✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निसर्गकन्या : लावणी

ग — गंगाधर मुटे, Tue, 07/22/2014 - 22:27
निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

श्रावणाची सर, चाळविते उर, हवा खट्याळ पदराला नेते दूर
वाजले कंगण की कोकिळेची कुहु, पैंजणाच्या सवेला मैनेचा सूर
चिमणी-पाखरू, हरिण-कोकरू, फेर धरी भोवताली .... ॥२॥

आसक्त नजर तीक्ष्ण ती, ‘अभय’ बोलकी, अधर अनिवार
खुणवती पापणी प्रिया, पाश द्यावया, बाहु अलवार
शोधीत भिरभीर, बघुनी दूरवर, मनीच पुलकित झाली .... ॥३॥

                                                       - गंगाधर मुटे ‘अभय’
------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
1951 वाचन

💬 प्रतिसाद (4)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआ

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/22/2014 - 23:33 नवीन
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआअ..............म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... धूंन्न्न्न्न्न्न्न्न्दददद.....चीं..............ब जाहलो.........!!!
  • Log in or register to post comments

गंगाधर मुटे साहेब , मस्त सुंदर लावणी.

निश
Wed, 07/23/2014 - 15:50 नवीन
गंगाधर मुटे साहेब , मस्त सुंदर लावणी. तुमच्या कविता नेहमीच चांगल्या व वाचनीय असता. फार सुरेख लावणी / कविता.
  • Log in or register to post comments

सुंदरच!!!

शुचि
गुरुवार, 07/24/2014 - 21:23 नवीन
सुंदरच!!!
  • Log in or register to post comments

छान

कविता१९७८
Fri, 07/25/2014 - 17:36 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा