Skip to main content

स्टर फ्राइड चायनिज चिकन

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 30/07/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
.
साहित्य- ५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची १/२ वाटी प्रत्येकी- चौकोनी तुकडे. रंगीत मिरच्या उपलब्ध नसतील तर हिरवी भोपळी मिरची २-३ कांदापाती,१ मध्यम कांदा पेरभर आलं , २ मोठ्या किवा ३-४ लहान लसूण पाकळ्या २ सुक्या लाल मिरच्या १ टेबलस्पून शेजवान सॉस २टेबलस्पून सोयासॉस १ टीस्पून मिरपूड १/२ चमचा साखर २ टेबलस्पून वाइनविनेगर, ते उपलब्ध नसेल तर साधे विनेगर + कुकिंगवाइन/व्हाइटवाइन प्रत्येकी १-१ टेबलस्पून, अथवा २-३ टेबलस्पून लिंबाचा रस + १ टेबलस्पून कुकिंगवाइन/व्हाइटवाइन (ज्यांना वाईन नको असेल त्यांनी घालू नये.) २ टेबलस्पून कॉर्नस्टार्च १/४ चमचा एमएसजी (अजिनोमोटो) -ऑप्शनल मीठ चवीनुसार २ चमचे तेल +१चमचा ऑलिव ऑइल कृती- चिकनपिस धुवून साधारण इंचभराचे लांब लांब तुकडे करून घ्या. त्यात १चमचा ऑलिवऑइल, २ चमचे वाइनविनेगर, १चमचा मिरपूड, १चमचा सोयासॉस, १चमचा कॉर्नस्टार्च घाला, किंचित मीठ घाला व चिकनपिसना ते चोळा, एकत्र करून मुरवत ठेवा. रंगीत भोपळी मिरच्यांचे चौकोनी तुकडे (जरा मोठेच)करा. कांदा चौकोनी चिरा.तुकडे थोडे मोठेच असू द्या. आलं व लसूण बारीक चिरा. कांदापात बारीक चिरा. एका कढईत चमचाभर तेल गरम करा, त्यात मोठ्या आचेवर लसूण व आल्याचे तुकडे घाला व परता. लाल मिरच्या घालून परता. कांदा , भोपळीमिरच्या घालून परता. किंचित मीठ घाला. सोयासॉस, शेजवानसॉस घाला व परता. भाज्या क्रंचीच राहू द्या, त्या बाजूला काढून ठेवा. सर्व वेळ आच मोठी राहू द्या. आता त्याच कढईत चमचाभर तेल घालून गरम करा, त्यात चिकनचे मुरवलेले तुकडे घाला व मोठ्या आचेवर परतत रहा, चिकन शिजू द्या. पण क्रंची राहू द्या. चिकन झाले की त्यात भाज्या घाला व एकत्र करा. थोड्या पाण्यात कॉर्नस्टार्च विरघळून घाला. आपण भाज्यांमध्ये व चिकनमध्ये मीठ घातलेले आहे व एमएसजीही खारट असते हे लक्षात घेऊन मीठ व एमएसजी घाला. किंचित साखर घाला. कांदापात घाला. सर्ववेळ आच मोठी राहू द्या. फ्राइड राइस अथवा न्यूडल्स बरोबर खा.
.
तळटीप- गटारीसाठी ही पाकृ केली पण मिपाचा संप असल्यामुळे श्रावणातला असला तरी बुधवार पाहून येथे देत आहे.तरी श्रावण्,श्रावण.. करु नये!

वाचने 10495
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

स्वति तै, तुमने मुजे बिहि मर डला. कुहुप दिव्सनी तोनडाला पानि सुतेल असे रेसिपि पहिलि. धेउरोडल्ला कुथे अस चिनिज भेतेल का? कुनि मला सनगु शकील क?

झक्कास.. आमचे गुरुजी म्ह्णतात... काय वाट्टेल ते पाळा पण खाण्याचे आणि पिण्याचे बंधन पाळू नका... त्यामुळे हे असे पदार्थ बिंधास्त टाका...

खल्लास.... बाकी काय शब्दच नाय !!! श्रावणमध्ये मास मच्छी स्वस्त होणार, त्यामुळे अजून नॉनवेज पाककृती येऊ देत ;-)

In reply to by दिपक.कुवेत

येस्स! मस्तच दिसतय. आम्ही पनीर, मशरुम्स, बटाता, सोयाचन्क्स, सुरण(?) असं काहीही घालू शकतो.

तुम्ही, वरच्या सानिकातै, ते मधल्या आळीतले पेठकरकाका आणि दिपकभौ, तो गायबलेला गणपा, अजून त्या भिंगरीमॅम, जागुतै, अजून कोण राहिलं ते सर्वजण, तर तुम्हां सर्वांना प्राणिपात! (सतिशरावांकडून शब्द उधार). कारण असं की, तुमच्यामुळे माझं वजन कमी होण्यास जाम फायदा होतोय. इतक्या सुंदर सुंदर डिशेस आणि तोंपासु फोटो पाहिले की नेहमीचं जेवण मिळमिळीत वाटू लागतं. मग आम्ही कमी जेवतो. मग ह्या पाकृ करून पाहायचा अंगभूत कंटाळा येतो. मग आम्ही हेही खात नाही. मग आमचं वजन कमी होत जातं. मग लोक आमच्या घेरा देहगडाकडे कौतुकाने बघू लागतात. मग आम्हीही ठोकून देतो, "मिपावलकरांचं प्याकेज घेतलंय क्र्याश कोर्साचं. मग!" तर मग पुन्हा एकदा आभार. अशाच एकसे एक पाकृ टाकत रहा.

मस्त फोटो.. चिकनच्या ऐवजी पनीर वगैरे घालुन करायचा नुसताच विचार करु.. किंवा मग हाटिलात जाऊन हादडु.. (तिथे पण एवढं सुंदर दिसत नाही..) इतकं निगुतीनं करायचं कुठलंच काम आपल्याकडुन होणार नाही..

आकर्षक छायाचित्र आणि तपशिलवार पाककृती. चीनी पाककृत्या आवडतातच. त्यात माझा श्रावण-बिवण नसल्याने पहिली संधी मिळताच करून पाहणार/खाणार आहे.