साहित्य-
५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस
हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची १/२ वाटी प्रत्येकी- चौकोनी तुकडे. रंगीत मिरच्या उपलब्ध नसतील तर हिरवी भोपळी मिरची
२-३ कांदापाती,१ मध्यम कांदा
पेरभर आलं ,
२ मोठ्या किवा ३-४ लहान लसूण पाकळ्या
२ सुक्या लाल मिरच्या
१ टेबलस्पून शेजवान सॉस
२टेबलस्पून सोयासॉस
१ टीस्पून मिरपूड
१/२ चमचा साखर
२ टेबलस्पून वाइनविनेगर, ते उपलब्ध नसेल तर साधे विनेगर + कुकिंगवाइन/व्हाइटवाइन प्रत्येकी १-१ टेबलस्पून,
अथवा २-३ टेबलस्पून लिंबाचा रस + १ टेबलस्पून कुकिंगवाइन/व्हाइटवाइन
(ज्यांना वाईन नको असेल त्यांनी घालू नये.)
२ टेबलस्पून कॉर्नस्टार्च
१/४ चमचा एमएसजी (अजिनोमोटो) -ऑप्शनल
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल +१चमचा ऑलिव ऑइल
कृती-
चिकनपिस धुवून साधारण इंचभराचे लांब लांब तुकडे करून घ्या.
त्यात १चमचा ऑलिवऑइल, २ चमचे वाइनविनेगर, १चमचा मिरपूड, १चमचा सोयासॉस, १चमचा कॉर्नस्टार्च घाला, किंचित मीठ घाला व चिकनपिसना ते चोळा, एकत्र करून मुरवत ठेवा.
रंगीत भोपळी मिरच्यांचे चौकोनी तुकडे (जरा मोठेच)करा.
कांदा चौकोनी चिरा.तुकडे थोडे मोठेच असू द्या.
आलं व लसूण बारीक चिरा.
कांदापात बारीक चिरा.
एका कढईत चमचाभर तेल गरम करा,
त्यात मोठ्या आचेवर लसूण व आल्याचे तुकडे घाला व परता. लाल मिरच्या घालून परता.
कांदा , भोपळीमिरच्या घालून परता. किंचित मीठ घाला.
सोयासॉस, शेजवानसॉस घाला व परता.
भाज्या क्रंचीच राहू द्या, त्या बाजूला काढून ठेवा.
सर्व वेळ आच मोठी राहू द्या.
आता त्याच कढईत चमचाभर तेल घालून गरम करा, त्यात चिकनचे मुरवलेले तुकडे घाला व मोठ्या आचेवर परतत रहा, चिकन शिजू द्या. पण क्रंची राहू द्या.
चिकन झाले की त्यात भाज्या घाला व एकत्र करा.
थोड्या पाण्यात कॉर्नस्टार्च विरघळून घाला.
आपण भाज्यांमध्ये व चिकनमध्ये मीठ घातलेले आहे व एमएसजीही खारट असते हे लक्षात घेऊन मीठ व एमएसजी घाला.
किंचित साखर घाला.
कांदापात घाला.
सर्ववेळ आच मोठी राहू द्या.
फ्राइड राइस अथवा न्यूडल्स बरोबर खा.
तळटीप- गटारीसाठी ही पाकृ केली पण मिपाचा संप असल्यामुळे श्रावणातला असला तरी बुधवार पाहून येथे देत आहे.तरी श्रावण्,श्रावण.. करु नये!
प्रतिक्रिया
आआआ हा हा हा....ज ब रा ट. _/\
हैला! मार डाला!
स्वति तै, तुमने मुजे बिहि मर
In reply to हैला! मार डाला! by यशोधरा
कुनि मला सनगु शकील क?
In reply to स्वति तै, तुमने मुजे बिहि मर by बालगंधर्व
आता श्रावणासाठी पाककृती
मस्त
खल्लास.... बाकी काय शब्दच नाय
युम्मी !
श्रावण... कुठला श्रावण?
खल्लास
तो शेवटचा फोटो तर
येस्स! मस्तच दिसतय.
In reply to तो शेवटचा फोटो तर by दिपक.कुवेत
+१११
In reply to येस्स! मस्तच दिसतय. by कवितानागेश
याला म्हणतात positive
In reply to +१११ by प्यारे१
आम्हाला चालतं श्रावणात
प्राणिपात स्वीकारा!
वा वा ..
मस्त रंगेबीरंगी पाकृ.
मस्त फोटो.. चिकनच्या ऐवजी
मला त्यातला भात वाढा, अगदी
(No subject)
शाकाहार्यांसाठी भात आहे ना?
मस्तं.
मस्तच!
गौरि
मस्त.
स्वातीताई, पनीर घालून केली
लव्हली