बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव
बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव
फोटो इथे
http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/m2
पाहा .
साहित्य :
भिजवून मोड आणून सोललेले वाल उर्फ बिरड्या/डाळिंब्या एक वाटी ,
मसाल्यासाठी: लसूण चटणी ,
किसलेले सुके खोबरे भाजून ,
लाल तिखट ,हळद ,मिठ .
तेल .
मिसळीत टाकण्यासाठी :
कांदा ,लिंबू ,फरसाण ,बारीक शेव ,तळलेला पोहे चिवडा ,कोथिंबीर ,भावनगरी इ०.
कृती :
१)बिरड्या थोड्या पाण्यात शिजायला ठेवा .
२)अर्धवट शिजल्यावर त्यातील थोड्या घेऊन मसाल्याबरोबर कुटा/वाटा .त्याला थोड्या तेलावर भाजा .
३)वरील मिश्रण अगोदर शिजत असलेल्या बिरड्यात सोडून उकळले की झाली मिसळ तयार .
४)तरीचे प्रमाण ,दाटपणा आणि तिखटपणा क्र २ मधील जिन्नस कमी जास्त करण्यावर बदलतो .
सूचना :
अ)लसूणचटणीऐवजी सर्व खोबरे घेतल्यास चव वेगळी येते .
ब) 'अ'प्रमाणे करून चिंच गूळ घातल्यास साधे बिरडे होईल पण मिसळीसाठी चालणार नाही .
क)नेहमीची ओले खोबरे घातलेली उसळ केल्यास तळलेले पोहे ,बारीक शेव आणि भावनगरी वापरावी .(गिरगाव ,डोंबिवलीत गोविंदाश्रमात मिळायची .)
ड)मसाल्यात कांदा वापरलेला नाही .
मिपावर पूर्वी एक धागा आला होता पण परत एक उजळणी केली आहे .

वाचने
10719
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
बिरडं कोणत्याहि
In reply to बिरडं कोणत्याहि by दिपक.कुवेत
एवढे कष्ट घेउन ईथे टंकताय तर
लय भारी
छान पाकृृ !
जबरी
मला वाटते काही पारंपारिक
बिरड्याची नविनच पाकृ आहे !
ह
पहिली पसंती पांढर्या वाटाण्यांना.
पटतंय .पांढरे वाटाण्यांची चव
रॉजरमूर साहेब मी जुनीच गाडी
(No subject)
तयार मिसळ.
डाळिंब्या मस्त!
फोटो
जरूर करून बघीन...