((अपडेट २०२१ जुलै
Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.))
जानेवारी महिन्यात कर्नाटकात थोडी भटकंती केली होती त्याची थोडक्यात माहिती देत आहे .
फोटो
इथे कलादालनातआहेत.
सर्व फोटो नोकिआ X2-00चे
काही नकाशे खाली दिले आहेत .
प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत
बिजापूर नकाशा
भटकंतीची ठिकाणे ऐतिहासिक आणि पुरातन (हेरिटिज) स्वरूपाची आहेत .धार्मिकपण नाहीत .सर्वाँना आवडतील अशी थंड हवेची ठिकाणे अथवा समुद्रकिनारे नाहीत . बदामि ,हम्पि आहे .बिजापूर (विजापूर)ही पाहिले गोलघुमटसाठी .
केव्हा जावे:
मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही .
मार्ग:
रेल्वे सोयीची आहे .बिजापूर मोठे स्टेशन आहे .सोलापूरपासून दोन तास लागतात .याच मार्गावर पुढे आणखी दोन तासावर बदामि आहे .मुख्य गाव पाच किमी दूर आहे .आणखी दोन तासावर गदग स्टेशन आहे ,येथे अकरा किमीवर लखुंडी आहे .गोव्यातून एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हम्पि आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .
(२)सोलापूर हुबळी एक्सप्रेस ११४२३ रोज
(३)हुबळी ते मुंबईसाठी
चालुक्य ए ११००६ /११०२२ ,
शरावती एक्स ११०३६ ,
शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो .कोरडी आणि आल्हाददायक हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात .स्वत:चे वाहन नसले आणि राज्य परिवहनाच्या बसने जात असाल तरीही तुमचा प्रवास आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात .
हॉटेल्स : (अपेक्षित दिवस)
विजापूर (१),बदामि(२) आणि होस्पेट (२)तीनही ठिकाणी सर्व थरातली भरपूर हॉटेल्स आहेत .लखुंडीला काही नाही .जाता जाता करता येते .
खाणे :काही प्रश्न नाही .
काय पाहाल :
बिजापूर -गोलघुमट ,ईब्राहिम रोजा ,उपली बुरूज आणि मोठी 'मलीक ए मेदान' तोफ .
बदामि :चार गुंफा ,अगस्ति तलाव ,पंधरा देवळे ,बनशंकरी स्थान आणि तलाव .एक दिवस .
ऐहोळे आणि पट्टडकल: (बदामिहूनच जाऊन येणे) पंचवीस देवळे .
हम्पि :तुंगभद्रा डैम ,नदी काठची देवळे खासकरून विरुपाक्ष आणि विठ्ठलमंदिर ,दगडी रथ .विजयनगर साम्राज्याचे अवशेष .
लखुंडी :अकरा खास देवळे .
हुबळी :रेल्वे स्टेशन आणि इमारत .
बिजापूर -१(विजापूर):
मी इथे दोन वर्षाँत दोनवेळा आलो .सुरुवात बिजापूर पासून करणे सोयीचे पडले कारण मुंबईहून थेट गाडी ५१०२९आहे जी दुपारी एक वाजता पोहोचते .स्टेशनहून बस स्टैंडकडे जातानाच गोलघुमट आहे परंतु प्रथम हॉटेलच्या रुमवर सामान टाकून मोकळे फिरायला बाहेर पडायचे .ललितामहाल बजेट हॉटेल आहे .स्टेडीअमजवळ मयुरा आदिलशाही आणि इतर थोडी चांगली हॉटेल्स आहेत .
तीनही मुख्य ठिकाणे दोन एक किमीटरात शहरातच आहेत त्यामुळे रिक्षाने जाता येते ,स्पेशल करू नये .प्रथम गोलघुमट पाहिला .अरुंद दोन फुटी जिन्याने ७ मजले चढल्यावरच प्रतिध्वनीच्या सज्जापर्यँत जाता येते .गुडघ्यांची वाट लागते (पुढील सहा दिवसांत पायांचीही वाट लागणार आहे )पण प्रतिध्वनी ऐकल्यावर आणि वरून शहर पाहिल्यावर फार आनंद होतो .शहरांत असे बरेच घुमट दिसतात .फक्त चुना आणि विटांनी बांधलेला ३८ मिटर्सचा मोठा घुमट जगातला दुसऱ्या स्थानावर आहे .जगातील पर्यटकांना भारतात आणण्यात मुस्लिम इमारतींचा मोठा वाटा आहे .या ठिकाणी दीड तास मोडतो .आता लगेच इब्राहिम रोजा गाठणे .
बिजापूर-२ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रशस्त आवारात बाग बनवून स्वच्छता राखली आहे .इथे भव्यतेपेक्षा कलाकुसरीला अधीक प्राधान्य दिले आहे .आपण जर दोन दिवस विजापूराला राहणार असाल तर जरा सावकाश पाहता येते अथवा सकाळच्या वेळी तरी हॉटेलात यायला हवे .म्हणजे घाई होणार नाही .रोजाची भेट उरकून थोडे अलीकडे शिवाजी सर्कलला तोफ आहे .मलिक ए मैदान तोफ पाहून जवळच्याच उंच उपली बुरुजावर आणखी तोफ आहे .साडे पाचला बंद करतात .तसं बिजापूर रेंगाळण्याच्या आणि जास्ती राहण्याच्या दृष्टिने बरोबर नाही वाटले .हि ठिकाणे पाहण्यासाठी राहायचे .स्टेशनच्या जवळ काही नाही .बस डेपो प्रशस्त आणि स्वच्छ आहे .इथल्या 'नंदिनी'च्या दुकानात धारवाड पेढे चांगले मिळतात .
समजा तुम्हाला बिजापूरला काही कारणाने चार पाच तास मिळत असतील तर बस डेपोत बैगा ठेवण्याची क्लोकरूम आहे .साध्या चेनवाल्याही बैगा ठेवून घेतात .(रेल्वेवाले बिनकुलुपाच्या ठेवत नाहीत) .बैग ठेवून मोकळे फिरू शकतो .शिवाय चांगले टॉइलेटस आहेतच .स्टेट बैंक एटिएम आहेत .
असे अर्ध्या दिवसात बिजापूर आटपले.दुसरे दिवशी बदामिला जाणयासाठी सोलापुर हुबळी गाडीकरता ११४२३ साडेआठला स्टे गाठले .
बिजापूर-३
सहाव्या शतकानंतर चालुक्यासह वेगवेगळ्या हिंदू राजांची येथे सत्ता होती .हम्पिच्या विजयनगर सामराज्याचा पराभव केल्यावर इथे आदिलशाही आली .
विजापुरात आणखी बरीच पाहण्यासारखी ठिकाणे आहेत म्हटतात .परंतु ती मशिदी स्वरुपाची आहेत अथवा मोडकळीस आलेली आहेत असे कळले होते .बिजापुरात आणि एक दिवस वाढवावा लागला असता .गगन महाल ,असर महाल ,जामा आणि मेका मशिद ,आणि बारा कमान .
मलिक -ए -मैदान तोफेजवळ तीन मलबार हॉनबिल तिथल्या झाडावर आले आणि ही ट्रीप छान होणार असे मनाने घेतले .(सकाळी भारद्वाज पक्षी दिसण्याचाही आतापर्यँतचा अनुभव चांगला आहे ).रस्त्याच्या कडेने डिडीटी पाउडर नगरपालिकेने टाकली होती .गांधी चौकचा उल्लेख/उच्चार गाँध चोक असा ऐकला .सिटि बस मात्र नवीन आणि आवाज न करणाऱ्या होत्या .कंडक्टर सौजन्यशील होते .
सविस्तर माहिती प्रतिसादांत दिली आहे .
वाचने
48528
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्पि -८
हम्पि -९
छान वर्णन.
In reply to हम्पि -९ by कंजूस
हम्पि -१०
हम्पि -११
हम्पि -१२
हम्पि -१३
हम्पि -१४
हम्पि -१५
हम्पि -१६
खूप छान आणि तपशीलवार लिहित
In reply to हम्पि -१६ by कंजूस
धन्यवाद वल्ली .कानडी बोलणारा
कानडी बोलणारा कोणी बरोबर
In reply to धन्यवाद वल्ली .कानडी बोलणारा by कंजूस
सह्सा अडेल. बसवरची माहिती
In reply to कानडी बोलणारा कोणी बरोबर by प्रचेतस
ह्म्म.
In reply to सह्सा अडेल. बसवरची माहिती by यशोधरा
फायदा तर होतोच.
In reply to ह्म्म. by प्रचेतस
वल्ली, जमल्यास मी येऊ शकेन.
In reply to कानडी बोलणारा कोणी बरोबर by प्रचेतस
बेष्ट रे.
In reply to वल्ली, जमल्यास मी येऊ शकेन. by बॅटमॅन
ठीक.
In reply to बेष्ट रे. by प्रचेतस
धन्यवाद.
अजून एक सूचना.
वरचे सगळे प्रतिसाद वाचले .बस
हम्पि -१७ ,इतर माहिती .
लखुंडि - १
लखुंडि - २
लखुंडि -३
लखुंडि -४
सहल आयोजन ./समारोप
धन्यवाद काका.
In reply to सहल आयोजन ./समारोप by कंजूस
लखुंडीचे फोटो त्या दुसऱ्या
धन्यवाद.
In reply to लखुंडीचे फोटो त्या दुसऱ्या by कंजूस
सुरसुंदरी नाहीत लखुंडिला .एक
वाचत आहे
गाडी घेउन गेल्यास ....
In reply to वाचत आहे by पैसा
कारने गेल्यास जास्ती वेळ
ओक्के
In reply to कारने गेल्यास जास्ती वेळ by कंजूस
ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास
In reply to ओक्के by पैसा
जमेल की!
In reply to ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास by प्रचेतस
कर्नाटकातल्या आठवणी
दोन्ही ब्लॉग वाचले
इतिहासासाठी मी एक लेखमाला
फारच छान आहे लेखमाला जयंतराव
काका धन्यवाद इतकी सविस्तर
रोड ट्रिप करणार तर आणि
हंपी उत्सव झाला या वर्षीचा
खुपच भारी !! मी हम्पीला…
खुपच भारी !! मी हम्पीला असतांना तुमचा धागा वाचायला सुरुवात केली.पण त्यादरम्यानच मिपा मेंटेनन्ससाठी बंद झाले.
हंपी नकाशा उपयुक्त आहे.माझ्याकडे पण नकाशा होता.पण अच्युतराय मंदिर पाहायला जातांना उजवीकडे वळण्याऐवजी चुकुन डावीकडे गेले.वराह मंदिरापुढे जाता जाता विठ्ठल मंदिर तिथुन ५०० मीटरच उरले असेल.तो भाग मला वेरुळ्च्या जैन मंदिरांकडे जाणार्या मार्गासारखा वाट्ला ,तिकडेही जास्त गर्दी नव्हती.