मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<<< कथामोजी >>>

प्यारे१ · · पाककृती
साहित्यः १. एखादी पन्नास ते सत्तर ओळींमधली साधीशी कथा अथवा किस्सा. २. रोजच्या वापरात शक्यतो नसलेले एखादा मराठी अथवा इंग्रजी भाषेतला मराठी लिपीत लिहीलेले शब्द. ३. वरील प्रमाणेच प्रकारची नावे. ४. बक्खळ काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार आणि मोडके पाय. ५. विरामचिन्हं टाकावीशी वाटतील तेव्हा. कृती: कुठलाही किस्सा घ्या अथवा गोष्ट घ्या. त्यातल्या वाक्यांची आणि शब्दांची सालं काढून घ्या. त्यांचे अर्थ वेगळे करा. आता काहीही बादरायण संबंध असलेले/ नसलेले चार पाच नावांचे लोक घ्या. त्यांना वरील वाक्य आणि शब्दात गुंफा. डोळ्याला पट्टी बांधून गाढवाला शेपूट काढतात तसं सालं काढलेल्या शब्दांना कुठंही काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार द्या. सजावटीसाठी एखादा शब्द अर्धवट मोडा. फारच सरळसोट दिसत असेल तर एखादा पॅरेग्राफ खाली या. (टी आर पी च्या आवश्यकतेनुसार 'तयार' बल्लव अशा गोष्टी करु शकतात.) सगळ्यात शेवटी विरामचिन्हांचा सढळ हस्ते वापर करा. झाली आपली पाककृती तयार! (ता. क. ह्या पाकृस फोटो नाहीत. पण 'इच्चुकां'नी मिपावरचे सर्वाधिक यशस्वी धागे शोधून पहावेत. त्यात आपणास आवश्यक ते डो़ळे निववणारे प्रकार 'निच्चित' सापडतील.)

वाचने 6830 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by सस्नेह

सस्नेह Sun, 07/06/2014 - 22:31
आमचेकडे, शब्दांची साले काढण्याचे सालकाढणे, गाढवांना शेपट्या काढण्याची पेण्शिल, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, अर्धचंद्र, रफार इ.साठी अर्धचंद्राकार कातणे इ. साहित्य माफक दारात मिळेल !

In reply to by किसन शिंदे

प्यारे१ Sun, 07/06/2014 - 22:31
कोण कोणास कधी कुठे कुठल्या परिस्थितीत म्हणाले? ससंदर्भ स्पष्ट करा. - ५ गुण. धन्यवाद. सीरियसली कुणासाठी आहे रे वरचं वाक्य किस्ना?

In reply to by अजया

धन्या Mon, 07/07/2014 - 08:28
शेजार्यांच्या घरातील पाकृच्या वासावर उपाय म्हणून घाईघाईने ही पाकृ बनवली असावी. अती घाई, पाकृ करपून जाई !!!

In reply to by धन्या

प्यारे१ Mon, 07/07/2014 - 13:31
क्या आप के डिक्शनरी में 'भाग्य' नाम का कोई शब्द है? (क्या आपके टुथपेस्ट च्या चालीवर) आणि आमच्याकडं विनय बिनय नाय बरं का! ;) -ट्यार्पी प्रयत्नशील!

In reply to by प्यारे१

धन्या Mon, 07/07/2014 - 13:37
क्या आप के डिक्शनरी में 'भाग्य' नाम का कोई शब्द है?
आहे की, मात्र आमची भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. माणसाच्या आयुष्यातील संधीं किंवा अधोगती यांना पुरक किंवा मारक ठरणारे सारे अंतर्बाह्य घटक म्हणजे भाग्य.

In reply to by धन्या

धन्या Mon, 07/07/2014 - 13:39
एक सांगायचं राहीलं, या अंतर्बाह्य घटकांमध्ये आकाशातील ग्रह तारे येत नाहीत. पूर्वसंचित वगैरे आमच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही त्यामुळे तेही यात येत नाही. :)