मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)

मधुरा देशपांडे · · पाककृती
तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो. साहित्य: २ मध्यम आकाराची भरताची वांगी ६-७ लसूण पाकळ्या बारीक चिरून थोडासा लिंबाचा रस अर्धी वाटी घट्ट दही (मूळ पदार्थात ग्रीक योगर्ट वापरले जाते. घरचे घट्ट दही सुद्धा चालेल. फक्त पाणी अजिबात नको) चवीपुंरते मीठ ऑलिव्ह ऑइल सजावटी साठी कोथिंबीर https://lh3.googleusercontent.com/-5YJWg5kueao/U8uWiOv7BeI/AAAAAAAADSI/5PM9WE7KLQM/w866-h577-no/DSC_0662.JPG कृती: वांगी गॅसवर खरपूस भाजून घ्या. गॅसचा पर्याय नसेल तर ओव्हन मध्ये भाजू शकता. नंतर वांग्याचे साल काढून गर मॅश करा. यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, दही, मीठ, बारीक चिरलेला लसूण (अर्धाच घ्या कारण उरलेला अर्धा फोडणीसाठी हवा आहे) हे सगळे एकत्र करा. थोडे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उरलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी करा. ती या मिश्रणावर ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा. https://lh5.googleusercontent.com/-2-ni7zkHl70/U8uWiH81IvI/AAAAAAAADSE/MPM5jZ0zSXA/w866-h577-no/DSC_0666.JPG तळटीपा: १. फोडणीची स्टेप पर्यायी आहे. २. वाळवलेली पुदिन्याची पाने, कांद्याची पात इत्यादी घालून देखील यात व्हेरीएशन करता येईल

वाचने 9658 वाचनखूण प्रतिक्रिया 30

अरे वा हे तर अरेबियन "बाबा गनूश" सारखे दिसतेय... फक्त यात दोन चमचे ताहिनी (बारीक वाटलेले पांढरे तीळ), चिमूटभर धणेपावडर आणि दह्याऐवजी लिंबाचा रस घातला की झाले ! अरेबियन खुबुस (गव्हाची जाड भाकरी) बरोबर बाबा गनूश आणि हुम्मुस म्हणजे जेवणाची युssम्मी सुरुवात !

स्रुजा Sun, 07/20/2014 - 20:58
मला ही चित्र बघून आधी बाबा गनूश च वाटलं. मला हा प्रकार फार आवडतो आणि याची रेसिपी हवीच होती . मनापासून धन्यवाद :) मागच्या वेळेला इकडच्या शेगडी वर मागच्या वेळी भरताचे वांगे भाजले आणि एकूण जो काही पसारा झाला त्याचा हरे राम ! ओव्हन मध्ये कसं भाजायचं वांगं ? सरळ मेश वर ठेवलं तर तोच गोंधळ होईल न परत? बेकिंग ट्रे मध्ये ठेवून होईल का ?

पाकृ आवडल्याबद्दल सगळ्यांचे आभार. हा पदार्थ बाबा गनुश सारखाच आहे. मूळ पदार्थाचे नाव तुर्किश मध्ये Yoğurtlu Patlican Salatasi असे आहे. स्रुजा, मी ओव्हन मध्ये भाजताना असे करते. वांग्याला थोडे तेल लावून सुरीने किंवा काट्याने टोचे मारून घ्यायचे. ओव्हन २००-२२० डिग्री वर प्रीहीट करायचा. बेकिंग ट्रे मध्ये वांगी ठेवून ५०-६० मिनिटे ठेवायचे. बेकिंग ट्रे च्या ऐवजी केकचे एखादे पसरट पॅन असेल तर तेही चालेल.

In reply to by दिपक.कुवेत

हो. गॅसवर नाही लागत एवढा वेळ पण इथे गॅस नाही ना. :( त्यामुळे ओव्हनला पर्याय नाही. आणि त्यात किमान ४५ मिनिटे लागतात.

भरीत अथवा बाबा गनूशसाठी वांगे शिजवायची सोपी (आणि भाजताना होणारा पसारा टाळणारी) पद्धतः कुकरमध्ये वांगे ठेवून (वांगे पाण्यात तरंगते) अर्धा कुकर भरेल इतके पाणी भरून तीन चार शिट्ट्या घ्याव्या. नंतर कुकर विस्तवावरून बाजूला ठेवून थंड झाल्यावर उघडावा. कमी वेळ लागतो, पसारा होत नाही, वांग्याची साले सहज निघतात आणि भरीत अथवा बाबा गनूशची चव वांगे भाजून केल्यासारखीच लागते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्रुजा Tue, 07/22/2014 - 06:45
वांगी भाजायच्या सगळ्यांच्या टीप साठी धन्यवाद :) वांगी कुकर मध्ये तुम्ही म्हणता तशी शिजवली तर खरपूस चव येणार नाही ना पण?

प्यारे१ Mon, 07/21/2014 - 01:45
परवा 'रमादान' निमित्त 'रोजा खोलने के वक्त' एकानं स्थानिक पदार्थ आणले होते. आम्ही गोश्त न खाने वाले. तेव्हा चव चाखायला मिळाली. आवडलं प्रकरण. खुसखुस की रोटी/डंडावाला ब्रेड के साथ. (हल्लीच्या 'शुक्रीटी'वाल्याकडं काठी असते तेवढ्या जाडी, उंचीचा डंडा ब्रेड)

दिपक.कुवेत Mon, 07/21/2014 - 10:45
आणि फोटो. हे अरेबीक भरीत एवढं आवडत नाहि. काहि ठिकाणी त्यात व्हिनेगर घालतात का? कारण खाताना चरचरीत लागतं म्हणुन....

एस Mon, 07/21/2014 - 12:22
वांगं आणि तेही आंबट वगैरे. काय माहिती! आपल्याला वांगं झणझणीत खायची सवय आहे. ;-) पण पाकृ मस्त. आणि ते फोटो छानच आले आहेत. विशेषतः काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या प्लेटचा वापर. प्रपेंना दीपक कुवेत यांनी केलेली सूचना तुम्ही अंमलात आणलीय याचा आनंद वाटला...! :-) पाकृबद्दल धन्यवाद!

Maharani Tue, 07/22/2014 - 09:31
वा मस्तच ....... मावेमधे full वर ७/८ मिनीटात वांगे भाजले जाते.तेल लावून टोचे मारून ४ मि.१ बाजू.....३/४मि. दूसरी ......तयार..