Skip to main content

निघून गेली रात्रपरी

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 18/10/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्ताच्या बुंध्यापाशी पाउस पाडून शुभ्रकेशरी सुगंध सांडून अशीकशी निघून गेली रात्रपरी दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी निघून गेली रात्रपरी उषाराणीच्या कोमल गाली सोडून गेली रंग जरतरी कांचनात मिसळून लाली निघून गेली रात्रपरी मदनाक्षीची नीज जपोनी कुंतलास ती विखरी मिलनाची कसक ठेवूनी निघून गेली रात्रपरी चांदणे शिंपीत गेली रात्रभर गगनात जरी करुन उषेला मंत्रखुळी निघून गेली रात्रपरी
लेखनविषय:

वाचने 2686
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सुंदर कविता. मिलनाची कसक ठेवूनी निघून गेली रात्रपरी. हे आवडलं खास.

अरूणराव, केवळ अप्रतीम काव्य! वाचून खूप प्रसन्न वाटले! तात्या.

दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी निघून गेली रात्रपरी व्वा ! फार सुंदर

फारच सुंदर कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सर्व वाचकांचे आभार.

दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी हे खास आवडले

In reply to by पावसाची परी

असाच स्नेह राहू द्या.

सकाळीच एकदम सुरेख कविता वाचायला मिळाली :) >> प्राजक्ताच्या बुंध्यापाशी >> पाउस पाडून शुभ्रकेशरी >> सुगंध सांडून अशीकशी >> निघून गेली रात्रपरी कवितेची सुरूवातच खूप खूप आवडली ! >> मदनाक्षीची नीज जपोनी >> कुंतलास ती विखरी >> मिलनाची कसक ठेवूनी >> निघून गेली रात्रपरी क्या बात है ! मदनाक्षी डोळ्यांसमोर आली :)