साहित्यः
बकर्याचे मांस (मटण) - १/२ किलो
दही - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप)
डालडा - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप)
खवलेला नारळ - १०० ग्रॅम (एक ते सव्वा कप)
मसाला वेलची - ३ नग
दालचिनी - १ इंचाचे ५ तुकडे
लवंगा - ६ नग
कांदा - २ नग मध्यम आकाराचे.
तिखट - दिड लहान चमचा. (टि स्पून)
आख्खं जीरं - अर्धा लहान चमचा (टि स्पून)
आलं - २ इंच
बदाम - ८० ग्रॅम ( कपभर)
मीठ चवीनुसार.
तयारी:
बकर्याचे मांस स्वच्छ धुवून निथळवून त्यात फेटलेले दही मिसळा आणि मुरण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्या.
नारळाचे पेलाभर पाणी घालून दूध काढून घ्या.
कांदा बारीक चिरुन घ्या.
आलं वाटून घ्या
बदाम पाण्यात टाकून ते आधण येण्याइतपत तापवा. बाजूला ठेवून द्या. थंड झाल्यावर बदाम सोलून वाटून (मिक्सर मध्ये पेस्ट करून) घ्या.
कृती:
एका कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तुप तापवून त्यात वेलची, दालचिनी आणि लवंग टाका. मसाला तळला जावून खमंग वास सुटला की बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला लाल होई पर्यंत मध्यम आंचेवर परता.
कांदा लालसर झाला की दही लावलेले मांस (मटण) त्यावर टाकून परता. आता त्यावर मीठ, तिखट, जीरं आणि वाटलेलं आलं टाकून परता. पेलाभर पाणी टाकून झाकण लावून मंद आंचेवर शिजवा. पूर्ण नीट शिजायला ३५ ते ४० मिनिटे लागतात.
दर १०-१५ मिनिटांनी ते वरखाली करून जळत नाहीए ह्याची खात्री करा. मांस शिजलं की त्यावर वाटलेले बदाम घालून परतत राहा. तळाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे कलीया पासून दूर जाऊ नका. बदाम पेस्ट शिजली की त्यावर नारळाचे दूध घालून मिसळा आणि मंद आंचेवर, तुपाचा तवंग येईपर्यंत शिजवा. नारळाचे दूध घातल्यावर कलीया उकळणार नाही अशा पद्धतीने मंद आंच ठेवा. ५ मिनिटांनी आंच बंद करा. कलिया तयार आहे.
परोठा किंवा भाताबरोबर कलियाचा आनंद लुटा.
शुभेच्छा....!
मस्त रेसिपी.श्रावण सुरु
कलिया एकदम कल्ला दिसतोय. पण
In reply to कलिया एकदम कल्ला दिसतोय. पण by शिद
मटण खरेदी आणि शिजविणे.
In reply to मटण खरेदी आणि शिजविणे. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद पेठकर काका.
In reply to धन्यवाद पेठकर काका. by शिद
परदेशात असल्यास खालील नावे
In reply to धन्यवाद पेठकर काका. by शिद
नाही चालणार.
In reply to नाही चालणार. by प्रभाकर पेठकर
धाग्यावर जास्त अवांतर नको
आई ग्ग्ग..!!! मला वाटलं बदाम
हा प्रकार सुद्धा बर्याच
डालडाच्या
In reply to डालडाच्या by मुक्त विहारि
चालेल.
मेंदुसाठी उपयुक्त पाकॄ!
In reply to मेंदुसाठी उपयुक्त पाकॄ! by आयुर्हित
शेंगदाण्याचे तेल
वा काका... तोंडाला पाणी सुटले
In reply to वा काका... तोंडाला पाणी सुटले by Mrunalini
अगदी हेच म्हणतेय
लय भारी !
क्लास !
वाचून गेले. हमको उपयोग नही है
In reply to वाचून गेले. हमको उपयोग नही है by रेवती
रेवती..
In reply to रेवती.. by प्रभाकर पेठकर
ओक्के.
रविवारी सावकाश तयारी करून
In reply to रविवारी सावकाश तयारी करून by खटपट्या
हो चालेल.
फोटो फारच टेम्टींग आलाय
In reply to फोटो फारच टेम्टींग आलाय by दिपक.कुवेत
हम्म्म!
खतरनाक !!! नाव बरेच मिसलीडिंग
In reply to खतरनाक !!! नाव बरेच मिसलीडिंग by विश्वनाथ मेहेंदळे
मुघलाई पद्धती...
In reply to मुघलाई पद्धती... by प्रभाकर पेठकर
इतिश्री कालिया पुरण ....वा
In reply to मुघलाई पद्धती... by प्रभाकर पेठकर
च्यायला..खाद्यपदार्थांचा
In reply to च्यायला..खाद्यपदार्थांचा by बॅटमॅन
तुला मेल्या इतिहासातच रस
In reply to मुघलाई पद्धती... by प्रभाकर पेठकर
सविस्तर प्रतिसादासाठी आभार.
In reply to मुघलाई पद्धती... by प्रभाकर पेठकर
अजून एक, हे असे वेगळे पदार्थ
In reply to अजून एक, हे असे वेगळे पदार्थ by विश्वनाथ मेहेंदळे
शोधा म्हणजे सापडेल.
गटारी स्पेशल. छान आहे रेसिपी.
पाककृतीचे नाव पाहून वाटल कि
पाककृती सोबतच तुमचे
In reply to पाककृती सोबतच तुमचे by गणपा
कसचं..कसचं...
In reply to पाककृती सोबतच तुमचे by गणपा
+१
In reply to पाककृती सोबतच तुमचे by गणपा
+१००
In reply to पाककृती सोबतच तुमचे by गणपा
ह्येच बोलतो...
In reply to पाककृती सोबतच तुमचे by गणपा
+१
पाकृ अगदी तपशीलवार
भारीच !!!
तोंडाला पाणी सुटले.