✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंत्रयोग - जपयोग

अ
अनिल तापकीर यांनी
गुरुवार, 07/17/2014 - 16:32  ·  लेख
लेख
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
70530 वाचन

💬 प्रतिसाद (434)

प्रतिक्रिया

तापलेल्या शिशाचा रस कानात ओतणे इ.इ

प्रसाद गोडबोले
Tue, 07/22/2014 - 17:03 नवीन
त्या पेक्षा कानात तिच्याच आवाजातल्या ठिबक सिंचनाचे मशीन लावुन गायत्री रस ओतण्याची शिक्षा कशी वाटते *music2* ;) *crazy*
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

बॅटमॅन
Tue, 07/22/2014 - 17:08 नवीन
=))
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सध्या जेलमध्ये असणारे एक बाबा

अधिराज
Tue, 07/22/2014 - 17:16 नवीन
सध्या जेलमध्ये असणारे एक बाबा ,"संसारी स्त्रियांनी ॐचा जप करू नये" असे काही वर्षांपूर्वी म्हणताना ऐकल्याचे आठवते.

"संसारी स्त्रियांनी ॐचा जप

स्वप्नांची राणी
Tue, 07/22/2014 - 18:39 नवीन
"संसारी स्त्रियांनी ॐचा जप करू नये".... करु द्या हो जप. ॐचा जप केल्यामुळे जादू येतो...संसारी स्त्रियांना तेव्हढाच टाईमपास...

करा कि जप कोण नाही म्हणतंय,

अधिराज
Tue, 07/22/2014 - 20:59 नवीन
करा कि जप कोण नाही म्हणतंय, ती मुक्ताफळे सध्या जेलमध्ये असणर्‍या एका बाबाची आहेत. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जपामुळे जादू का फादू येतो ते माहित नाही पण त्या बाबाच्या मते ॐचा जप केल्याने संसारी स्त्रियांना विरक्ती येऊ शकते आणि प्रॉब्लेम होऊ शकतो. हे असले बिनबुडाचे विधीनिषेध पाळणे म्हणजेच धर्मपालन असे विचार वरील काही प्रतिसादांत आहेत.
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

फादू कोण..? जादू च येतो...कोई

स्वप्नांची राणी
Wed, 07/23/2014 - 10:52 नवीन
फादू कोण..? जादू च येतो...कोई मिल गया मधला...म्हणुन बघा 'आँओंओंओंओंम्म्म्म्म्म' असे चिडू नका..जप करा म्हणजे असं बिनबुडाचे चिडणे पळेल..
↩ प्रतिसाद: अधिराज

अभिनंदन व पु. वा. शुभेच्छा!

अधिराज
Wed, 07/23/2014 - 11:08 नवीन
अभिनंदन व पु. वा. शुभेच्छा! :)) :)) :))
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

काय करावं. नामस्मरणावर शंका

शाली
Tue, 07/22/2014 - 19:25 नवीन
काय करावं. नामस्मरणावर शंका नको घेऊयात. कोणीतरी विचारलं तुम्ही असा मानूस पाहीलाय का? हो, तुम्हालाही दाखऊ शकतो.

जयांचे वाचेपुढां भेजें। नाम

शाली
Tue, 07/22/2014 - 19:52 नवीन
जयांचे वाचेपुढां भेजें। नाम नाचत असे माझे। जें जन्मसहस्री ओळगिजे। एक वेळ मुखासि यावया।।

पुनर्प्रसारीत...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/22/2014 - 20:29 नवीन
खालचा अत्रूप्त आत्मा यांचा प्रतिसाद खूप म्हणजे खूपच आवडला. पण प्रति-प्रति-प्रतिसादांच्या खेळात त्याची रुंदी इतकी लहान झाली होती की तो वाचकांच्या डोळ्यातून सहज निसटून जावा. शिवाय अरूंदीमुळे वाचायला लै म्हनजे लैच कठीण ! मलाही जरा जोर लावूनच वाचायला लागला. इतका सुंदर 'वजनदार' प्रतिसाद दुर्लक्षित होऊ नये याच प्रेरणेने जनतेच्या सेवेसाठी तो इथे 'पूर्ण जाडी'मध्ये चोप्य पस्ते करण्याचे समाजिक कार्य करत आहे... ============================== प्र.गो.-हे वाचा आणि थोडा अत्रुप्त आत्मा - Tue, 22/07/2014 - 13:29 प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा. प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका. प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच) आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो! माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे. आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा... तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निर्रर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे. वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध. आता हे निर्रर्थक कसं होतं ते पहा... मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं? आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं? शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? Smile *@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा. ==================== प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.

शंभर नंबरी विचार !!!

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/22/2014 - 20:36 नवीन
शंभर नंबरी विचार !!! सगळ्यात आश्चर्य वाटते ते याच गोष्टीचे की: (१) विषमतावादी विचारांनी हिंदू धर्माने आपल्यातल्या काही जणांना वेगळे वागवून दूर ठेवले... (इतर बहुतेक धर्मांत अगदी सर्वच समभाव नसला तरी तशी शिकवण आणि बर्यापैकी वागणूक तरी आहे) (२) आपल्या धर्मातल्या लोकांना क्षुल्लक कारणांवरून धर्मबाह्य करायला पुढेमागे पाहिले नाही... (इतर बहुतेक धर्मांत धर्माबाहेर जाण्यास कडाडून विरोध केला जातो, त्याला अगदी देहदंडापर्यंतही शिक्षा आहे) (३) इतर धर्मातल्या लोकांनी आपल्या धर्मात यावे यासाठी काहिही संघटीत प्रयत्न तर केले नाहीत... (इतर बहुतेक धर्मात या साठी साम, दाम, दंड, भेद यशस्वी रित्या वापरले गेले आहेत.) (४) धर्मांतर करून गेलेल्यांना परत धर्मात घेण्यात विरोध केला गेला / जातो... (हे तर हिंदू धर्म सोडून इतर धर्मात असेल असे वाटत नाही... जागतिक पातळिवरील मुख्य धर्मांत तर नाहीच नाही) आणि इतके सर्व असूनही हिंदू धर्म जगभर मान्यता पावेल (किंवा पावावा) अशी स्वप्ने पाहिली जातात ! ! आणि त्यावर वरकड म्हणजे हिंदूबहुल भारतात हिंदू धर्माला काहीच महत्व नाही म्हणून आश्चर्यमिश्रित दु:ख व्यक्त केले जाते !!! सर्वसमभाव आणि समान संधी या दोन गोष्टी धोरणात असल्याशिवाय आणि त्यांचा व्यवहारात परिणाम दिसणारे क्रिटीकल मास असल्याशिवाय कोणत्याही संघटनेला बळ येत नाही अथवा त्याच्या घटकांना तिच्याबद्दल आत्मियता वाटत नाही... आणि या तत्वाला धर्मसंस्थाही अपवाद नाही. हिंदू धर्माबद्दल खरेच आत्मियता असेल आणि त्याची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर कालाबाह्य, संकुचित आणि हितसंबधी प्रथा-रुढींना दूर करणार्‍या प्रामाणिक, हितसंबद्धरहित, मूलभूत धर्मप्रवर्तनाची (ग्रासरूट रिफॉर्म्स) गरज आहे... एकप्रकारे सर्वसमावेशी, सर्वसमभावी नवहिंदू धर्म व्यवहारात आणण्याची गरज आहे.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(२) आपल्या धर्मातल्या लोकांना

सूड
Wed, 07/23/2014 - 19:06 नवीन
(२) आपल्या धर्मातल्या लोकांना क्षुल्लक कारणांवरून धर्मबाह्य करायला पुढेमागे पाहिले नाही... (इतर बहुतेक धर्मांत धर्माबाहेर जाण्यास कडाडून विरोध केला जातो, त्याला अगदी देहदंडापर्यंतही शिक्षा आहे) (३) इतर धर्मातल्या लोकांनी आपल्या धर्मात यावे यासाठी काहिही संघटीत प्रयत्न तर केले नाहीत... (इतर बहुतेक धर्मात या साठी साम, दाम, दंड, भेद यशस्वी रित्या वापरले गेले आहेत.) (४) धर्मांतर करून गेलेल्यांना परत धर्मात घेण्यात विरोध केला गेला / जातो... (हे तर हिंदू धर्म सोडून इतर धर्मात असेल असे वाटत नाही... जागतिक पातळिवरील मुख्य धर्मांत तर नाहीच नाही) आणि इतके सर्व असूनही हिंदू धर्म जगभर मान्यता पावेल (किंवा पावावा) अशी स्वप्ने पाहिली जातात ! !
मस्त प्रतिसाद!! हिंदूंनीच बाटवणं सोपं करुन दिलं असं बर्‍याचदा वाटतं. बाटवतात म्हणजे काय? मागे एकदा(बहुधा चित्रगुप्तांनी) म्हटल्याप्रमाणे त्यांनी विहीरीत गोमांस टाकलं तर तुम्ही ती गोमूत्र टाकून पवित्र करुन घ्यायची होतीत, आपल्याकडची जानवी घालून त्यांना आता तुम्हीच हिंदू झालात असं सांगायचं होतं. मूळचे हिंदू पण पोर्तुगीजांनी बाटवलेल्या एखाद्या किरिस्तावाची लेक सून म्हणून घरात आणली तर आजच्या काळात सुद्धा किती लोक हसत स्वीकारतील हा प्रश्न आधी स्वतःला विचारावा आणि मग हिंदू धर्माचे गोडवे वैगरे गावे.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अहो पण एक जण (वेदोक्त

हाडक्या
Wed, 07/23/2014 - 19:44 नवीन
अहो पण एक जण (वेदोक्त/पुराणोक्त समर्थक) इथे काय म्हणतोय पाहिलंत का ?
बुदणारा धर्म बुडु दे की निवांतपणे त्याच्या ष्टाईल ने ... पण आम्हाला तोच हवा आहे आणि आम्ही तोच सुधारणा करुन तरंगवायचा प्रयत्न करणार हा अट्टहास का ? हेच तर विचारत होतो मी
म्हणजे यांचे महत्त्व जपणारा धर्म यांची जहागिरच जणु. इतरांनी सोडून जावे, धर्म बुडणार असेल तर बुडो द्यावा. आणि हे कोण इतरांना सोडून जायला सांगणारे टिकोजीराव ? जात-पात मानत नसताना देखील असले जहागिर्दार (बिग्रेडी वा सोवळे) पाहिले की डोक्यात जातात. असो. ई.ए. ना +१ !
↩ प्रतिसाद: सूड

ख्यिक्क्...

एस
Tue, 07/22/2014 - 22:35 नवीन
वरती बॅटमननीपण हेच सामाजिक कार्य करून ठेवले होते की वो! ;-) असो. आत्मुंचा प्रतिसादच तेवढा भारी होता.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

द्विरुक्ती करुन प्रतिसाद

प्यारे१
Wed, 07/23/2014 - 13:47 नवीन
द्विरुक्ती करुन प्रतिसाद ठसवायचं आणखी एक सामाजिक कार्य इ ए ह्यांनी केलंय.
↩ प्रतिसाद: एस

आत्मुस यांचा प्रतिसाद वाचून

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/23/2014 - 19:36 नवीन
आत्मुस यांचा प्रतिसाद वाचून त्याखाली माझा पतिसाद टंकताना बॅटमन यांचा प्रतिसाद दिसला नव्हता. पन तरीही मूळ प्रतिसाद इतका चांगला आहे की व्दिरुक्तीचा दोष घ्यायला माझी अजिबात हरकत नाही. :)
↩ प्रतिसाद: एस

लेखकाची

vikramaditya
Tue, 07/22/2014 - 20:35 नवीन
विषय मांडण्याची जागा(मंच)साफ चुकली, हे त्यांच्या लक्षात आले आहे. असो. “Faith is taking the first step even when you can't see the whole staircase.” ― Martin Luther King Jr. *bye*

>>>> Martin Luther King Jr.

प्यारे१
Tue, 07/22/2014 - 22:37 नवीन
>>>> Martin Luther King Jr. मराठी आंतरजालीय सदस्य खचितच नसणार हा. अहो नावाचाच 'ज्युनिअर' आहे ना! ;)
↩ प्रतिसाद: vikramaditya

जबरी चर्चा चालू आहे राव !!

खटपट्या
Tue, 07/22/2014 - 23:38 नवीन
जबरी चर्चा चालू आहे राव !! आत्मुबाबांचा प्रतिसाद तर फ्रेम करून ठेवण्यासारखा आहे. बैट्मन साहेबांनी पुरोगामित्वाचा लढा दिलाय त्याला तोड नाही. स्पा असे म्हणाले कि फक्त अशा चर्चांसाठी मिपा राहिलेय. माझ्यामते हीच मिपाची खासियत आहे.

२८२

प्रसाद गोडबोले
Wed, 07/23/2014 - 12:05 नवीन
२८२ झालेत अजुन १८ हुवुन्द्या ... म्हणजे त्रीपल सेन्च्युरी होईल *biggrin* योगायोगाने सध्द्या दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावरही सिमिलर चर्चा चालु आहे )मी तिथे अजिबात ब्यॅटींग केलेली नाहीये हं )... पण तिथे एकाने मस्त सिक्सर मारलाय तो इथे शेयर करायचा मोह आवरत नाहीये "वेद हे अपौरुषेय आहेत म्हणजेच वेद हे पुरुषांनी लिहिलेले नसुन स्त्रीयांनीच लिहिलेले आहेत " *biggrin*

वेदांतले किमान एक सूक्त

बॅटमॅन
Wed, 07/23/2014 - 17:16 नवीन
=)) वेदांतले किमान एक सूक्त लिटरली अपौरुषेय आहे. अंभृणी या ब्रह्मवादिनीने रचलेले सूक्त- ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातले १२५ वे सूक्त. बाकीचं माहिती नै.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

४०० + साठी

प्रसाद गोडबोले
Wed, 07/23/2014 - 22:43 नवीन
४००+ साठी ही काडी आमच्या माहितीनुसार मंडल १ व १० प्रक्षिप्त आहेत व नंतर घुसडण्यात आलेली आहेत *biggrin* मिपाय स्वाहा मिपाय इदम् न मम् =))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझ्या दृष्टीने नामस्मरण हे

धन्या
Wed, 07/23/2014 - 16:52 नवीन
माझ्या दृष्टीने नामस्मरण हे "वडाच्या झाडाकडे एकटक पाहिल्याने त्रास होतोय तर आंब्याच्या झाडाकडे बघ" असं सांगण्यासारखे आहे. जगातील इतर वाईट गोष्टींवरील चित्त हटवून "देव" या चांगल्या गोष्टीवर चित्त केंद्रीत करा, असं काहीसं.

चांगल्या गोष्टींवर चित्त

प्रसाद गोडबोले
Wed, 07/23/2014 - 17:12 नवीन
चांगल्या गोष्टींवर चित्त केंद्रित करण्याला कधी कधी इव्ह टीझींग म्हणतात .
↩ प्रतिसाद: धन्या

कसलं काय हो...

धन्या
Wed, 07/23/2014 - 17:17 नवीन
तीनशेच्या उंबरठयावर येऊन धागा थंडावला होता. वर यावा म्हणून थोडा जाळ सारला झालं.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तसंच काहीसं. मान्य. बहुतांशी

प्यारे१
Wed, 07/23/2014 - 17:29 नवीन
तसंच काहीसं. मान्य. बहुतांशी पोषकही. (कंडीशन्स अप्लाय) काहीही न करता नाम घ्या असा अ‍ॅप्रोच नक्कीच चुकीचा असतो. पण काहीही चळवळ न करता नुसती चुळबूळ असेल तर त्यापेक्षा नाम कधीही चांगलं. :) - विथ ड्यु रिस्पेक्ट 'धाग्याचं काश्मीरपेक्षा धाग्याची जपमाळ केली/ झाली','इंच इंच लढवू ऐवजी मणी मणी ओढू' अशा वाक्प्रचार वापराच्या प्रतीक्षेत. ;)
↩ प्रतिसाद: धन्या

पण मग बिघडलं कुठे?

कवितानागेश
Wed, 07/23/2014 - 17:33 नवीन
पण मग बिघडलं कुठे?
↩ प्रतिसाद: धन्या

बिघडलं कुठे? मी फक्त मला काय

धन्या
Wed, 07/23/2014 - 18:16 नवीन
बिघडलं कुठे? मी फक्त मला काय वाटतं ते सांगितलं.
↩ प्रतिसाद: कवितानागेश

छ्या:

एस
Wed, 07/23/2014 - 17:23 नवीन
तीनेशेवा टंकायची संधी हुकली! :-(

हा माझा प्रतिसाद कितवा आहे?

यशोधरा
Wed, 07/23/2014 - 17:47 नवीन
हा माझा प्रतिसाद कितवा आहे?

जपावरचा धागा आहे. असा जप मोजू

कवितानागेश
Wed, 07/23/2014 - 17:59 नवीन
जपावरचा धागा आहे. असा जप मोजू नये, यशो. आपण आपले प्रतिसाद देत जावे. मोजणारा वरती बसलाय. ;)
↩ प्रतिसाद: यशोधरा

जप असा करतात होय? सानुभूती

यशोधरा
Wed, 07/23/2014 - 18:22 नवीन
जप असा करतात होय? स्वानुभूती सांगतेयस ना? स्वानुभूती नसेल तर बोलायचं काम नाय हां (असं म्हणतात म्हणे ) ;)
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ज्याअर्थी त्यांनी "मोजणारा

धन्या
Wed, 07/23/2014 - 18:25 नवीन
ज्याअर्थी त्यांनी "मोजणारा वरती बसलाय" असं लिहिलंय त्याअर्थी स्वानुभूती नसावी. :)
↩ प्रतिसाद: यशोधरा

जपाबद्दल विचारलं मी धन्या.

यशोधरा
Wed, 07/23/2014 - 18:28 नवीन
जपाबद्दल विचारलं मी धन्या. वर्ती बसणार्‍याबद्दल नाही. :)
↩ प्रतिसाद: धन्या

सानुभूती की स्वानुभूति की

प्यारे१
Wed, 07/23/2014 - 18:30 नवीन
सानुभूती की स्वानुभूति की सहानुभूति? स्वानुभूति असलं तरी स्व ची अनुभूति की स्व ला झालेली अनुभूति? स्व ला झालेली अनुभूति दुसर्‍याला का नि कशी समजणार? तसं होत नसेल तर काय करावं? मी कोण आहे? मी कुठं आहे? मी आहे ?
↩ प्रतिसाद: यशोधरा

अहो, सुप्रा कॉन्शसच्या

बॅटमॅन
Wed, 07/23/2014 - 18:41 नवीन
अहो, सुप्रा कॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना... पण तुम्ही गुरुदेवांचं 'इ ट्यून विथ द ट्यून' वाचलं आहे का? मीच लिहिलंय, गुरुदेव स्वतः स्वप्नात आले आणि म्हणाले, लिही!
↩ प्रतिसाद: प्यारे१

परिक्षण लिहायला दिलं नाय काय

यशोधरा
Wed, 07/23/2014 - 18:45 नवीन
परिक्षण लिहायला दिलं नाय काय अजून? *mosking*
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गुरुदेवांच्या शिकवणीचं

बॅटमॅन
Wed, 07/23/2014 - 19:06 नवीन
गुरुदेवांच्या शिकवणीचं परीक्षण????? तौबा तौबा..या शिर्क साठी खरे तर काली फॉसीफोरमच दिली पाहिजे, पण असो =))
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 07/23/2014 - 19:29 नवीन
=))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे असं

प्रसाद गोडबोले
Wed, 07/23/2014 - 18:56 नवीन
सानुभूती की स्वानुभूति की सहानुभूति? स्वानुभूति असलं तरी स्व ची अनुभूति की स्व ला झालेली अनुभूति? स्व ला झालेली अनुभूति दुसर्‍याला का नि कशी समजणार? तसं होत नसेल तर काय करावं? मी कोण आहे? मी कुठं आहे? मी आहे ?
हे असं गांजा पिल्यावर होतं =)) म्हणुन म्हणतो की दारु परवडली *biggrin*
↩ प्रतिसाद: प्यारे१

अनुभव नाही.

प्यारे१
Wed, 07/23/2014 - 19:16 नवीन
अनुभव नाही. आम्ही काहीही इन्टेक न घेता वरील अवस्था काही (च्या बाही) प्रतिसाद वाचून 'प्राप्त' करुन घेतलेली आहे. दारुबाबतः सध्या 'रमादान करिम' रे बाबा! मिळता मिळत नाही. ;)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

४००+ जाणार... काश्मिरपण पार

टवाळ कार्टा
Wed, 07/23/2014 - 19:56 नवीन
४००+ जाणार... काश्मिरपण पार करेल... कदाचीत धाग्यावर मंत्र-जप पडणे असा नवा वक्प्रचार वाक्प्रचार मीळेल मिपावर :)

+१

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/23/2014 - 20:10 नवीन
धाग्याच्या पत्रिकेत "मंत्रयोग - जपयोग" आहे / दिसतोय, असाही वाकप्रचार पडायला हरकत नाही ;) =))
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धाग्याच्या पत्रिकेत "मंत्रयोग

टवाळ कार्टा
Wed, 07/23/2014 - 20:41 नवीन
धाग्याच्या पत्रिकेत "मंत्रयोग - जपयोग" आहे / दिसतोय
हेच जास्त चांगले आहे :)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कोण म्हणतं मंत्राचा प्रभाव

अधिराज
Wed, 07/23/2014 - 21:01 नवीन
कोण म्हणतं मंत्राचा प्रभाव पडत नाही, ह्या धाग्याचेच उदाहरण घ्या, सुरवातीला मंदगतीने चालणारा हा धागा काही महात्म्यांनी खालील मंत्र सोडल्यावर ३००+पर्यंत मजल मारू शकला. १. इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || २. या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नोट

प्रसाद गोडबोले
Wed, 07/23/2014 - 22:38 नवीन
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
नोट ह्या मंत्राचा अधिकार फक्त मिपाकरांनाच आहे *biggrin* )
↩ प्रतिसाद: अधिराज

पूर्वाश्रमीचे गिर्जा असल्याने

सूड
गुरुवार, 07/24/2014 - 00:43 नवीन
पूर्वाश्रमीचे गिर्जा असल्याने हा मंत्र एका पूर्वाश्रमीच्या ब्रह्मवादिनीने रचला आहे असंही म्हणू शकता. ;)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

>>>>>हा मंत्र एका

अधिराज
गुरुवार, 07/24/2014 - 09:31 नवीन
>>>>>हा मंत्र एका पूर्वाश्रमीच्या ब्रह्मवादिनीने रचला आहे म्हणजेच हा मंत्र अपौरुषेय आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे ना? :)
↩ प्रतिसाद: सूड

>>म्हणजेच हा मंत्र अपौरुषेय

सूड
गुरुवार, 07/24/2014 - 14:29 नवीन
>>म्हणजेच हा मंत्र अपौरुषेय आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे ना? अगदीच तसं नाही, पण तसंच काहीतरी. ;)
↩ प्रतिसाद: अधिराज

>>>नोट ह्या मंत्राचा अधिकार

अधिराज
गुरुवार, 07/24/2014 - 09:44 नवीन
>>>नोट ह्या मंत्राचा अधिकार फक्त मिपाकरांनाच आहे ह्या मंत्रजपाचे काही विधीनिषेध असतील तर तेही सांगा. Image removed.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा