तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.
साहित्य:
२ मध्यम आकाराची भरताची वांगी
६-७ लसूण पाकळ्या बारीक चिरून
थोडासा लिंबाचा रस
अर्धी वाटी घट्ट दही (मूळ पदार्थात ग्रीक योगर्ट वापरले जाते. घरचे घट्ट दही सुद्धा चालेल. फक्त पाणी अजिबात नको)
चवीपुंरते मीठ
ऑलिव्ह ऑइल
सजावटी साठी कोथिंबीर
कृती:
वांगी गॅसवर खरपूस भाजून घ्या. गॅसचा पर्याय नसेल तर ओव्हन मध्ये भाजू शकता. नंतर वांग्याचे साल काढून गर मॅश करा. यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, दही, मीठ, बारीक चिरलेला लसूण (अर्धाच घ्या कारण उरलेला अर्धा फोडणीसाठी हवा आहे) हे सगळे एकत्र करा.
थोडे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उरलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी करा. ती या मिश्रणावर ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.
तळटीपा:
१. फोडणीची स्टेप पर्यायी आहे.
२. वाळवलेली पुदिन्याची पाने, कांद्याची पात इत्यादी घालून देखील यात व्हेरीएशन करता येईल
वाचने
9685
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
अब मै पयली!!
ए! आपल्या भरीता सारखच दिसतय
बाबा घनूज
आहाहा...
युssम्मी !
ओह्हो! भारी दिसतेय. गण्यानं
मस्त फोटो!
मस्त प्रेझेंटेशन ,मधुरा!
मला ही चित्र बघून आधी बाबा
ग्रील कर ओव्हन मध्ये.
In reply to मला ही चित्र बघून आधी बाबा by स्रुजा
वाह!!
आभार
५० ते ६० मि. ओव्हन मधे???
In reply to आभार by मधुरा देशपांडे
हो. गॅसवर नाही लागत एवढा वेळ
In reply to ५० ते ६० मि. ओव्हन मधे??? by दिपक.कुवेत
कुकरचा अजून एक उपयोग...
मधुरा , सानिका , अपर्णा ताई आणि इस्पिकचा एक्का
In reply to कुकरचा अजून एक उपयोग... by डॉ सुहास म्हात्रे
फटू बगून आनी येकंदर चवीचा
परवा 'रमादान' निमित्त 'रोजा
छान..
बाबा गनुशात तीळ घालतात.
वा छान आहे पाकृ
इंटरेस्टिंग वाटतोय
छान दिसतय टर्किश भरीत. करुन
वा मस्तच .......
जबरदस्त... वांग कुठल्याही
वांग कुठल्याही फॉर्ममध्ये खायला आवडेल.
In reply to जबरदस्त... वांग कुठल्याही by सुहास झेले
यथावकाश करुन पाहणेत येईल.
करून बघणार.
अपर्णासारखंच ऑलीव्ह ऑइल नाही
सर्व प्रतिसादकांचे पुनश्च