मितानताईने दिलेले पाकातले चिरोटे बघून तोंडाला पाणी सुटलेय :) . त्यात पाकातल्या पुर्या व चिरोटे म्हणजे विकपॉईंट आहे . ताईने दिलेल्या पाककृतीला आम्ही पाकातले चिरोटे म्हणतो आणि रवा-मैद्याच्या किंवा कणकेच्या पुर्यांना साखरेच्या पाकात घोळवून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे पाकातल्या पुर्या . मग काय पाकातल्या पुर्या खाऊन किती किती महिने झाले आठवतदेखील नाही, म्हट्ले आज बनवूनचं टाकू, जीभेचे चोचलेच म्हणा हवं तर ;)
माझी आई आमरस घालून पुर्या करते व त्या पाकात घोळवते, अनायसे घरात आमरसाचा टिन होताच (हो हो आता आम्हाला कुठे मिळतोय हापूस आंबा...असो ) मग विचार केला इतर साहित्य ही घरात आहेच तर मग होऊन जाऊ दे :)
साहित्यः
१ वाटी मैदा
१/२ वाटी पेक्षा जरा कमी बारीक रवा
अंब्याचा रस मैदा भिजवण्यापुरता लागेल तसा (ताजा आमरस ही वापरू शकता)
३/४ वाटी साखर (प्रमाण आमरसाच्या गोडीवर ठरवावे किंवा आपल्या आवडीनुसार)
१/२ वाटी पाणी
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून जायफळपूड
केशराचा काड्या
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून बदाम +पिस्ता+काजू तुकडे सजावटीसाठी
३टेस्पून तेल
पुर्या तळण्यासाठी तेल / तूप
पाकृ:
एका भांड्यात मैदा,रवा एकत्र करावे. त्यात ३ टेस्पून तेलाचे कडकडीत मोहन घालावे.
चांगले मिक्स करुन घ्यावे.
आमरस थोडा थोडा करून मैद्यात घालावा व नीट मिक्स करावे.
पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे व झाकून १५-२० मिनिटे ठेवावे.
१५-२० मिनिटांनंतर पीठ चांगले कुटून घ्यावे किंवा रवा-मैदा चांगला मळून घ्यावा.
मोठी जाडसर पोळी लाटून हव्या त्या आकाराच्या, लहान-मोठ्या पुर्या कातून घ्याव्यात.
दुसरीकडे तेल / तुप गरम करत ठेवावे.
वेगळ्या पातेल्यात साखर + पाणी+ लिंबाचा रस + वेलचीपूड + जायफळपूड+ केशर काड्या एकत्र करून गॅसवर ठेवावे.
साखरेचा दोन तारी पाक तयार करा.
तळणीत अलगद पुर्या सोडून मंद आचेवर तळून घ्याव्या.
पुर्या तळल्याबरोबर कोमट पाकात घालून मुरत ठेवा.
दुसर्या पुर्या तळून झाल्या की आधीच्या पाकातल्या पुर्या निथळून ताटात काढून ठेवा.
सर्व पुर्यांवर बदाम +पिस्ता+काजूचे तुकडे लावून सजवावे.
सणासुदीला पक्वान्न म्हणून बनवता येतात.
नेहमीच्या पुर्यांपेक्षा आमरस घालून केलेल्या पुर्या वेगळा प्रकार म्हणून छान लागतो.
पुर्या फार जाड लाटायच्या नाही नाहीतर त्या चिवट होतात.
अशाच प्रकारे कणकेच्या ही पाकातल्या पुर्या करता येतात.

दुसरीकडे तेल / तुप गरम करत ठेवावे.
वेगळ्या पातेल्यात साखर + पाणी+ लिंबाचा रस + वेलचीपूड + जायफळपूड+ केशर काड्या एकत्र करून गॅसवर ठेवावे.
साखरेचा दोन तारी पाक तयार करा.
तळणीत अलगद पुर्या सोडून मंद आचेवर तळून घ्याव्या.
पुर्या तळल्याबरोबर कोमट पाकात घालून मुरत ठेवा.
दुसर्या पुर्या तळून झाल्या की आधीच्या पाकातल्या पुर्या निथळून ताटात काढून ठेवा.
सर्व पुर्यांवर बदाम +पिस्ता+काजूचे तुकडे लावून सजवावे.
सणासुदीला पक्वान्न म्हणून बनवता येतात.
नेहमीच्या पुर्यांपेक्षा आमरस घालून केलेल्या पुर्या वेगळा प्रकार म्हणून छान लागतो.
पुर्या फार जाड लाटायच्या नाही नाहीतर त्या चिवट होतात.
अशाच प्रकारे कणकेच्या ही पाकातल्या पुर्या करता येतात.
वाचने
21775
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_ _/\_ _/\_
Bhannat ga sanika...
मस्त
ओ ताई
मेलोssssssssss...!!!
थांबा गुर्जी...
In reply to मेलोssssssssss...!!! by अत्रुप्त आत्मा
मध्यवर्ती
In reply to थांबा गुर्जी... by मुक्त विहारि
आजकाल आम्ही ...मध्यवर्ती... हे बिरूद
In reply to मध्यवर्ती by राजेंद्र मेहेंदळे
व्वा..
मस्तं.
तुझे कौतुक करायला शब्द नाहीत
तिरडी उचला रे!!!
शुभ बोल मामी म्हटलं तर
In reply to तिरडी उचला रे!!! by शुचि
त्या मूळच्या कोकणातल्या पण
In reply to शुभ बोल मामी म्हटलं तर by रेवती
कातून केलेल्या पुर्या
तीट लावल्या बद्दल
In reply to कातून केलेल्या पुर्या by प्यारे१
खिक्क!
In reply to तीट लावल्या बद्दल by गणपा
वाह ! किती दिवस टिकतात ?
@ स्रूजा
In reply to वाह ! किती दिवस टिकतात ? by स्रुजा
+१११
In reply to @ स्रूजा by दिपक.कुवेत
असल्या पुर्या ताटात जास्तीत
In reply to वाह ! किती दिवस टिकतात ? by स्रुजा
उफ्फ्!
अहाहा!
हाय........
अगं, काय हे! नको हे अत्याचार!
अहाहा...
:ऑ
किती सुंदर गं
खल्लास!!!
(No subject)
वा वा वा.. पाकातल्या पुर्या
काय खलास फोटो !
खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
........
वारल्या गेलो आहे...
भारी दिसताय पुर्या
रवा- मैद्याच्या पुर्या
In reply to भारी दिसताय पुर्या by जासुश
कातून केलेल्या पुर्या पण अशा
हे आमरसाचे वेरीयेशन उत्तम आहे
आहा!!!!
जाम म्हणजे जामच भारी. तोंडाला
कातुन केलेल्या पु-या कातील
जाऊदे,
जाऊदे,
कै बोलणार नै.
अप्रतिम...पुढे शब्द संपले ग..
+१
In reply to अप्रतिम...पुढे शब्द संपले ग.. by इशा१२३
मस्त!!!
लाजवाब !!
आभार!!
देवी आमच्या नेत्रकमलास अपार
पा.कृ. आणि फोटो "खल्लास" आहेत
मस्ताड पाकृ! अन खुसखुशीत
शब्द नाहीत
हम काबु मे कैसे रहे?
खल्लास. करुन पाहणार.