कारलं फ्राय
साहित्य...........
कारली ६ (लहान असल्यास उभे दोन भाग करावेत .मोठी असल्यास उभे व आडवे असे चार भाग करावेत)
अर्धा नारळ खवलेला.
५/६ हिरव्या तिखट मिरच्या.
कोथिंबीर
तांदळाची पिठी.
मीठ (चवी अनुसार)
तळण्यासाठी तेल.
कोकम
कढीपत्ता (४/५ पाने)
कृती---
प्रथम कारल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून त्यात थोडे मीठ व कोकम (२/३) टाकावे.
साधारण मऊ झाल्यावर बाहेर काढून त्यातील बिया काढून टाकाव्या
मिक्सरमध्ये खोबरे,मिरच्या,कोथिंबीर,कढीपत्ता मीठ एकत्र वाटून घ्यावे.
आता कारल्याच्या प्रत्येक तुकड्यात हा मसाला भरून दाबून द्यावे.
तांदळाच्या पिठीत हे तुकडे दोनही बाजूने दाबून घ्यावे.
तव्यावर तेल टाकून हे तुकडे दोनही बाजूंनी मंद आचेवर खमंग तळून घ्यावे.(मासे तळतो तसे.)
कुरकुरीत कारली फ्राय तय्यार.
प्रवासात न्यायलाही उपयोगी पडतात. २/३ दिवस टिकतात.


वाचने
12778
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाकॄ!
खवलेला नारळ घालूनही टिकतात का
टिकते
In reply to खवलेला नारळ घालूनही टिकतात का by कवितानागेश
हि कारली
ही कारली
In reply to हि कारली by दिपक.कुवेत
चिकन सुवालाकी बरोबर?
In reply to ही कारली by सस्नेह
अमावस्या
In reply to ही कारली by सस्नेह
भारी!
In reply to अमावस्या by भिंगरी
अच्छा !
In reply to अमावस्या by भिंगरी
फोटूsssssssssssssssssssssssss
हे घ्या फोटू
In reply to फोटूsssssssssssssssssssssssss by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद!
In reply to हे घ्या फोटू by भिंगरी
सुसरीसारखे दिसतायत
In reply to उकडलेली कारली by भिंगरी
तुम्ही 'सुसर फ्राय' करुन
In reply to सुसरीसारखे दिसतायत by आदूबाळ
योग्य जागा
In reply to तळलेली कारली by भिंगरी
डन.
In reply to योग्य जागा by भिंगरी
आभार
In reply to डन. by संपादक मंडळ
भिंगरी बाई
मस्त
वॉव...मस्स्त्त्त फोटो आणि
+१
In reply to वॉव...मस्स्त्त्त फोटो आणि by स्वप्नांची राणी
वाह भिंगरी ताय !
वरील मसाल्यात थोडी काळी मिरी
भिंगरी, मस्तं रेसेपी. नारळ