काल जांभळांचा सॉस केला होता .तो ब्रेड टोस्टवर लावून चांगला लागतो .
काही फोटो इथे आहेत .
http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/c1
पाहिजेत
जांभळे ,साखर ,टोस्ट .
(जांभळांचा हंगाम संपत आलाय माफ करा .त्याला पर्याय लवकरच बाजारात येईल .आलुबुखार .याचाही सॉस चांगला होतो .)
कृती
(१)जांभळे हातानेच कुस्करून बिया काढा .(त्या योग्यव्यक्तींकडे सोपवा .ट्रेकरलोकांकडे डोंगरात फेकण्यासाठी ) .
(२)गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या .(झाकण नीट लावले नसल्यास भिंतीवर जांभळा निळा रंग येतो .एक डिझाईनर प्रयोग म्हटता येईल ).
(३)गराच्या पाउणपट साखर घालून शिजवा .थंड झाल्यावर सैलसर राहील इतका घट्ट होऊ द्या .(भांड्यातून बरणीत काढल्यावर उरलेल्यात पाणी आणि जिरेपूड टाकून एक ग्लासभर कालाखट्टा होईल ).
(४)फ्रिजमध्ये आठवडाभर टिकायला हरकत नाही .
(याअगोदरच संपतो ) .
या जांभळाच्या सॉसची चव अंगचीच आंबट तुरट येते त्यामुळे कमी गोड टोस्ट ( इथे ब्रिटानिआ रस्क ) बरोबर छान जमतो .
आलुबुखारचा आंबट गोड होतो .तो खारी बरोबर (बेकरीवाल्याकडे मिळतात ती ) चांगला लागतो .
वाचने
6699
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी आहे! लग्गेच करुन पाहते.
अरे वा लगेच पोस्ट पण केलीत
अगदी असेच म्हणतो.
In reply to अरे वा लगेच पोस्ट पण केलीत by दिपक.कुवेत
धन्यवाद गणपा .फोटो इकडे
In reply to अगदी असेच म्हणतो. by गणपा
वेगळाच प्रकार...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माउली माउली... :- लय भारी.सोप्पाय प्रकार,
वेगळा प्रकार आवडला.
कंजूसकाका, बेश्ट पाककृती बरं
नक्की करून बघीन
दिसतोय तरी भारी
लै म्हणजे लै भारी
लै म्हणजे लै भारी
लै म्हणजे लै भारी
मस्तच!
थोडा सॉस फ्रीजमध्ये वेगळा