मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जांभळांचा सॉस

कंजूस · · पाककृती
काल जांभळांचा सॉस केला होता .तो ब्रेड टोस्टवर लावून चांगला लागतो . काही फोटो इथे आहेत . http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/c1 पाहिजेत जांभळे ,साखर ,टोस्ट . (जांभळांचा हंगाम संपत आलाय माफ करा .त्याला पर्याय लवकरच बाजारात येईल .आलुबुखार .याचाही सॉस चांगला होतो .) कृती (१)जांभळे हातानेच कुस्करून बिया काढा .(त्या योग्यव्यक्तींकडे सोपवा .ट्रेकरलोकांकडे डोंगरात फेकण्यासाठी ) . (२)गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या .(झाकण नीट लावले नसल्यास भिंतीवर जांभळा निळा रंग येतो .एक डिझाईनर प्रयोग म्हटता येईल ). (३)गराच्या पाउणपट साखर घालून शिजवा .थंड झाल्यावर सैलसर राहील इतका घट्ट होऊ द्या .(भांड्यातून बरणीत काढल्यावर उरलेल्यात पाणी आणि जिरेपूड टाकून एक ग्लासभर कालाखट्टा होईल ). (४)फ्रिजमध्ये आठवडाभर टिकायला हरकत नाही . (याअगोदरच संपतो ) . या जांभळाच्या सॉसची चव अंगचीच आंबट तुरट येते त्यामुळे कमी गोड टोस्ट ( इथे ब्रिटानिआ रस्क ) बरोबर छान जमतो . आलुबुखारचा आंबट गोड होतो .तो खारी बरोबर (बेकरीवाल्याकडे मिळतात ती ) चांगला लागतो .

वाचने 6670 वाचनखूण प्रतिक्रिया 15

केदार-मिसळपाव Wed, 07/09/2014 - 17:39
ह्याला जांभळाचे मार्मालाड म्हणु शकता. आणी तुम्ही चक्क जांभळाचे जॅम करुन त्याला स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, बिलबेरी, ब्लॅकबेरी, क्रानबेरी ह्यांच्या रांगेत आणुन उभे केलेत. ह्याला जर वर्षभर टिकऊ शकलात तर मात्र विक्रीसाठी विचार करु शकता. आभिनंदन.