Skip to main content

कारलं फ्राय

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 05/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
कारलं फ्राय साहित्य........... कारली ६ (लहान असल्यास उभे दोन भाग करावेत .मोठी असल्यास उभे व आडवे असे चार भाग करावेत) अर्धा नारळ खवलेला. ५/६ हिरव्या तिखट मिरच्या. कोथिंबीर तांदळाची पिठी. मीठ (चवी अनुसार) तळण्यासाठी तेल. कोकम कढीपत्ता (४/५ पाने) कृती--- प्रथम कारल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकून त्यात थोडे मीठ व कोकम (२/३) टाकावे. साधारण मऊ झाल्यावर बाहेर काढून त्यातील बिया काढून टाकाव्या मिक्सरमध्ये खोबरे,मिरच्या,कोथिंबीर,कढीपत्ता मीठ एकत्र वाटून घ्यावे. आता कारल्याच्या प्रत्येक तुकड्यात हा मसाला भरून दाबून द्यावे. तांदळाच्या पिठीत हे तुकडे दोनही बाजूने दाबून घ्यावे. तव्यावर तेल टाकून हे तुकडे दोनही बाजूंनी मंद आचेवर खमंग तळून घ्यावे.(मासे तळतो तसे.) कुरकुरीत कारली फ्राय तय्यार. प्रवासात न्यायलाही उपयोगी पडतात. २/३ दिवस टिकतात. मिरची,कोथिंबीर,खवलेले खोबरे तांदळाचे पीठ वाटलेला मसाला उकडलेली कारली भरलेली कारली पीठ लावलेली कारली तळलेली कारली

वाचने 12778
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

In reply to by कवितानागेश

हो कारण मंद आचेवर खरपूस फ्राय होते ना. हवं असल्यास सुक्या खोबऱ्याचे करू शकता,पण चवीत फरक पडतो

In reply to by सस्नेह

अमावास्येच्या दिवशी पोकळ खेकड्याच्या नांगीने दहीवडा उचलून खेकड्याच्या पाठीच्या टरफलात ठेऊन खाल्ल्यास स्नेहांकित भुतांची भीती वाटत नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अतृप्त आत्म्यांनो हे घ्या फोटो. बाई बाई दमले हे फोटो टाकता मला काही येईना,दुसऱ्यांकडून करून घेता घेता किती वेळ गेला. फोटूच्या बाबतीत मी पास

In reply to by आदूबाळ

तुम्ही 'सुसर फ्राय' करुन पाहिलय का? या वरच्या सुसरीची पाठ मउ असावी. :)

भिंगरी बाई ___/\___ हॅट्स ऑफ. जनतेनं इतका दंगा करुन सुद्धा चिकाटीनं पाकृ पूर्ण केल्याबद्दल कौतुक वाटले. पदार्थ सुद्धा छान दिसतोय.

चला आता तुम्हाला पण फोटो टाकता आले. आता, अजून मस्त पा.क्रु. येवू द्यात.

भिंगरी, मस्तं रेसेपी. नारळ घालून कधी केली नव्हती. नेहमी मी बेसनच वापरते. हे आता नक्की करुन बघिन.