आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच!
साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी.
कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी. उकळी आली की भाजलेला रवा मिसळावा. नीट मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. थाळ्याला तूपाचा हात लावावा. रवा व्यवस्थित शिजला की मिश्रण थाळ्यात पसरावे, थापताना वर ओले खोबरे पसरून थापावे. आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात.
मस्त कणीदार तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाव्या.


वाचने
17593
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
येस,
अरे बापरे जातिण लिहीले होय!
In reply to येस, by ज्ञानोबाचे पैजार
वा..
जात्याची बाय्को
मस्त!
सुरळीच्या वड्या....
खांडवी कि खमणी ?
In reply to सुरळीच्या वड्या.... by प्रभाकर पेठकर
खाडवी आणि सुरळीच्या वड्या.
In reply to खांडवी कि खमणी ? by अत्रन्गि पाउस
काय झोल आहे !!!
In reply to खाडवी आणि सुरळीच्या वड्या. by प्रभाकर पेठकर
मी अजूनपर्यंत खांडवी
मस्त...
जातीण
मस्त आहे गं हि पाकृ. मी
.
In reply to मस्त आहे गं हि पाकृ. मी by Mrunalini
मस्तच...आहे..!
मला प्रचंड आवडते खांडवी
सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली
अनन्न्याजी, खांडवी अप्रतिम झाली आहे . मस्त
अहाहा!!
शिर्याच्या रव्याची केली की
In reply to अहाहा!! by सानिकास्वप्निल
लापशी रवा
In reply to शिर्याच्या रव्याची केली की by सूड
लापशी रवा भाजून घेतेस का? तो
In reply to लापशी रवा by सानिकास्वप्निल
हो
In reply to लापशी रवा भाजून घेतेस का? तो by कवितानागेश
सर्वांचे आभार!
ओह ओके. मग इडलीचा रेडी रवा
In reply to सर्वांचे आभार! by अनन्न्या
होय गं, तोच! विकतचा इडली रवा
In reply to ओह ओके. मग इडलीचा रेडी रवा by Mrunalini
हो चालेल गं!
In reply to ओह ओके. मग इडलीचा रेडी रवा by Mrunalini
ग्रेट. मग माझ्याकडे आहे ईडली
In reply to हो चालेल गं! by अनन्न्या
नारळाच्या दुधाबरोबर... मस्त..
मस्त
खर तर असं म्हणायचं होतं: नारळ
In reply to मस्त by सखी
मस्त
मस्त पाकृ.
वेगळ्याच प्रकारची खांडवी..
कोकणात ही
In reply to वेगळ्याच प्रकारची खांडवी.. by मयुरा गुप्ते
अप्रतिम....उचलून तोंडात
मस्त
हा प्रकार तसा फार पूर्वीचा!
मस्तच आहे जे काही आहे ते.