✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रस्ता - रस्सा

अ
अत्रन्गि पाउस यांनी
गुरुवार, 07/24/2014 - 21:15  ·  लेख
लेख
दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले .. काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ... आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य .. तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिकसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही" तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे) (प्रोक्षण - प्रक्षोण) Continental - Contentinental असो
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13132 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

एक डॉक्टर बरं का डॉक्टर

शुचि
गुरुवार, 07/24/2014 - 21:22 नवीन
एक डॉक्टर बरं का डॉक्टर बोलायचे - काही नाही थोडा वीकनेसपणा आलाय =))
  • Log in or register to post comments

हा हा

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 07/24/2014 - 21:26 नवीन
*biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

१. व्हाया चिपळूण मार्गे!

प्यारे१
गुरुवार, 07/24/2014 - 21:53 नवीन
१. व्हाया चिपळूण मार्गे! २. अबोव्ह देणे. (बोलणार्‍याचा तकिया कलाम) ३. वरलोड झालं. (जेवल्यावर एका अशिक्षित काकूचा वाक्प्रचार) ४. एक लेडीज बाई आहेत.
  • Log in or register to post comments

डुलकी - डुकली /डुकला ,

पक्या
गुरुवार, 07/24/2014 - 22:16 नवीन
डुलकी - डुकली /डुकला , लायटिंग -लाईट्निंग , इलाज - विलाज, चिकटणे - चिटकणे , ताटली - थाटली , मॉडर्न - मॉर्डन , चपला - चपल्या
  • Log in or register to post comments

बादली की बालदी?

कवितानागेश
गुरुवार, 07/24/2014 - 22:39 नवीन
बादली की बालदी?
  • Log in or register to post comments

अंतरंगी पाऊस की अन्त्रन्गी

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/24/2014 - 22:54 नवीन
अंतरंगी पाऊस की अन्त्रन्गी पाऊस ?
  • Log in or register to post comments

दोन्हीही नाही

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 10:41 नवीन
अंतरंगी नाही हो *pardon*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग

प्रसाद गोडबोले
Fri, 07/25/2014 - 10:46 नवीन
अत्रन्गि हा शब्द रॉर्म्बर्टं इतकाच अवघड आहे म्हणायचे तर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

आर्किटेक्ट आणि आर्किटेक्चर ..

तुमचा अभिषेक
गुरुवार, 07/24/2014 - 23:01 नवीन
नेहमी गोंधळ उडतोच .. तरी बरे मी सिविल ईंजिनीअर आहे.. ;)
  • Log in or register to post comments

काचेच्या ग्लासात

भिंगरी
गुरुवार, 07/24/2014 - 23:12 नवीन
काचेच्या ग्लासात सरबत दे दप्तर्-दक्तर
  • Log in or register to post comments

काही अभूतकाळ

रमेश आठवले
Fri, 07/25/2014 - 01:30 नवीन
मराठी मालिकात हे शब्द बरेच वेळा वापरले जातात- दवाखान्यात admit (admitted ) आहे. मी panic ( panicky ) झाले. गुजराथी दुकानात बरेच वेळा फ़िक्ष (fixed) किमत असे बोर्ड लावलेले सापडतात
  • Log in or register to post comments

१. दवाखान्यात अ‍ॅडमिट(अ

असंका
Fri, 07/25/2014 - 16:01 नवीन
१. दवाखान्यात अ‍ॅडमिट(अ‍ॅडमिटेड) आहे. मराठीत बोलतानासुद्धा ed लावायला पाहिजे? २. मी पॅनिक(पॅनिकी) झाले (/झालो) . मराठीत बोलताना कशासाठी विशेषणाचे इंग्रजी व्याकरणाचे नियम लागू करायचे? उलट असे दुसर्‍या भाषेचे नियम पाळणे म्ह्णजे जास्त हास्यास्पद होइल.उदा. फोन चार्ज झाला - फोन चार्ज्ड झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

वापराच कशाला

रमेश आठवले
Fri, 07/25/2014 - 22:00 नवीन
मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्या असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वापराच कशाला

रमेश आठवले
Fri, 07/25/2014 - 22:06 नवीन
मी जी उदाहरणे दिली आहेत ती धाग्याच्या विषयाला धरून आहेत असे वाटते.इंग्लिश शब्द वापरावा असा आग्रह नाही पण वापरात घेतला जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात घ्यावा असे माझे म्हणणे आहे. आपण आणखी एक उदाहरण दिले आहे त्यबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

धाग्याचा विषय आपल्या मते काय

असंका
Tue, 07/29/2014 - 15:00 नवीन
धाग्याचा विषय आपल्या मते काय आहे? आपण बहुधा "इंग्रजी शब्दांचा चुकीचा वापर" ह्या धाग्याबद्द्ल बोलत आहात! कारण ह्या धाग्याचा विषय प्रचलित शब्द वेगळ्या पद्धतीने वापरणे असा आहे. अ‍ॅडमिट होणे, पॅनिक होणे हे शब्द मी अ‍ॅडमिट्टेड होणे, पॅनिकी होणे यांच्यापेक्षा जास्त वेळा ऐकले आहेत. माझ्यादृष्टीने, अ‍ॅडमिट ऐवजी अ‍ॅडमिटेड आणि पॅनिक ऐवजी पॅनिकी असं म्हणणं प्रचलित शब्दांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरणं होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

चिटकवले की चिकटवले

रमेश आठवले
Fri, 07/25/2014 - 01:34 नवीन
चिटकवले की चिकटवले
  • Log in or register to post comments

बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा

खटपट्या
Fri, 07/25/2014 - 03:24 नवीन
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो रिवर्ट साठी "रिवर्ट back" नुकसान = नुसकान विदर्भातले मित्र पडला च्या ऐवजी पल्डा बोलतात
  • Log in or register to post comments

२ मात्रा

अगोचर
Sat, 07/26/2014 - 02:25 नवीन
बऱ्याच वेळेला आपण अभ्यास हा शब्द "अभ्भ्यास" असा उच्चारतो
ते व्याकरणच्याच नियमाप्रमाणे आहे असे वाटते ... "अ" हे एक मात्रेचे अक्षर असले तरी ते "भ्या" ह्या जोडाक्षराच्या आधी आल्यामुळे त्याला २ मात्रांइतका भर दिला जातो उदा. "पुण्य" मधला "पु". पण उच्चाराचा हा नियमही मोडला जातो (उदा पुण्याला जाताना )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया

रेवती
Fri, 07/25/2014 - 05:56 नवीन
टार्गेट हा शब्द अख्खी दुनिया तसा उच्चारू देत पण आमचे बाबा टारजेटच म्हणतात. पचडीतील च हे अक्षर चहाटळ या शब्दात जसे उच्चारले जाते तसे म्हणण्याऐवजी चहामधील चचा उच्चार माझे मामा करतात. आई बाबा असे म्हणायला शिकवले तरी आमचा मुलगा ऐ बाबा असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

पचडी

बॅटमॅन
Tue, 07/29/2014 - 17:30 नवीन
या शब्दाचा उच्चार करताना तेलुगुभाषिक चहावाला चच उच्चारतात. कन्नड किंवा इन जण्रल दाक्षिणात्य ब्याकग्रौंड असल्यास तसे साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पुण्यातील पुण्य

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 10:45 नवीन
आणि आता पाटी (पाठी) येऊ नाका फुडेच (पुढेच) जा
  • Log in or register to post comments

आयला काय धागा आहे...

मुक्त विहारि
Fri, 07/25/2014 - 12:04 नवीन
माझ्या डोक्यात हेडेक सुरु झाले...
  • Log in or register to post comments

अष्ट्याहत्तर !

श्रीगुरुजी
Fri, 07/25/2014 - 12:50 नवीन
अष्ट्याहत्तर ! काही खानदानी चित्पावन मंडळी "असं कराचं नाही", "नीट जेवाचं", अंथरूण खाली घालाचं", "वाईट बोलाचं नाही" अशी वाक्ये उच्चारतात.
  • Log in or register to post comments

चव्वेचाळीस की चवरेचाळीस ?

खटपट्या
Fri, 07/25/2014 - 13:03 नवीन
चव्वेचाळीस की चवरेचाळीस ? एकोणीस की एकोणावीस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काही वेळा प्रचलित शब्द काही

असंका
Fri, 07/25/2014 - 13:05 नवीन
काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते
होय अगदी खरे आहे! आपलेच पहा ना- सामान्यपणे लोक 'अर्थ लक्षात येतो नाही' असं नाही म्हणणार-'अर्थ लक्षात येत नाही' असे म्हणतील. का आपण आपलाच मुद्दा स्पष्ट करायला असं थोडंसं विचित्र लिहिलं आहे? अर्थ कळला. पण खरंच डोळ्याला फार खटकले...
  • Log in or register to post comments

स्वल्पविराम चुकला.

एस
Fri, 07/25/2014 - 13:54 नवीन
त्या प्रसिद्ध "...eats shoots and leaves" सारखाच हा घोळ आहे. ;-) "...अर्थ लक्षात येतो, नाही असे नाही..." हो ना? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

खरंच की!! हे नव्हतं लक्षात

असंका
Fri, 07/25/2014 - 14:59 नवीन
खरंच की!! हे नव्हतं लक्षात आलं. तुम्ही म्हणताय ती दुरुस्ती केल्यावर मग ते वाक्य ठिक दिसतंय..!! आणि हे eats shoots leaves म्हणजे ते पुस्तक इतरांच्या शुद्धलेखन/व्याकरणावर टिका करत असताना, त्यातच काही चुका निघाल्या त्याबद्दल बोलताय का आपण(-गूगल वर कळलं- नाहितर असं काही पुस्तक आहे हेही मला अत्तापर्यंत माहित नव्हतं?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पांडा इट्स शूट्स अ‍ॅण्ड लीव्ज

एस
Fri, 07/25/2014 - 15:42 नवीन
नाही हो. हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. स्वल्पविराम किंवा तत्सम व्याकरण चुकल्यावर होणारी गल्लत त्या पुस्तकात छान मांडली आहे. पांडा हा प्राणी झाडांची पाने व कोवळे कोंभ खातो असे ध्वनित होण्याऐवजी काहीतरी वेगळेच (पांडा खातो, ... आणि जातो) होऊन बसते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

, चुकला

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 14:59 नवीन
क्षमस्व ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून

असंका
Fri, 07/25/2014 - 15:50 नवीन
लोक कसं चुकीचं बोलतात म्हणून चार वाक्य लिहून धागा काढलात. त्यात तीन चूका?- १. (हे वरती आधीच चघळून झालंय.) २. दुसर्‍या लिहायच्या ऐवजी दुसर्या ३. "कितीही वेळा सांगितले तरी उपयोग शून्य" ऐवजी "कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य" (तरी/तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

चूका

एस
Fri, 07/25/2014 - 15:54 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

धन्यवाद. हे माझं चुकत होतं

असंका
Fri, 07/25/2014 - 16:35 नवीन
धन्यवाद. हे माझं चुकत होतं हेच मला माहित नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आजच चेपू वर एका तरुण मुलाच्या

नित्य नुतन
Fri, 07/25/2014 - 13:54 नवीन
आजच चेपू वर एका तरुण मुलाच्या निधनाची बातमी होती फोटूसकट आणि वर लिहिले होते .... अंतकरणात विलीन .... वाचल्यानंतर ५ मिनिटे मूळ शब्द काय आहे हे आठवण्यात गेली...
  • Log in or register to post comments

- "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज

पिलीयन रायडर
Fri, 07/25/2014 - 14:09 नवीन
- "डायफ्रॅम" हा शब्द कॉलेज मध्ये पहिल्यांदा वाचला तेव्हा पासुन डोक्यात "डायफ्रॅगम" (diaphragm) असाच बसला आहे.. - तसंच काही लोक "तू माझ्यासाठी हे करशील का?" मध्ये "का?" गाळुन टाकतात, आणि नुसतंच "माझ्यासाठी हे करशील" अशी आज्ञा सोडतात.. - "ला" वगैरे प्रत्यय जोडताना शेवट आकारान्त करत नाहीत.. हिंदीसारखं नुसतंच शब्दाला प्रत्यय जोडतात.. (कोपरला लागलं टाईप) - माणसं "भेटतात", वस्तु "मिळतात"... - मी "आली", "गेली".... - आव्हान - आवाहन - हजारो आहेत अशी उदाहरणं.. किती लिहीणार...
  • Log in or register to post comments

भेटणे

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 15:03 नवीन
रेमंड मिल्स मध्ये असतांना विशिष्ट कापड शोधतांना 'क्वालिटी भेटली शेड भेटायची आहे' हे नेहेमीचे वाक्य अगदी पहिल्यांदा ऐकले तेव्हा आम्ही आयटी वाले हसून हसून कोल्माडायचे बाकी होतो.. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

दक्षिण रायगड आणि उत्तर

धन्या
Tue, 07/29/2014 - 17:36 नवीन
दक्षिण रायगड आणि उत्तर रत्नागिरीमध्ये बोलल्या जाणार्‍या मराठी बोलीभाषेत "भेटणे" हा शब्द "मिळणे" किंवा "सापडणे" अशा अर्थीही वापरला जातो. उदा. काल माजा मोबायील सांडला*. कदीपस्ना सॉदताय पन आजून भेटत नाय. * इथे हरवला अशा अर्थी. तथाकथित प्रमाण मराठी या शब्दाचा अर्थ लवंडणे, उलटणे असा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

हरवलेली वस्तू "गावत नाय/गवसत"

खटपट्या
Fri, 08/15/2014 - 10:31 नवीन
हरवलेली वस्तू "गावत नाय/गवसत" नाय असेही म्हणतात आणि सापडल्यावर "गावली/गवसली" "गवसणे" म्हणजे भुताने पछाडणे किंवा भारणे अशा अर्थानेही वापरतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माझ्याकडून थोडं...

सूड
Fri, 07/25/2014 - 14:31 नवीन
'मी त्याला/तिला as a friend म्हणून सांगितलं'... सुख्खे कपडे, काश असं झालं असतं..
  • Log in or register to post comments

काचेच्या ग्लासात सरबत दे>>>

हसरी
Fri, 07/25/2014 - 15:09 नवीन
काचेच्या ग्लासात सरबत दे>>> यात काय चुकीचं आहे?? *aggressive* ग्लास प्लॅस्टीकचा, थर्माकोलचाही असू शकतो. ट्रॉफिक, 'तुमची' मदत करू का?, एमटीनलची लाईन 'व्यस्त' आहे असे चुकीचे शब्द/ वाक्प्रचार मराठीत सर्रास रुळू लागले आहेत.
  • Log in or register to post comments

काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत.

असंका
Fri, 07/25/2014 - 15:54 नवीन
काचेच्या ग्लास बद्द्ल सहमत. मलाही त्यात काय चूक आहे नाही कळलं. त्यांना बहुतेक काचेचा पेला अपेक्षित असेल. पण " 'तुमची' मदत करू का?" यात काय चूक आहे, ते नाही कळलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हसरी

तुम्हाला मदत करु का? असं

बाळ सप्रे
Fri, 07/25/2014 - 16:08 नवीन
तुम्हाला मदत करु का? असं म्हणतात.. तुमची मदत करु का ? हा हिंदीचा प्रभाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

ह्म्म

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 07/25/2014 - 15:16 नवीन
खिसा=खिचा पश्चिम=पच्चिम,पच्छिम रबर=रबड,लबड
  • Log in or register to post comments

शंभरातले नव्वद गॅरेजवाले"ऑटो"

बाळ सप्रे
Fri, 07/25/2014 - 15:19 नवीन
शंभरातले नव्वद गॅरेजवाले

"ऑटो"

ऐवजी

"अ‍ॅटो"

लिहितात..
  • Log in or register to post comments

पंचत्वात विलीन ऐवजी पंचतत्वात

बाळ सप्रे
Fri, 07/25/2014 - 15:21 नवीन
पंचत्वात विलीन ऐवजी पंचतत्वात विलीन. मानस सरोवराचं मानसरोवर.
  • Log in or register to post comments

आं ..म्हणजे

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 15:50 नवीन
पंचत्व हे बरोबर ??? मला असे वाटायचे कि पंचतत्वात म्हणजे (पंच महाभूतात ह्या अर्थी) विलीन .... *crazy*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

पंचतत्वात हा शब्दच योग्य आहे.

विजुभाऊ
Fri, 07/25/2014 - 16:03 नवीन
पंचतत्वात हा शब्दच योग्य आहे. पंचत्व = याचा अर्थ वेगळा होतो.
  • Log in or register to post comments

स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व

बाळ सप्रे
Fri, 07/25/2014 - 16:20 नवीन
स्वत्व, दातृत्व, कर्तृत्व याप्रमाणे पंचत्व.. जीवाचे पंचमहाभूतापासून निर्मिलेले असणे म्हणजेच त्याचे पंचत्व. पंचतत्व या शब्दाशी अर्थाने व उच्चाराने साधर्म्य अगदीच अयोग्यही नव्हे पण व्याकरणासंबंधी पुस्तकातून 'पंचत्वात' असाच शब्द्प्रयोग ऐकलाय.. आपला पंचत्वाचा वेगळा अर्थ ऐकण्यास उत्सुक आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वा गो आपटे आणि ह अ भावे

असंका
Fri, 07/25/2014 - 16:30 नवीन
वा गो आपटे आणि ह अ भावे यांच्या विस्तारीत शब्दरत्नाकरानुसार- पंचतत्वे= पाच मुख्य तत्त्वे- पंचमहाभूते. पंचत्व= देहातील पाच तत्त्वे निरनिराळी होणे. मरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अरे वा

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 16:35 नवीन
वादे वादे जायते तत्वबोध: म्हणतात ते हे असे.... चला ....आणि आता तुमच्या डोक्याचा हेडेक गेलेला दिसतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अजून एक आठवले

अत्रन्गि पाउस
Fri, 07/25/2014 - 16:39 नवीन
अमुक एक ठिकाण कुठे आहे असे विचारल्यावर पत्ता सांगितला तो असा (काल्पनिक) हे SSSS इथून असे सरळ जा स्ट्रेट, पुढे एक गोलाकार सर्कल लागेल, त्याच्या सेंटरला मध्यभागी जो पुतळा आहे त्याच्या पाठीच्या मागून लेफ्टला डावी कडे वळा आणि रस्त्याच्या शेवटी एंड आहे तिथे हे ठिकाण आहे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा