Skip to main content

श त्रू

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 18/10/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
घाटामधल्या वाटेवरती तो गोसावी बसतो मारून हाक, दावून धाक नजरेत विखारी हसतो खोचून त्रिशूल वाटेवर पसरे अर्धफाटकी भगवी छाटी चावुन दात, धावून जात निष्पाप जनांच्या पाठी मी जाई जेव्हा घाटामधूनी भित भित वेगात, हटकून मारील, वाटे मजला अन् लोळवील क्षणात आज ही असला दिवा भितीचा क्षण आला एकांती, पण मी चालत जाईन वाटेवरुनी दगड दुधारी घेऊन हाती हळूच पाहिले, धीर करुनी निजलेल्या त्या राक्षसाकडे पण, धुळ माखला चेहरा दिसला थिजले डोळे, तोंड वाकडे फाटुन गेल्या छाटीवरती त्रिशूल वाकूनी पडला होता पोटामधूनी निघुनी पाठी रक्ताचा ओघळ अडला होता मी हळहळलो, नकळत माझ्या गालावरुनी अश्रू गेला ? घाटावरच्या वाटेवरचा यार अनोखा अन् शत्रू गेला
लेखनविषय:

वाचने 1634
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया