इमारत..
मी टकमक पाहतो
त्या उच्चभ्रु अलिशान इमारतीकडॆ
जीला गर्व जाणवतो
स्वत:च्या उच्च्भ्रु अस्मितेचा आणि
तिच्या प्रस्थापित संस्कॄतीचा
म्हणुनच;
ती हसते
माझ्य़ा खुज्या अस्तित्वाकडॆ बघुन..
रंगबेरंगी प्रकाशात ती सजते
पिवळ्य़ा कांतीची नववधु भासते
आता तीलाही जाणवते
स्वत:मधील एक हुकमी अस्तित्व
मग;
ती स्वत:च्या साहेबांचे अनुकरण करते आणि
काही फ़ुटाच्या अंतरावर असलेल्या
माझ्य़ाकडॆ व माझ्य़ासारख्या असंख्य
लहान खुराड्य़ांकडॆ बघुन
ती स्वत:ताला पुन्हा एकदा प्रस्थापित करते....!
वैभव देशमुख २३८
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
996
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप छान कविता!
खुप छान कविता! भावना पोचल्या!!
स्वप्न बघायला उद्द्युक्त करणे हे देखील एक महत्त्वाचे कार्य आहे, जे अर्थव्यवस्थेला चालना देण्याला मदतच करते.
उदा: लहानपणी एक कविता ऐकलेली ......
गणपत वाणी बीडी पितांना
चावायची नुसतीच काडी
आणि मनाशीच म्हणायचा
या जागेवर बांधिन मी माडी.
यावरुन
टकमक पहायला लावणे
हेच तर ध्येय आहे
त्या उच्चभ्रु अलिशान इमारतींचे!
प्रस्थापितांचे डोळस अनुकरणच
असंख्य लहान खुराड्य़ांचे
उच्चभ्रु अलिशान इमारतींमध्ये
रुपांतर करण्याची ताकद निर्माण करु शकतात!
चांगला प्रयत्न
अजून सफाईदार लिहिता येईल. काही ठिकाणी प्रवाह जरा अडखळल्यासारखा वाटला पण रेग्युलर लिहीत रहा.