द ईएमआय ट्रॅप
लेखनप्रकार
गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान.
lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत. किंमत बघून तितके पैसे आपल्याकडे जमलेले आहेत का? नसल्यास ते जमेपर्यंत खरेदी तहकूब. असल्यास ते इतर कुठल्या कारणासाठी राखून ठेवलेले नाहीत ना? त्यांचा इतर कुठे अधिक सदुपयोग होऊ शकतो का? हे प्रश्न पडताळले जात असत. आणि या सगळ्यातून जर निर्णय पुढे सरकलाच, तर ती गोष्ट विकत घेतली जाई. अपवाद इथेही असतीलच, परंतु सर्वसाधारण प्राधान्यक्रम हे असे असावेत.
आता हे क्रम प्रचंड बदलले आहेत. गरजेच्या गोष्टींआधी हव्या असलेल्या गोष्टी येतात. त्याही हव्या यासाठी असतात की त्या दुस-या कुणाकडे असतात, पण आपल्याकडे नसतात. जागतिकीकरणामुळे एका गोष्टीसाठी पाच कंपन्यांचे पर्याय असतात. प्रत्येक कंपनीच्या ब्रँडची एक पत असते. अर्थातच जास्त पत असलेला ब्रँड घेणं ही प्रथम पसंती असते. इथवर गोष्टी स्वाभाविक आहेत.
पुढे पैशाची गोष्ट येते जिथे ओढून ताणूनचा प्रकार बळावलेला आहे. कर्जसंस्कृती आधीही होती, परंतु त्या वाटेला जाणं हे काहीसं कमीपणाचं होतं. आता तसं नाही. कर्जहीन माणूस म्हणजे इच्छाहीन, आकांक्षाहीन माणूस. कारण, इच्छा तिथे पैसे, पैसे तिथे कर्ज असं समीकरणच आहे. भरीस भर म्हणून आलेला प्रकार म्हणजे क्रेडिट कार्ड. या क्रेडिट कार्ड संस्कृतीच्या प्रमाणाबाहेर लाडांमुळे आपणच आपल्याला कसे पिंज-यात बांधतो हे अनेकांना कळत नाही.
परवा एका मॉलमधे मी एक जाहिरातीचा फलक बघितला. त्यावर लिहिलं होतं, ‘डिझायनर वॉचेस. ईएमआय लो ऑफर्स, १९९९ ओनली.’आता घडयाळ ही गरजेची गोष्ट मानली, तरी डिझायनर घडयाळ ही चैनीची बाब होते. तर ही कुठल्याशा परदेशी कंपनीची लाखो रुपयांची घडयाळं मंडळी आता हप्त्यावर घेणार हा विचार करून हसू आलं. घर ठीक आहेत, गाडया ठीक आहेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठीक आहेत, पण घडयाळासारखी गोष्ट हप्त्यावर म्हणजे कहरच. उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स येतील. जगणंच ईएमआय वर होईल.
इथे पूर्वीचे सगळे क्रम उलटे झालेले आहेत. गरजेपेक्षा इच्छा, किमतीपेक्षा ब्रँड, आणि कुवतीपेक्षा ऑफर या गोष्टी मोठया झालेल्या आहेत. भारतीय ग्राहकाच्या मानसिकतेचा नेमका हाच कमकुवत दुवा आहे आणि तो कंपन्यांनी बरोबर हेरलेला आहे. मला आठवतंय माझा एक मित्र माझ्याकडे चांगला कॅमेरा कुठला अशी चौकशी करत होता. मी सहज ‘बजेट किती’ विचारलं असता तो म्हणाला होता की, ‘बजेट असं काही नाही, भारी पाहिजे कॅमेरा. तसंही ईएमआयवर घेणार आहे मी.’ ते ईएमआय दरमहा द्यायचा असतो हे त्याला ठाऊक होतं की नाही, कल्पना नाही.
ईएमआय, क्रेडिट कार्ड यांनी त्याच वेळेला एखादी गोष्ट खरेदी करणं शक्य होतं यात दुमत नाही. परंतु त्यामुळे प्रलोभित होऊन आपण आपल्या कुवतीच्या कक्षा बळेच रुंदावतो आणि मग ठरावीक रक्कम दर महिन्याला खात्यातून वजा होणार आहे, त्यावर भक्कम व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे, या गोष्टींची बोच भूल दिल्यागत तेव्हा आपल्याला जाणवत नाही. परंतु नंतर तो ईएमआय खात्यातून वजा व्हायला लागतो, तेव्हा मात्र आपल्याला ते ओझं जड होतं.
तेव्हा या ईएमआयच्या सापळ्यात आपण कमीत कमी अडकलेलंच हिताचं आहे. भलत्या उडया मारून नंतर लटकण्यापेक्षा सावध पावलं उचलणं कधीही योग्य असतं. माझ्या एका मित्राचे बाबा म्हणतात, Luxuries should never be bought with borrowed funds.’ अशी उदाहरणं, असे फलक बघितले की मला हे वाक्य नेहमी आठवतं.
हा लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आला होता त्याचा हा दुवा
वाचने
33867
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
ह्म्म
In reply to ह्म्म by राजेंद्र मेहेंदळे
अगदी मान्य
In reply to अगदी मान्य by केदार-मिसळपाव
+१
खरं आहे..
हे सगळं ब्रॅन्ड्स्चे आणि इतर
कंझ्युमर ड्युरेबल्स,
In reply to कंझ्युमर ड्युरेबल्स, by आदूबाळ
बरोबर आहे
मूर्ख जगात हवेतच ...
In reply to मूर्ख जगात हवेतच ... by चौकटराजा
तुमचे म्हणणे खरे असेल. पण ०%
कृपया हळू घ्या
In reply to कृपया हळू घ्या by पगला गजोधर
तुम्ही घाबरु नका!
EMI
In reply to EMI by आदिजोशी
अॅड्याशी सहमत. ईएमआय
चांगला विषय
luxury becomes necessity when
वपुंच्या 'दोंदे' ह्या कथेची
इएमाआय - सापळा
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
महागाई वाढेल वीस वर्षांत
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी
In reply to अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी by राजेश घासकडवी
पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट
In reply to पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट by यशोधरा
+१
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
३० लाखाच्या घराची २० वर्षांनी
In reply to ३० लाखाच्या घराची २० वर्षांनी by खटपट्या
३० लाखाचे २० वर्षात १ कोटी
In reply to ३० लाखाचे २० वर्षात १ कोटी by अमेरिकन त्रिशंकू
काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर
In reply to काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर by खटपट्या
लष्करातून निवृत्त होताना २००४
In reply to लष्करातून निवृत्त होताना २००४ by सुबोध खरे
या साठीच ...
In reply to या साठीच ... by चौकटराजा
वीस वर्षांपूर्वी विकत
In reply to वीस वर्षांपूर्वी विकत by धन्या
धन्या साहेब
In reply to धन्या साहेब by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली by धन्या
अपवादात्मक परिस्थितिच होत अस
In reply to अपवादात्मक परिस्थितिच होत अस by बेकार तरुण
नाही, भाड्याची घरं हे
In reply to नाही, भाड्याची घरं हे by आदूबाळ
दुकानं..
In reply to दुकानं.. by प्रभाकर पेठकर
दुकाने विकत घेवुन भाड्याने देणे हा घाट्याचा सौदा आहे.
In reply to दुकाने विकत घेवुन भाड्याने देणे हा घाट्याचा सौदा आहे. by बाबा पाटील
मोक्याची जागा महत्त्वाची.
In reply to मोक्याची जागा महत्त्वाची. by प्रभाकर पेठकर
जागा मोक्याचीच आहे.
In reply to जागा मोक्याचीच आहे. by बाबा पाटील
माझा अनुभव.
In reply to नाही, भाड्याची घरं हे by आदूबाळ
सहमत. जास्तीत जास्त कर्ज
In reply to सहमत. जास्तीत जास्त कर्ज by अनुप ढेरे
अर्र. सॉरी. वरचा प्रतिसाद
In reply to नाही, भाड्याची घरं हे by आदूबाळ
+१
In reply to लष्करातून निवृत्त होताना २००४ by सुबोध खरे
ज्याच्या त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात...
In reply to इएमाआय - सापळा by स्पार्टाकस
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी
लेख आवडला.
कर्ज....
In reply to कर्ज.... by प्रभाकर पेठकर
१००% सहमत !!
In reply to १००% सहमत !! by खटपट्या
असेच म्हणतो.
In reply to असेच म्हणतो. by सुबोध खरे
सहमत
In reply to सहमत by राजेंद्र मेहेंदळे
सहमत
In reply to सहमत by आदिजोशी
हाय!!!
कार्य आहे घरचं, होवू दे खर्च
In reply to कार्य आहे घरचं, होवू दे खर्च by पाषाणभेद
+१००
कर्जाला फायनान्सच्या भाषेत
मी तर म्हणतो कन्झ्युमरिझम हवा
ईएमआय
In reply to ईएमआय by कपिलमुनी
कर्जदाराच्या विम्याबरोबर
In reply to ईएमआय by कपिलमुनी
कर्जाचा विमा
In reply to कर्जाचा विमा by चित्रगुप्त
आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण
In reply to आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण by स्रुजा
सृजातै माझ्या डोक्यात जरा
In reply to सृजातै माझ्या डोक्यात जरा by आदूबाळ
माणुस व घर दोन्हीचा
In reply to आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण by स्रुजा
अगदी बरोबर. टर्म इन्श्युरन्स
प्लॅनींग आणि ऐपत
घाटी मंडळी
In reply to घाटी मंडळी by सुनील
असा लिहु नका
कर्ज
In reply to कर्ज by माईसाहेब कुरसूंदीकर
नेफळे का?
In reply to कर्ज by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेबांशी फुल सहमत!
लोन घेऊन फायदा
फारच उत्तम धागा. रथी
ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे
In reply to ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
रिव्हर्स मॉर्गेजींग
In reply to ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे by कॅप्टन जॅक स्पॅरो
रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे
In reply to रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे by सुबोध खरे
करेक्टाय!
In reply to रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे by सुबोध खरे
एकच सुधारणा. आपण त्या घरात
एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज
In reply to एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज by बाळ सप्रे
सगळं बरोबर आहे!
In reply to सगळं बरोबर आहे! by संजय क्षीरसागर
हेच म्हणते.
क्रेडिट कार्ड हे फक्त
In reply to क्रेडिट कार्ड हे फक्त by मराठी कथालेखक
क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे!
एकंदर (प्रतिसाद आणि लेख)
In reply to एकंदर (प्रतिसाद आणि लेख) by रामपुरी
थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत
In reply to थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत by अमेरिकन त्रिशंकू
थिओरेटिकलीच नव्हे पण
In reply to थिओरेटिकलीच नव्हे पण by रामपुरी
आणि माझं म्हणणं असं आहे की
In reply to एकंदर (प्रतिसाद आणि लेख) by रामपुरी
२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज
In reply to एकंदर (प्रतिसाद आणि लेख) by रामपुरी
गरज आणि चैन
In reply to गरज आणि चैन by चित्रगुप्त
गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते?
In reply to गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते? by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to सहमत by पियू परी
रोज सकाळी उठून दोघांनी कामाला जायचं यामुळे झोप देखिल
In reply to रोज सकाळी उठून दोघांनी कामाला जायचं यामुळे झोप देखिल by संजय क्षीरसागर
पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे.
उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स!
In reply to उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स! by शब्दबम्बाळ
चला म्हणजे आता ह्या
In reply to चला म्हणजे आता ह्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
कार चे