाटतं. त्यात नवल काय वाटून घ्यायचं? खरं ते बोलायला लाज कसली?

एका मैत्रिणीचं मुक्ताफळ - 'ए मला तुझ्या गाडीवर ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करायला देशील? नाही, माझ्या नवर्‍याची बीएमडब्ल्यु आहे म्हणून!'

In reply to by कपिलमुनी

शेपूच्या भाजी वर लक्ष देऊ नका...ते मी सहज म्हणून लिहीलेयं.. काल मी द लिला मध्ये होतो/होते त्यावर जोर देवून बोला मग तेथे तुम्ही काही का खाईना....ऐकणार्‍या आधीच गप्प झाला असतो...

बर्‍याच वेळा लोक नकळत बोलून जातात. त्यात वट वगैरे काही असेल का? वाटत नाही. सगळेजण सारखे नसतात.

आपल्या घराची किंमत १ कोटी झालिय. शाटमारी! आपण कोणाला घाबरत नाय आता. (अरे पण शहाण्या , तु ते घर विकणारेस का? लुंगी,बनियन घालून मरेपर्यंत तिथेच रहाणारेस.)

In reply to by बबन ताम्बे

हे निदान काहीतरी बोलणे झाले हो, नाहीतर अगदी सहज म्हणल्यागत "काय किमती वाढल्यात घरांच्या, आता आमच्या या दहा लाखाच्या मठीची किंमत १ कोटी झालीये, काय महागाईचे दिवस आलेत."

मौर्याला खाल्ले पण स्वीसच्या "ला फोन्तेनेला" ची चव नाय त्याला. ( हे खरेच आहे बरं)

In reply to by इरसाल

पण पण पण.. या धाग्यात अपेक्षित असलेल्या वाक्यांना जरा वेगळा टोन असतो.. म्हणजे वर म्हटलेल्या स्विस ला फोन्तेनेलाची चव नाही या ऐवजी.. अर्रे इतालीत रोमा फिरेन्सेत आणि नापोली व्हेनिसात सगळीकडे खाल्लेल्या पिझ्झांपेक्षा आपल्या नाक्यावरच्या "सत्कार"मधेच पिझ्झा ब्येष्ट वाटतो मला.. अशा टाईपमधली कायतरी.. ;)

हो असे कमेंटस बर्‍याचदा ऐकलेत

आम्ही कधी काकांकडे गेलो की आमचा चुलत भाउ लगेचच त्याच्या बायकोला सांगतो , " अगं कालच जो ११ लाखाचा चेक आलाय तो जरा दाखव बघु" दर वेळी अमाउंट बदलते पण वाक्य तेच.

अहो तुम्हाला सांगतो, परवा एक गंमतच झाली, मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं!

In reply to by वामन देशमुख

मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! - हे भारीच! रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? ह्या धाग्यावर परत यावं लागणार हे खरं.

In reply to by वामन देशमुख

@वामनपंडित... परवा एक गंमतच झाली, मी चेन्नैला ला मेरिदिअन हॉटेलात उतरलो होतो. माझ्या बाजूच्याच रूममध्ये जगजीत सिंगजी होते, ते तिथं आहेत हे मला माहीत नव्हतं, आणि मी त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये आहे हे त्यांनाही माहीत नव्हतं! जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. म्हणून सखी ताईंनी तुम्हाला रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो? असे विचारले असावे. तुम्ही कदाचित उदाहरण म्हणून जगजीतसिंगाचे नाव घेतले आहेत . पण सखी यांचा गैरसमज झाला असावा.

In reply to by योगी९००

जगजीतसिंगाना जाऊन तीन वर्षे झालीत. - म्हणुनच विचारले, अर्थात इथे कोणीही प्रसिद्द व्यक्ती उदाहरण म्हणुन चालुन जाऊ शकते, म्हणुनच गैरसमजही नाही :)

In reply to by सखी

@योगी ९०० स्पष्टीकरणाबद्धल धन्यवाद. @सखी आपलं, "रच्याकने: हे ला मेरिदिअन स्वर्गातलं का हो?" हे मला योगी ९०० यांचं स्पष्टीकरण वाचेपर्यंत खरंच कळलं नव्हतं! हा धागाच फेकाफेकीचा होता म्हणून मी आपला एक किस्सा फेकला! आता माझं रच्याकने: आमच्या "परवा"चा अर्थ या धाग्यावर मिळेल: http://www.misalpav.com/node/21247

+१ कविता!! मला पण लिहायचेत काही नमुने...पण परांजपे मधे घर बूक करतेय, लिहितेच मग. ८०,०००,०००.०० ट्रन्सफर लिहिल कि हे बँकवाले पण तिन-तिनदा वेरीफीकेशन मागतायेत..

यातून आइफोन कंपनीपण सुटली नाही .कोणाला मेसेज एसेमेस करायचा तर त्यांच्या अॅपमधूनच की आपोआपच 'सेँट फ्रॉम आईफोन'चे चुंगम त्याबरोबर चिकटून जाते .मार्केटिंगच्या लबाडीशिवाय वेगळे काही नाही त्यात .

In reply to by कंजूस

'सेँट फ्रॉम आईफोन' सगळ्याच कुम्पण्या करतात असं. "सेंट फ्रॉम अमुकतमुक फोन" ही एक default signature (?) असते आणि आपल्याला बदलता येते.

मलाही लिहायचंय, पण कोथरुडात बंगला कधी घेताय म्हणून बिल्डर सक्काळपासून चारदा फोनवतोय च्यायला. आता माणसानं फोन घ्यायचा का कामं करायची? तरी बरं नरिमन पॉइंटला परवाच दोन फ्लॅट घेतले.

In reply to by धन्या

हो हो, मी स्विडनहून आल्याआल्या आपण भेटलो तेंव्हा आमच्या नव्या बंगल्यात भेटायाला आल्यावर तुम्ही म्हणाल्याचे आठवते आहे खरे! माफ करा, त्या दिवशी आम्हाला डायमंडच्या खरेदीला जायचे असल्याने आपले फारसे बोलणे झाले नाही. ;)

In reply to by रेवती

हरकत नाही. आम्ही पुढच्या महिन्यात सुदानला जाणार आहोत. तेव्हा आम्हाला आमच्या मित्राच्या छोटया मुलीसाठी तनिश्कमधून शॉपिंग करायची आहे. तेव्हा वेळ काढून तुमच्या घराकडे चक्कर टाकू.

मी आपला सेकंड-हँडवाल्या दुकानातुन वापरलेला लाकडी पलंग विकत घेत होतो तर आमची ही म्हणाली की आहो, आपल्या शेदार्‍यांनी घर सोडतांना आत्ताच एक जुना पलंग बाहेर आणुन ठेवलाय. तुम्ही लगेच घरी या तो आत आणुन ठेवायला. आणि हे ही सहजपणेच बर्का..

अहो आम्हाला आमची १ वर्ष जुनी ऑडी चालवुन आता कंटाळा आला, पुढच्या महिन्यात बीएमडब्ल्यु ५ सिरीझ घेणार आहोतच, पण म्हंटले की उद्या पोर्षची टेस्ट-ड्राईव्ह घेवुन बघुया. तुमच्याकडे उद्या नक्की आलो असतो हो, पण तुमच्या घरासमोरचा रस्ता फारच छोटा आहे. आणि तुमच्या पार्किंग मधे नाही ना बसणार पोर्ष. पुढे वेळ काढुन नक्की चक्कर टाकु.

या लोकांची एक पेश्शल कॅटेगोरी म्हणजे 'रिव्हर्स स्नॉबरी' मारत फिरणारे लोक. आपण साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे पाईक कसे आहोत याचे मासले जातायेता दुसर्‍यांच्या तोंडावर फेकत हे लोक फिरत असतात. - आजकाल इंग्लिश मिडियममधे साली सगळी ड्रायव्हरांची आणि भाजीवाल्यांचीच पोरं जातात. आमच्या हिंदुत्वला आम्ही सरस्वती मराठी मिडियममध्येच घातलं. तिथे कसं ब्रा.... आपलं... मराठी.... वातावरण असतं. - हॅ!... आपल्याला त्या स्मार्टफोन आणि बिर्टफोनशी काही घेणंदेणं नाही. गेली नऊ वर्षं हा नोकिया वापरतोय. - (पिणार्‍या मित्रांच्या घोळक्यात बसून शक्य तेवढ्या तुच्छतेने पहात) आपण ना, असलं काही कधी तोंडाला लावलं नाही आणि लावणार पण नाही. - साले गठ्ठ्याने जाऊन तिकडे हमाली करतात. तुला सांगतो ९८ मधे मला युएसची परमनंट ऑफर दिलेली. पण मी गेलो नाही. काये ना आपला देश आपली संस्कृती आपलं यांव आपलं त्यांव......

In reply to by मार्क ट्वेन

हवेत कशाला ते चोचले? अहो हल्ली अपघात किती होतात विमानाचे, त्यापेक्षा आपली मायबाप सरकारची लाल पिवळी बरी.

In reply to by भिंगरी

हो ना ग...भिंगरी, केवढे वाढलेयत ना विमानांचे अपघात! मी कालच मुकेश ला फोन करुन सांगुन टाकल ' मला ईंडियात बोलावतोस तर चार्टर्ड पाठव, मी नाही बाई यायची एमिरेट्स्नी...बिजनेस क्लास असला म्हणून काय झालं'

In reply to by रेवती

>> क्लास कोणताही असो, कोसळायच्यावेळेला सगळेच कोसळतात! अक्षरशः "कातिल" जोक आहे हा.. =)) क्लासच.. 8) (ह्या स्मायलीशोधाबद्दल योगीराजांचे धन्यवाद.)