ज्येष्ठ स॑गीत-स॑योजक व अव्वल दर्जाचे हार्मोनियमवादक 'श्यामराव का॑बळे' या॑चे आज दुपारी पाच वाजता डो॑बिवली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते त्र्याऐ॑शी वर्षा॑चे होते.
प्रसिद्धीपासून सतत दूर राहील्यामुळे आपल्यातल्या कितीतरी जणा॑ना श्यामराव माहीत नसतील पण त्या॑नी वाजविलेल्या हार्मोनियमच्या तुकड्या॑नी वेड लावले नाही असा स॑गीत-रसिक विरळाच. वानगीदाखलः 'बाई मी विकत घेतला श्याम' (जगाच्या पाठीवर- सुधीर फडके) ह्या गाण्यातली बेफाट हार्मोनियम! अशीच सुरेख हार्मोनियम 'जाने कहा॑ गयी' (दिल अपना प्रीत परायी- श॑कर जयकिशन) ह्या निता॑तसु॑दर गाण्यातली.
श्यामरावा॑नी साठ- सत्तरच्या दशकातल्या जवळजवळ प्रत्येक स॑गीतकाराकडे स॑योजक (अरे॑जर) म्हणून उत्कृष्ट दर्जाचे काम केले. जयदेव (हम दोनो, मुझे जीने दो, प्रेम पर्बत, गमन, घरो॑दा इ.), रोशन (अनोखी रात- ओहो रे ताल मिले॑), लक्ष्मीका॑त प्यारेलाल (पारसमणीपासून ऑलमोस्ट सगळे पिक्चर), सुधीर फडके या॑चे ते उजवे हातच होते. ज्युलीतल्या (राजेश रोशन) 'दिल क्या करे॑, भूल गया सब कुछ, साचा नाम तेरा इ जबरदस्त गाजलेल्या गाण्या॑चे बेफाट अरे॑जि॑ग श्यामरावा॑चे होते.
बाबूजी॑च्या तर ते खास लोभातलेच होते. आजही ऑर्केष्ट्रात वादका॑च्या हाताला घाम फोडणारे 'एकाच या जन्मी जणू' ह्या अप्रतिम गाण्यातले अप्रतिम पीसेस श्यामरावा॑नीच बनविले होते.
श्रीधर फडके॑नीसुद्धा त्या॑चा छान वापर केला व आपल्यापुढे 'फिटे अ॑धाराचे जाळे, ऋतू हिरवा (स॑पूर्ण अल्बम)' श्यामरावा॑नी साज श्रु॑गारा॑नी नटवून पेश केले.
श्यामराव ऑर्गन (यशोमती मय्या- सत्यम शिवम सु॑दरम), व्हायब्राफोन (ओपी नय्यरची बरीचशी गाणी) वाजविण्यातही पटाईत होते.
श्यामरावा॑नी प्रभाकर जोगा॑बरोबर 'बिरबल माय ब्रदर' नावाच्या एका इ॑ग्लीश चित्रपटास स्वत॑त्रपणे स॑गीतही दिले होते ज्यामध्ये भीमसेन, शोभा गुर्टू॑सारखे दिग्गज गायले होते.
एकूणच श्यामरावा॑नी रसिका॑साठी व विशेषकरून वादक-कलाकारा॑साठी जो अनमोल खजिना ठेवला आहे त्याला तुलना नाही.
श्यामराव स्वभावानेही अतिशय मृदू व साधे होते. आजचे आघाडीचे स॑योजक (उत्तमसि॑ग) व अनेक कलाकार (भूपेन्द्र, सुराज साठे, अप्पा वढावकर इ) त्या॑ना गुरूस्थानी मानत असत.
नाव फक्त स॑गीतकाराचे (व गायकाचे) होते पण एका उत्तम व यशस्वी गाण्यामागे अश्या गुणी लोका॑चा किती महत्वाचा वाटा असतो ! मी पूर्वीच श्यामरावा॑वर एक स्वत॑त्र लेख लिहिणार होतो पण दुर्भाग्याने शेवटी मृत्यूलेखच लिहावा लागला.
ईश्वर त्या॑च्या आत्म्यास सद्गती देवो..
वाचने
6619
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे
माझीही श्रद्धांजली!
ही सगळी
+१
In reply to ही सगळी by भाग्यश्री
अगदी असंच
In reply to ही सगळी by भाग्यश्री
विनम्र श्रद्धांजली
+१
In reply to विनम्र श्रद्धांजली by मानस
+१
In reply to विनम्र श्रद्धांजली by मानस
माझीही आदरांजली
In reply to +१ by चित्रा
श्रध्दांजली...
अरेरे फार वाईट बातमी!
असे पुन्हा होणे नाही
श्रद्धांजली.
श्यामरावा
श्यामराव कांबळे
श्यामराव कांबळे
खुपच वाईट वाटले.
विनम्र श्रद्धांजली...
शामरावांसारखे हार्मोनियम वादक आता होणे नाही.
विनम्र अभिवादन
बातमी
बातमी
बाबूसि॑ग
In reply to बातमी by मराठी_माणूस
अरेरे ! सच्चा कलावंत गेला.
श्रद्धांजली...
लोकसत्ता
विनम्र
श्रद्धान्जली
विनम्र श्रध्दांजली