कहां गये वो लोग?--आजीबाई
लेखनप्रकार
कहां गये वो लोग?--बाबूकाका
आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं
आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन
काल का नाही आलीस गे आजीबाई?
येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर
पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती?
तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची. चेहरा कायम सुरकुतलेला,नाकात सुंकलं,हातावर सखुबाई असे नाव गोंदवलेलं,आगरी पद्धतीचं काचा मारलेलं गुढघ्यापर्यंत येणारं लुगडं आणि हिरवी काठाची चोळी हाच तिचा नेहमीचा वेष.तिच्या डोळ्यात कायम एक हसरा प्रेमळ भाव दिसायचा जसा आज्जीच्या चेहर्यावर असतो, बहुधा म्हणुनच तिचे नाव आजीबाई पडले असावे.
आईची सकाळी कामावर निघायची घाई चाललेली असायची तेव्हा साधारण आजीबाई उगवायची. ती आली म्हणजे लगेच कामाला सुरवात असे नाही.म्हातारपणाने आणि उन्हातून आल्याने पहीले तिला काही दिसायचे नाही बहुतेक. थोडा वेळ भिंतीला टेकुन बसली आणि पाणीबिणी प्यायली कि ती हुशारीत यायची. मग आई तिला चहा देणार. तो पिउन झाला कि आमची आजीबाई सावकाश कोपर्यातला कुंचा हातात घ्यायची.
आई ऑफिसला जातांना तिला काय काय सुचना देउन जायची. त्यातले किती आजीबाई लक्षात ठेवायची हा वेगळाच मुद्दा. आई निघुन गेली की काही वेळाने आजीबाईचे झाडणे संपुन ती भांडी घासायला लागायची. कपडे धुण्यासाठी वेगळी बाई असल्याने हे काम झाले की आजीबाई मोकळी.
मग कधी कधी आजी तिला भाजी आणायला पाठ्वायची किंवा एखादवेळी मी फार त्रास देत असेन तर मला कडेवर बसवुन देवळात घेउन जायला सांगायची.कधी यापैकी काहीच नसेल तर आजीबाई मस्त आपल्या चंचीतुन थोडी तंबाकु आणि कसलीतरी पाने काढायची आणि झकास विडी तयार करुन ओढायला लागायची...अर्थात आजीच्या नकळत. मला तर ती विडी कशी वळते आणि ओढते हे बघायला जाम आवडायचे.
मग ती अजुन एक दोन घरची कामे करुन पुन्हा आमच्याकडे येई आणि २ लाकडी खुर्च्या जोडुन त्यावर मस्त ताणुन देई.उन्हे थोडी उतरली की घरचा रस्ता पकडत असे.कधी गावठी कडवे वाल तर कधी मेणी काकडी असेही काहीबाही घेउन येत असे.
एकदा आजीबाई आठवडाभर कामाला आलीच नाही. आईला तिचा पत्ता साधारण माहीत होता.मग एका रविवारी मी आणि आई आजीबाईचे घर शोधत निघालो. मुख्य म्हणजे तिच्या आसपासच्या घरांमध्ये तिला आजीबाई या नावाने ओळखणारे कोणीच नव्हते.आम्ही आपले चुकत माकत कसेतरी तिचे घर शोधण्यात यशस्वी झालो.
मला आणि आईला बघुन आजीबाईला फार आनंद झाला. पहीले म्हणजे आपल्या तब्बेतीची चौकशी करायला कोणी येईल अशी अपेक्षाच तिने केली नव्हती. दुसरे म्हणजे तिचे घर कोणाला सापडेल असेही तिला वाटले नाही.आणि फोन वगैरे तर तेव्हा नव्हतेच्.तिची मुले,मुली,सुना सगळ्यांना तिने आमची ओळख करुन दिली.आग्रहाने चहा प्यायला लावला,खायला काय काय पापड्,कुर्ड्या वगैरे तळले,शिरा केला.माझ्या चेहर्यावरुन पुन्हा पुन्हा हात फिरवुन कशाला याला उन्हातुन घेउन आलीस? म्हणुन आईला विचारत राहीली.
माझ्यामते आजीबाईला तशी पैशाची ददात नव्हती.मोठे घर,त्यापुढे सारवलेले अंगण, लांब गावाबाहेर शेत, बैलाची जोडी असा चांगला पसारा होता.केवळ जुने संबंध आणि शरीराला थोडी कामाची सवय म्हणुन ती आमच्याकडे काम करत असावी.आजी असेपर्यंत आजीबाईपण आमच्याकडे येत राहीली. नंतर केव्हातरी यायची थांबली.
मस्त विडीचा धूर सोडणारी आजीबाई आठवणीत मात्र राहीली.
वाचने
6870
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आहा....आजीबाई चेहर्यासमोर
छान
हाही भाग छान!! पुढच्या भागाला
In reply to हाही भाग छान!! पुढच्या भागाला by सूड
धन्यवाद
चांगला जमलाय हाही भाग - पण
In reply to चांगला जमलाय हाही भाग - पण by आतिवास
अहो त्यात काय
In reply to अहो त्यात काय by राजेंद्र मेहेंदळे
कुणाच्या भावना कशाने दुखावतील
तो पिउन झाला कि आमची आजीबाई
In reply to तो पिउन झाला कि आमची आजीबाई by अनिता ठाकूर
योग्य निरीक्षण
In reply to योग्य निरीक्षण by राजेंद्र मेहेंदळे
>>कुंचा,झाडु,सळाती वेगवेगळे
In reply to योग्य निरीक्षण by राजेंद्र मेहेंदळे
कुंचा,झाडु,सळाती - विदर्भात
In reply to कुंचा,झाडु,सळाती - विदर्भात by मधुरा देशपांडे
कुंचा झाडू आणि लक्ष्मी
हाही लेख छान
In reply to हाही लेख छान by एस
जरुर
सुरेख जमले आहे व्यक्तीचित्रण.
आवडले.
रंगतदार व्यक्तिचित्रण
आवडले व्यक्तिचित्रण.
In reply to आवडले व्यक्तिचित्रण. by किसन शिंदे
सुंकलं
In reply to सुंकलं by राजेंद्र मेहेंदळे
सुंकलं म्हणजे
व्यक्तिमत्व घडवा.
In reply to व्यक्तिमत्व घडवा. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
हे पण व्यक्तीचित्रण
खूप छान!
वाह! लेखन आवडले. आजीबाई