थेंब
संथ पाउस पडतो
झाडे,कौले भिजवीत
जणू स्वप्न उतरते
जडावल्या पापणीत....
झाडे चिंब शहारली
पक्षी मिटत पंखात
शांत दुपार पेंगते
थेंब थेंब न्याहळत...
ओल्या लाल कौलांवर
मंद पावसाचा सूर
हिरव्या कंच शेतावर
संथ थेंबांचा पदर...
ओला वास रानीवनी
ढग पाण्यात वाहात
भोवताल सारे स्तब्ध
थेंब एकटे गातात....
शेवटाला...जोरदार सरी नंतरची.
+१
सुंदर शब्दचित्र.
येस्स! शब्दचित्र!
वाह
>>ओला वास रानीवनी
अतिशय
काय सुरेख!
छानच!
आहा ! क्या बात ! प्रत्येक
वा खुप छान कविता
खरच शब्दचित्र! आवडलं.