Skip to main content

भटकंती कर्नाटकातली

लेखक कंजूस यांनी बुधवार, 11/06/2014 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.)) जानेवारी महिन्यात कर्नाटकात थोडी भटकंती केली होती त्याची थोडक्यात माहिती देत आहे . फोटो इथे कलादालनातआहेत. सर्व फोटो नोकिआ X2-00चे काही नकाशे खाली दिले आहेत . प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत बिजापूर नकाशा भटकंतीची ठिकाणे ऐतिहासिक आणि पुरातन (हेरिटिज) स्वरूपाची आहेत .धार्मिकपण नाहीत .सर्वाँना आवडतील अशी थंड हवेची ठिकाणे अथवा समुद्रकिनारे नाहीत . बदामि ,हम्पि आहे .बिजापूर (विजापूर)ही पाहिले गोलघुमटसाठी . केव्हा जावे: मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही . मार्ग: रेल्वे सोयीची आहे .बिजापूर मोठे स्टेशन आहे .सोलापूरपासून दोन तास लागतात .याच मार्गावर पुढे आणखी दोन तासावर बदामि आहे .मुख्य गाव पाच किमी दूर आहे .आणखी दोन तासावर गदग स्टेशन आहे ,येथे अकरा किमीवर लखुंडी आहे .गोव्यातून एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हम्पि आहे . काही उपयुक्त रेल्वे : (१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस . (२)सोलापूर हुबळी एक्सप्रेस ११४२३ रोज (३)हुबळी ते मुंबईसाठी चालुक्य ए ११००६ /११०२२ , शरावती एक्स ११०३६ , शिवाय १७३१७ /०६५११ आहेत . रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो .कोरडी आणि आल्हाददायक हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात .स्वत:चे वाहन नसले आणि राज्य परिवहनाच्या बसने जात असाल तरीही तुमचा प्रवास आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात . हॉटेल्स : (अपेक्षित दिवस) विजापूर (१),बदामि(२) आणि होस्पेट (२)तीनही ठिकाणी सर्व थरातली भरपूर हॉटेल्स आहेत .लखुंडीला काही नाही .जाता जाता करता येते . खाणे :काही प्रश्न नाही . काय पाहाल : बिजापूर -गोलघुमट ,ईब्राहिम रोजा ,उपली बुरूज आणि मोठी 'मलीक ए मेदान' तोफ . बदामि :चार गुंफा ,अगस्ति तलाव ,पंधरा देवळे ,बनशंकरी स्थान आणि तलाव .एक दिवस . ऐहोळे आणि पट्टडकल: (बदामिहूनच जाऊन येणे) पंचवीस देवळे . हम्पि :तुंगभद्रा डैम ,नदी काठची देवळे खासकरून विरुपाक्ष आणि विठ्ठलमंदिर ,दगडी रथ .विजयनगर साम्राज्याचे अवशेष . लखुंडी :अकरा खास देवळे . हुबळी :रेल्वे स्टेशन आणि इमारत . बिजापूर -१(विजापूर): मी इथे दोन वर्षाँत दोनवेळा आलो .सुरुवात बिजापूर पासून करणे सोयीचे पडले कारण मुंबईहून थेट गाडी ५१०२९आहे जी दुपारी एक वाजता पोहोचते .स्टेशनहून बस स्टैंडकडे जातानाच गोलघुमट आहे परंतु प्रथम हॉटेलच्या रुमवर सामान टाकून मोकळे फिरायला बाहेर पडायचे .ललितामहाल बजेट हॉटेल आहे .स्टेडीअमजवळ मयुरा आदिलशाही आणि इतर थोडी चांगली हॉटेल्स आहेत . तीनही मुख्य ठिकाणे दोन एक किमीटरात शहरातच आहेत त्यामुळे रिक्षाने जाता येते ,स्पेशल करू नये .प्रथम गोलघुमट पाहिला .अरुंद दोन फुटी जिन्याने ७ मजले चढल्यावरच प्रतिध्वनीच्या सज्जापर्यँत जाता येते .गुडघ्यांची वाट लागते (पुढील सहा दिवसांत पायांचीही वाट लागणार आहे )पण प्रतिध्वनी ऐकल्यावर आणि वरून शहर पाहिल्यावर फार आनंद होतो .शहरांत असे बरेच घुमट दिसतात .फक्त चुना आणि विटांनी बांधलेला ३८ मिटर्सचा मोठा घुमट जगातला दुसऱ्या स्थानावर आहे .जगातील पर्यटकांना भारतात आणण्यात मुस्लिम इमारतींचा मोठा वाटा आहे .या ठिकाणी दीड तास मोडतो .आता लगेच इब्राहिम रोजा गाठणे . बिजापूर-२ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रशस्त आवारात बाग बनवून स्वच्छता राखली आहे .इथे भव्यतेपेक्षा कलाकुसरीला अधीक प्राधान्य दिले आहे .आपण जर दोन दिवस विजापूराला राहणार असाल तर जरा सावकाश पाहता येते अथवा सकाळच्या वेळी तरी हॉटेलात यायला हवे .म्हणजे घाई होणार नाही .रोजाची भेट उरकून थोडे अलीकडे शिवाजी सर्कलला तोफ आहे .मलिक ए मैदान तोफ पाहून जवळच्याच उंच उपली बुरुजावर आणखी तोफ आहे .साडे पाचला बंद करतात .तसं बिजापूर रेंगाळण्याच्या आणि जास्ती राहण्याच्या दृष्टिने बरोबर नाही वाटले .हि ठिकाणे पाहण्यासाठी राहायचे .स्टेशनच्या जवळ काही नाही .बस डेपो प्रशस्त आणि स्वच्छ आहे .इथल्या 'नंदिनी'च्या दुकानात धारवाड पेढे चांगले मिळतात . समजा तुम्हाला बिजापूरला काही कारणाने चार पाच तास मिळत असतील तर बस डेपोत बैगा ठेवण्याची क्लोकरूम आहे .साध्या चेनवाल्याही बैगा ठेवून घेतात .(रेल्वेवाले बिनकुलुपाच्या ठेवत नाहीत) .बैग ठेवून मोकळे फिरू शकतो .शिवाय चांगले टॉइलेटस आहेतच .स्टेट बैंक एटिएम आहेत . असे अर्ध्या दिवसात बिजापूर आटपले.दुसरे दिवशी बदामिला जाणयासाठी सोलापुर हुबळी गाडीकरता ११४२३ साडेआठला स्टे गाठले . बिजापूर-३ सहाव्या शतकानंतर चालुक्यासह वेगवेगळ्या हिंदू राजांची येथे सत्ता होती .हम्पिच्या विजयनगर सामराज्याचा पराभव केल्यावर इथे आदिलशाही आली . विजापुरात आणखी बरीच पाहण्यासारखी ठिकाणे आहेत म्हटतात .परंतु ती मशिदी स्वरुपाची आहेत अथवा मोडकळीस आलेली आहेत असे कळले होते .बिजापुरात आणि एक दिवस वाढवावा लागला असता .गगन महाल ,असर महाल ,जामा आणि मेका मशिद ,आणि बारा कमान . मलिक -ए -मैदान तोफेजवळ तीन मलबार हॉनबिल तिथल्या झाडावर आले आणि ही ट्रीप छान होणार असे मनाने घेतले .(सकाळी भारद्वाज पक्षी दिसण्याचाही आतापर्यँतचा अनुभव चांगला आहे ).रस्त्याच्या कडेने डिडीटी पाउडर नगरपालिकेने टाकली होती .गांधी चौकचा उल्लेख/उच्चार गाँध चोक असा ऐकला .सिटि बस मात्र नवीन आणि आवाज न करणाऱ्या होत्या .कंडक्टर सौजन्यशील होते . सविस्तर माहिती प्रतिसादांत दिली आहे .

वाचने 48528
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

विजापूर फोटो /अ १)इब्राहिम रौजा, बिजापूर. १ २)इब्राहिम रौजा, बिजापूर २ ३)आतला भाग, गोल गुंबज. ३ ४)मलिक ए मेदान तोफ. ५ ५)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा. ६ ६)इ०रौजा. ७

In reply to by प्रचेतस

बदामि फोटो/अ १)बनशंकरी तलाव. १ २)बनशंकरी रथाची चाके. २ ३)रथ बनशंकरी. ३ ४)अगस्ति तलाव. ४ ५)अगस्ति तलाव. ५ ६)शाळेची मुले, मधल्या सुटीत. ६ ७)बदामिची शाळेची सहल. ७

In reply to by प्रचेतस

ऐहोळे फोटो /अ १)रावणाफडी गुहा. १ २) २ ३) ३ ४) ४ ५)दुर्गमंदिरातील शिल्प. ५ ६)दुर्गमंदिरातील शिल्प. ६ ७)दुर्गमंदिरातील शिल्प. ७

In reply to by प्रचेतस

पट्टडकल फोटो /अ १)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर. १ २)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत. २ ३)लेख. ३ ४)उपदेवता मंदिर. ४ ५)द्वारपट्टीका. ५ ६)जैनमंदिरातील हत्ती. ६ ७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी. ७

In reply to by प्रचेतस

हम्पि फोटो /अ १)विठ्ठल मंदिर परिसर. १ २)रावणाचे शिल्प. २ ३)तुंगभद्रा नदी. ३ ४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार. ४ ५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी. ५ ६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट. ६ ७)कारंजा, होस्पेट. ७

In reply to by प्रचेतस

लखुंडी फोटो /अ १)जैन मंदिर. १ २)जैन मंदिर. २ ३)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया. ३ ४)पद्मावती. ४ ५)लखुंडी दर्शनफेरी. ५ ६)काशिविश्वेश्वरा. ६ ७)कोरीव काम. ७

वल्ली म्हणतो त्या प्रमाणे वर्णन अधिक हवे. पाहिजे असल्यास नविन धागा काढावा. फोटु लय भारी

या ठिकाणांबद्दल उत्सुकता किती आहे त्याप्रमाणे वर्णन वाढवणार आहे ।कसे कुठे जावे ,ट्रीप कशी प्लान करावी ते पण लिहीन .ऐतिहासीक संदर्भ आणि रेखानकाशे पण आहेत .फोटोखाली एकेक ओळ माहिती टाकत आहे .फोटो बघितल्यावर आपण ठरवतो की अमुक एक ठिकाणी जावे का नाही .इकडे परदेशी पर्यटक फार येतात .गोव्याहून सतत बसेस चालू असतात .

In reply to by कंजूस

प्रतिसादसंख्येकडे दुर्लक्ष करून वर्णन अवश्य येऊ द्यात. काही वाचक आवर्जून अशा मालिका वाचत असतात.

ठीक आहे .भटकंती सदराच्या प्रतिक्रियांनाही "संपादन"ची सोय असती तर बरं झालं असतं .छोटे छोटे लिहिलेले भाग नंतर एकत्र जोडता येतात . इकडे येणारे बरेचसे भारतीय पर्यटक(=भाविक) बनशंकरी ,आणि विरुपाक्ष देवळासाठी येतात आणि बाकीचा भाग उरकतात .इतर देवळांत मूर्ती नाहीत अथवा असल्या तरी पूजेत नाहीत ,सकाळी सहा ते संधयाकाळी सहापर्यंत उघडी असतात .

काय हो कंजूस मामा लिखाणात सुंद्धा कंजूसपणा ? ;) जरा डिटेलमंदी लिवा की... फोटु पण हवेच हवे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

अर्र लखुंडी यकदम खास आहे का ? आमचे बघायचे राहिले. बाकी हा भाग मस्त आहे. नारळाची झाडे व लोहयुक्त ताबडी माती , काळी देवळे, कातळ,धोंडे, तुंगभद्रा, घरगुती खानावळी सारेच संस्मरणीय. नव्हेंबर मधे गेल्यास उन कमी असेल. आमचा बेल्लारीचा किल्ला ही राहिला. पण आयहोळ , पत्तडकल व बदामी लाजवाबच ! कर्नाटक आपले लाडके राज्य हाय !

लखुंडी एकदमच खास आहे .सर्वात कठीण अशा काळ्या दगडात सुरेख मुर्ती आहेत .जी गोष्ट भव्यतेत नाही ती इकडे कलाकुसर आणि कलात्मकता आणि धार्मिक सामंजस्यात सामावली आहे .दोन जैन देवळांत हिंदू मूर्ती आहेत .सूर्यनारायणाची चार फुटी मूर्ती इतकी अखंड आणि आकर्षक आहे की चोरी होईल की काय या धास्तीने देवळातून काढून म्युझिअममध्ये ठेवली आहे .आता १९५० नंतर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले परंतु एक हजार वर्षे या गाववाल्यांनीच संभाळले .अजून बरेच आहे .

हैदराबाद मधल्या भटकनती बद्दल कोणी सांगेल का ? कोणती ठिकाणं आवर्जून आणि फार कष्ट न घेता बघणेबल आहेत? कोणी माहिती देवू शकेल का

In reply to by म्हैस

मी हैद्राबाद च्या काचीगुडा स्टेशनवरून रात्री सुटणार्‍या काचीगुडा- गोवा एक्सप्रेसने होस्पेटला उतरलो होतो.त्याअगोदर हैद्राबाद मनसोक्त पाहिले. हुसेनसागर तलावाकाठचे लुंबिनी पार्क, तेथील लेझर शो, पडका पण भव्य- किल्ला, सालारजंग म्युसीयम, बायॉलॉजेकल पार्क , टेकडीवरचे बिर्ला मंदीर असे एकसो एक ठिकाणे हैद्राबादेत आहेत.खेरीज एका दिवसात करता येणारे रामोजी फिल्म सिटी व नागार्जुन सागर धरण लय भारी.

In reply to by चौकटराजा

हैद्राबाद लय भारी ठिकाण आहे. सालारजंग मध्ये इतर काहीच पाहिले नाही तरी चालेल पण व्हेल्ड रिबेका मात्र पाहावी. पॅराडाइझ पण आहेच पण बावर्चीची मजा काही औरच.

In reply to by सूड

ललितलेखन वगैरे जमणे कठीण आहे .काही फोटो आणि त्रोटक लिखाणातून लोकांची या ठिकाणाबद्दल उत्सुकता चाळवली गेली तरी खूप झाले .आता वल्ली ,चौकटराजा लिहितील तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल .

फोटो आवडले. विस्तृत वर्णन वाचायला आवडेल.

आणखी वर्णन लिहित आहे .बिजापूरचे पाहा .विकिपिडिआतून जी विजयनगरची ऐतिहासिक माहिती आहे ती पुन्हा इकडे देत नाही . सर्वांना धन्यवाद .

लखुंदीबद्दल विस्ताराने माहिती हवी आहे. अजून डिटेल लिहा. प्रतिक्रिया म्हणून लिहा किंवा नवा धागा काढा. पण ट्रिप कशी प्लॅन करावी याबद्दल सविस्तर माहिती लिहाच! फोटो अजून पाहिले नाहीत. आता सावकाश बघेन.

ट्रीप प्लान करून जसे पाहात गेलो तसे लिहिणार आहे .कोणत्या ठिकाणी स्थळदर्शनास किती वेळ लागतो आणि प्रवासाला लागणारा वेळ तसेच कोणती सोयिस्कर रेल्वे मिळते हे कळले की इतरांना त्याचा पूर्ण उपयोग करता येईल .लखुंडी दर्शनाबद्दल फोटो नकाशासह येईलच .६ ते १२जानेवारी २०१४ आम्हाला तिघांसाठी संपूर्ण सहलीचा रे तिकीट ,बस प्रवास .राहणे ,खाणे धरून रुपये दहा हजार खर्च आला .सर्व सावकाश पाहिले .

बदामि-१ बिजापूरहून बागलकोटला बस जातात व तिथून बदामिची बस मिळते .परंतु मी रेलवेचे तिकीट रेज० काढलेले होते .रिजवच्या दोन डब्यात दहाजणच होते परंतू टिटिई कोणाला येऊ देत नाही .वाटेत लागणारे अलमट्टी धरण पाहणे हे खास आकर्षण असते .गाडी हळू जाते आणि वळसे घेते .साडेअकराला अर्धा तास उशिरा बदामि स्टे आले . बाहेर पडून शेर रिक्षा मिळतात .दहा रु/प्र .बदामि गाव पाच किमी आहे .कधी बसपण मिळते .हॉटेलचे नाव आनंद वगैरे सांगून डेपो गाठणे .डेपोजवळच बरीच बजेट हॉटेल्स आहेत आणि रिक्षावाला उगाचच फिरवेल.वाटेत बदाम कोर्ट दिसते .कर्नाटक टुअरिजमचे गावात लेण्यांपुढे आहे . एक वाजेपर्यँत आपले सामान रुमवर पडून आणि जवळच्याच रेस्टरॉमध्ये जेवण करून फिरायला तयार झालेलो असतो .हातात पर्स अथवा झोळणा घेऊ नका .पाठीवरच्या सैकमध्ये पाण्याच्या बॉटल्स ,खाण्याचे तयार पदार्थ आणि छत्री ठेवा .इकडे माकडे बदमाश आहेत .सैक ओढत नाहीत आणि छत्रीला फार घाबरतात .म्युझिअमच्या वरती शिवालय पाहतांना छत्री उपयोगी येते .इकडच्या गाईडसनाही माकडे ओचकारतात .छत्रीपासून माकडे चार हात दूर राहतात हा माझा सह्याद्री ट्रेकिंगचा अनुभव आहे .

बदामि-२ लेणी आणि अगस्ति तलाव बस डेपोपासून एक किमीवर आहे त्यामुळे स्पेशल रिक्षा करायची गरज नाही .शिवाय ते लेण्यांकडे नेतात आणि वेटिंग चार्ज घेतात .म्युझीअमकडे नेत नाहीत .म्यु०च्या वर आणि पुढे बरेच पाहणयासारखे आहे . पंधरा मिनिटे चालल्यावर म्यु०ला आलो .बाजूलाच अगस्ति तलाव आहे .रम्य जागा .समोरच्या डोंगरात लेणी आहेत . म्यु०च्या वरच्या डोंगरावर जाण्यास डावीकडून छान वाट आहे .पूर्वी इथे किल्ला होता .वर दोन शिवालये पाहून मशिदीच्या मागून मारूती मंदिराच्या दुसऱ्या वाटेने खाली आलो .येथे माकडे अंगावर येतात .खाली आल्यावर तलावाच्या मागच्या काठावर भूतनाथ मंदिरे आणि एक वेगळीच जैन गुंफा आहे त्याचे दार दोन फुटी आहे .बदामिला येऊन शंभरातले दोनच जण इकडे येतात .हा भाग अवश्य पाहा . गुंफा पाहाण्यासाठी मागे येऊन रस्त्याने अथवा पायऱ्यांवरून यल्लमाच्या देवळाजवळून जावे लागते .जवळच्या शाळेची मधली सुट्टी झाली त्या मुलांचाही फोटो घेतला .तिकीट काढून वर गेलो .बस रिक्षा पार्क केलेल्या असतात .

बदामि-३ . इथे खूप गर्दी असते .गाईड लोक या गुंफा दाखवून कटवतात .शाळेच्या खूप सहली आलेल्या पण दोन दोनच्या जोड्या करून रांगेने चारही गुंफा पंधरा मिनिटांत उरकतात . मास्तर शिटी वाजवतात नी शिक्षिका छडी हलवून लवकर चला करतात .ते तरी काय करणार सहाव्या शतकातील चालुक्यांची शिल्पकला कळणे विद्यार्थ्याँच्या कुवतीबाहेर आहे .असो . याच त्या चार गुंफा ज्यासाठी परदेशांतून हजारो पर्यटक येथे येतात .बऱ्याच जणांच्या हातात 'लोनलि प्लानेट'चे पुस्तक असते .याची जी '९६ अथवा '९८ ची जुनी आवृत्ती आहे त्यात खूप विस्तृत माहिती आहे .चारांपैकी तीन गुंफा हिंदू आहेत .शंकर आणि विष्णूअवतारांची सुरेख व अखंड साडेसहाफुटी मोठी शिल्पे आहेत .त्रिविक्रम ,वराह आणि नरसिंह अवताराचा प्रभाव त्याकाळी होता असे दिसते.शंकर सोळा हातांचा आहे .चौथी गुंफा आदिनाथाची आहे . या चालुक्यांचे शत्रु दुसरे हिंदू राजे(पल्लव) होते आणि नंतर सोळाव्या शतकांतही मुसलमान सुलतानांनी देवळांची नासधूस नाही केली .शिल्पांचे सविस्तर वर्णन आणि चालुक्यांचा इतिहास न सांगता पुढे चलुया .

बदामि-४ येथून दहा मिनिटांत मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा साडेचार वाजले होते .नाक्यावर बनशंकरी'कडे जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात .त्याने पाच किमीवरच्या बनशंकरीला आलो .इथल्या आठव्या शतकातल्या शाकंबरी देवीच्या देवळाचा उत्सव आज सुरू होणार होता .पौष शुक्ल अष्टमी (आज)ते पौर्णिमा .एकादशीनंतर जत्रा सुरू होते .थोड्या वेळाने चौघडा ,वाजंत्री वाजली आणि पालखीतून देवीची पितळी उत्सवमूर्ति आली .नऊवारी पातळांतल्या स्त्रियांनी आरती केली आणि पालखी देवळात गेली .आतमध्ये गाभाऱ्यात अडीचफुटी आठ हातांची मूर्ती आहे .देवळासमोर जो प्रचंड तलाव आहे तो बांधीव दगडी आहे .सभोवालती प्रदक्षिणा मार्ग आहे .नारळी आहेत .एकंदर या देवस्थानाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्व कायम आहे .इकडे टोपलीतून भाकऱ्या आणि दही घेऊन "ऊटा ?"(=जेवण) विकणाऱ्या बायका भाविकांना विचारत होत्या .एका दुकानात एका काळा चिक्की सारखा पदार्थ होता .याला करदान म्हटतात .गूळ आणि सुक्यामेव्याची मऊ चिक्की (फज ?)होती .जवळच्या पटांगणात जत्रेसाठी राहुट्या उभारण्याचे काम जोरात चालू होते .हल्ली जत्रा आठ दिवस चालत नाही पूर्वी फार मोठी असायची .

बदामि-५ अचानक एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष गेले .उत्सवाचा लाकडी रथ !२०१२ मध्ये नोव्हेँबरात आलो त्यावेळी मला दिसला नव्हता .सातफुटी दगडी चाके पाहा याची .कानडी येत असती तर विचारता आले असते .जत्रेनंतर हा रथ झाकून ठेवतात . रीक्षाने हॉटेलवर परतलो तेव्हा सहा वाजले होते .चहा नाश्ता केला .परदेशी पर्यटकांना डोसा आणि हॉट करी (=सांबार) आवडीने खातांना पाहिले .चहा ऐवजी कॉफी अथवा थंड पसंत करतात .बरेचसे बदाम कोर्ट अथवा केटीडीसीत उतरतात .आमच्या रुमशेजारी जपानी /कोरिअन असावेत . आज तसे बरेच फिरलो आणि दमलो .म्युझिअममध्ये मोठा एअरिअल नकाशा आहे .त्यातले फक्त मलगट्टी शिवालया नाही पाहिले .पोलीस स्टेशनकडून बाजारातून रस्ता आहे .आपण अगस्ति तलावाकडून गावात येतो तेव्हा सहाव्या शतकातून दहा मिनिटांत एकविसाव्या शतकात येतो .मजा अशी की बदामिऐवजी चौदाव्या शतकातले हम्पि जागतिक वारसा (वल्ड हेरटिज साइट)यादीत आहे ! आता उद्या या बदामितच मुकाम आहे पण ऐहोळे(ऐवळी) ,पट्टडकल (पट्टडकलु) ची पंचवीसेक मंदिरे पाहून यायची आहेत .सकाळी पावणे आठला एकच बस ऐहोळेला (२५)जाते .याच वाटेवरच्या पट्टडकल येथे (१३किमी) दर अर्ध्या तासाने आहे .

बदामि-६(ऐहोळे -१) सकाळी लवकर उठून नाश्ता करून बस डेपोत साडेसातला हजर झालो .इकडे थोडा आतला भाग असल्यामुळे बसच्यावर पाट्या कानडीत असतात .मी त्या वाचण्यासाठी मोठ्या शहरांची नावे कानडीत लिहुन आणली होती .(पाणिनि किपैड डॉट कॉम च्या वेबसाईटवर हे करता येते) .बस वेळेवर निघाली आणि पावणे नऊ वाजता ऐहोळे गावात थांबली .वाटेत पट्टडकल लागले पण ते येताना करायचे आहे .[इथून पंधराएक किमीवर विजापूर-हॉस्पेट हायवेवरचे "इल्कल" हे शहर आहे .स्वत:चे वाहन असल्यास बदामि नंतर पटट० आणि ऐ०पाहून तसेच पुढे पाचपर्यँत हॉस्पेट गाठता येईल .] बस नाक्यापाशीच दुर्गदेवी मंदिर आणि म्युझीअमचे आवार आहे .तिकीट काढून आत गेले की आवारातली मंदिरे पाहता येतात .पाऊणेक तास लागतो .बाकीच्यांना तिकीट नाही एका फलकावर ऐहोळे गावातील मंदिरांची नावे लिहिली आहेत .बरेच जण दुर्गदेवी पाहून परत जातात .इतर मंदिरे न पाहणे अन्याय केलयासारखे होईल .पुढची परतीची बस दीड वाजता आहे तोपर्यँत आम्ही सर्व महत्त्वाची मंदिरे सावकाश पायी फिरून पाहिली .नाक्यावर इडली वडा चहाचे एकच हॉटेल आहे .तसेच पेरू ,शेंगा आणि रस मिळतो .

बदामि-७(ऐहोळे २) इथे येताना मला एक गोष्ट माहित होती ती म्हणजे हे एक साधे गाव आहे परंतू असंख्य परदेशी पर्यटक येतात .शाळेत जाणारी पहिली दुसरीतली मुले 'स्कूल पेन ?'मागतात .त्यामुळे पंचवीसेक पेनस बरोबर आणली होती .खूप आनँद होतो त्यांना .पण भिकारी कर्नाटकात सापडत नाहीत .काल बनशंकरीला काही तृतियपंथी देवळाबाहेर दूर बसलेले होते पालखी आली त्यावेळी पण त्रास नाही .मान असावा त्यांचा त्यादिवशी . आता देवळाकडे वळू .सहाव्या शतकापर्यँत कोरीव गुंफा-मंदिरे होती .गुप्त काळाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव मंदिरांचे प्रयोग उत्त र भारतात सुरू झाले .इकडे दक्षिणेत हेच काम पल्लव आणि चालूक्यांनी हाती घेतले . हे चालूक्य राजे अगोदरच्या कदंब राजांकडे सरदार होते .नंतर ते स्वत:च राज्य करू लागले .यांची राजधानी याच तीन ठिकाणी होती .इथेच त्यांनी देवळे बांधण्या चे निरनिराळे नमुने करून पाहिले .देवळाचे जोते ,मंडप ,खांब आणि छत ,प्रदक्षिणा मार्ग ,गर्भगृह ,शिखर आणि कळस याबाबतीत प्रत्येक देऊळ निराळे आहे .दक्षिणेतल्या कोणत्याही देवळाचा आराखडा येथूनच उचलला आहे .

बदामि-८(ऐहोळे ३) तांबड्या रंगाचा वालुकाष्म दगड वापरला आहे .कोरायला मऊ असतो पण तकतकीत करता येत नाही .शिवाय बाहेरची शिल्पे पावसाने झिजली आहेत . शंकर आणि विष्णू मुख्य हिंदू देवता आहेत .तरीही जैनधर्मियांची पूर्ण देवळे हेच दाखवते की तेही राजघराण्यांत महत्त्व राखून होते . दुर्गदेवी आवारातून बाहेर पडून आणखी दीड तासाची फेरी मारली तर सर्व मुख्य मंदिरे पाहून झाली .याच वाटेवर असलेली रावणफडी गुंफा खासच आहे .शेवटी नाक्यावर येऊन बसची वाट पाहत थांबलो . पटटडकल: दोन वाजता पोहोचलो .इथे नदीकाठी एकाच आवारात सर्व मंदिरे पटावर सोंगट्या मांडल्यासारखी आहेत .पाट्या फलकांवर माहिती लिहिली आहे .खास उल्लेख करण्यासारखे विरुपाक्ष आणि त्याच्या भल्यामोठ्या काळ्या नंदीचे अशी दोन आहेत .मूर्ती ठसठशित आणि आकर्षक आहेत .आत रामायणातील चित्रे आहेत . आवाराबाहेर येऊन चहा भजी ,नारळपाणी घेतले .इथून एक किमीवरच्या जैन मांदिरातले दोन मोठे हत्ती खास आहेत . आता या भागातले फक्त महाकुटा बघायचे राहिले परंतू त्या रस्त्याने बस जात नाहीत .एका ठिकाणी वाटेत उतरून दोन किमी जाऊन यायला हवे .नाही गेलो .रूमवर परत आणि आराम केला

मस्त माहीती.... धन्यवाद...

या X2 -00 प्रिँटसही 4X6 अथवा 5X7सुरेख येतात .ऑटो फोकस नसल्यामुळे शटर लैग नाही आणि रेल्वेतूनही फोटो काढता येतात .

रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो

सगळे प्रतिसाद वाचत आहे. तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद!

फोटो वाढवले आहेत .अजून हम्पि आणि लखुंडी बाकी आहे ।शिल्पे इतकी अगणित आहेत की तपशिलवार लिहिणे आणि पाहणे अशक्य आहे .या राज्याला पर्यटकांची सवय आहे आणि त्यांचा पैसा सोयी वाढवण्यासाठीच खर्च करतात .

विसरलो नाही .ही दोन ठिकाणे बंगळुरु -महैसूर -हसन असे तीन ठिकाणी राहून सहज होतात .आणि कारवार ते मंगलोर अशी तिसरी सहल करणे योग्य ठरते .

बरोबर .म्हैसूरला असतांना सोमनाथपूर करता येईल .बारा वर्षाँपूर्वी बं०-म्है०-उटी ला गेलो होतो पण माहिती अभावी ही तीन मंदिरे पाहिली नव्हती.

हम्पि -१ बदामिला दोन दिवस राहून फिरलो तेव्हाच कळले की उद्यापासून तीन दिवसांचा हम्पि उत्सव सुरू होत आहे .थोडी धाकधूक वाढली ,होस्पेटला हॉटेल मिळेल का ? गर्दी असेल का ?बदामिला येतांनाही हीच शंका होती कारण बनशंकरीची जत्रा .परंतू एक फायदा झाला .तो रथ पाहता आला .बस डेपोत चौकशी केली होस्पेट बस कधी आहे .सात वाजता होती .नंतर इल्कल'च्या असतात त्याही उपयोगी असतात असे कळले . काल ऐहोळेला दुर्ग मंदिराजवळ एक कोल्हापूरची शाळेची सहल(बस) आलेली दिसली .गुरुजींना विचारले "मुलांची राहण्याची व्यवस्था कुठे केलीत ?" . "कोल्हापुरहून विजापूरमार्गे कुडलसंगमा'ला आलो आणि राहिलो . सकाळी हुनगुंड मार्गे इथे ऐहोळेला आलो ." परतीचा मार्ग कळला नाही .पन्नासेक पाचवी सहावीच्या मुलांना घेऊन जायचे एक मोठी जबाबदारीच असेल . १० जानेवारी ,शुक्रवार (२०१४) . आज बदामिहून होस्पेटला जाण्यास सवासहालाच हॉटेल सोडले .साडेसहाला चहा घेतला पण भूक नव्हती त्यामुळे इडली वड्यांचे पार्सलच घेतले .बस स्टैंडला बदामि ते बंगळुरू होस्पेटमार्गे बस आमचीच वाट पाहत होती .उदबत्ती लावल्यावर सहा जणांना घेऊन सवासातला बस सुटली .आम्ही तिकीटाची भोणी केली .

हम्पि -२ सकाळी प्रवास छान वेटत होता .जानेवारी महिना असूनही फारशी थंडी नव्हती .इकडे रस्त्याला वाहने कमी दिसली .मोठ्या हायवेला हुनगुंड येण्याच्या अगोदर शेतात पाच मोर पाहिले .चला सुरुवात चांगली झाली .पुढे तीनपदरी हायवेवरून प्रवास सुरू झाला .इल्कल या ठिकाणी थांबून सवाअकराला होस्पेट आले .सहा किमी अगोदर तुंगभद्रा धरण आणि वसाहत येते .एकशेसत्तर किमीचा प्रवास अजिबात जाणवला नाही . होस्पेटचा डेपो नवीन केला आहे .अप्रतिम .इकडे वेळ न घालवता स्टेशनरोडकडे बैगा घेऊन निघालो .आजुबाजूला खूप हॉटेल्स आहेत .मागच्या वेळेस रोटरी हॉल आणि गार्डनच्या समोरच्या SLV यात्री निवास येथे उतरलो होतो .मालक सुरेश प्रभू यांच्याशी ओळखही झाली होती .इकडे मंगलोरी लोकांची बरीच हॉटेल्स आहेत .रूम मिळाली समोरच्या झाडावर बरेच कोकिळ होते . हंम्पि उत्सवाबद्दल कळले .दोन वर्षे झाला नव्हता .आपल्याकडे एलिफंटा अथवा वेरुळ चा असतो तसाच आहे .जत्रा लागते .नाचगाण्यांचे कार्यक्रम होणार .त्यात मोठे कलाकार कला सादर करणार .संध्याकाळी गर्दी होणार .आम्हाला काही फरक पडणार नव्हता .

हम्पि -३ तयार होऊन ,उदरभरणं करून दोन वाजता बस डेपोत हजर झालो .इथून हम्पि ११/१६ किमी आहे आणि चकाचक बसेस दर दहा मिनिटांनी सुटत होत्या .आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस हाताशी होता . हम्पितील ठिकाणं पाहण्यासाठी फार तंगडतोड करावी लागते .जेवढे तुम्ही पायी फिराल तेवढं चांगलं .काही परदेशी नागरिक हेच करतात .विठ्ठल मंदिर ,कमल महाल आणि म्युझिअम या तीन ठिकाणचे एकच तिकीट आहे आणि ते त्याच दिवशी वापरावे लागते .इतर ठिकाणांना तिकीट नाही .आज शुक्रवार म्युझिअम बंद असते .असे पण हे पाहणारच नव्हतो . बसमध्ये बसलो .आज जेवढे जमेल तेवढे पाहण्याचे ठरले .(नकाशा पाहा ) .कमलापूरचे तिकीट मागितले .पण तीन दिवस एकदिशा केला होता .कृष्ण मंदिराला आलो .या ठिकाणी समोरच्या पटांगणात जत्रा लाखत होती .मागच्या बाजूस स्टेज आणि खुर्च्या लावत होते .पोलीस खुप होते परंतू मदतीला होते ,खिसे चाचपडायला नव्हते .बसमधून हौशी लोकं सारखे येत होते .एकंदर आनंदाचे वातावरण दिसले .भाषेची अडचण त्यामुळे माहितीफलक वाचता आले नाहीत आणि विचारता आले नाही .हेलीकॉप्टर राईड होती एवढं मात्र कळलं .

हम्पि -४ थोडं गोंधळल्यासारखं झालं पण नंतर लगेच सासिदुकालू आणि कलेदूकालू या दोन महागणपतीँपासून हम्पिदर्शनाचा श्रीगणेशा केला .इथून पुढे पाच मिनिटांवरच्या विरुपाक्षाकडे न जाता मागे येत कृष्ण मंदिर पाहून ,प्रवेशद्वारातून लक्ष्मीनरसिंहापुढे उभे ठाकलो .येथून बसने सरळ कमलापूर गाठले . चार वाजले होते .चहा कोलड्रीँक घेऊन ताजेतवाने झालो .इथे मोठा पोलीस ताफा होता आणि पुढे जवळच हेलिपैड होते .परंतू तिकडे गेलो नाही .पट्टाभिरामा मंदिराची वाट धरली .चालत म्युझिअमच्या पुढे वीस मिनिटांवर कनाल ओलांडल्यावर हे एक प्रशस्त आवारात देऊळ आहे .शांत भाग आणि एखाददुसऱ्या परदेशी पर्यटकाशिवाय कोणी फिरकत नाही .एक नृत्यमंडप आहे .भरपूर खांब आणि त्यांवरची शिल्पे हे हम्पिच्या देवळांचे वैशिषट्य आहे .इकडे अर्धा तास थांबून कमलापूरला स्टॉपला आलो .बस पकडून सहाला हॉटेलवर परतलो . एकेका ठिकाणासाठी ऑटोवाले यायला तयार नसतात .एक पैकेज गळ्यात मारायला बघतात .हॉस्पेटच्या चांगल्या आणि स्वस्त बसेसची सोय नसती तर ऑटोवाल्यांनी पर्यटकांची किती धुलाई केली असती ते सांगता येत नाही .

हम्पि -५ संध्याकाळी रेल्वे स्टेशनकडे फेरफटका मारला .इकडे काही तीनस्टार मोठी हॉटेल्स दिसली .एक कनाल ओलांडावा लागतो .एक हायवे बनलेला दिसला तो थेट विजापूर -हंम्पि-बंगळुरू जातो . पर्यटनामुळे राज्याचे चित्र पारच पालटले आहे .परत आलो तर समोरच्या बागेत कारंजे सुरू झाले होते . आजचा अर्धा दिवस प्रवास आणि भटकणे झाल्यामुळे रात्री छान झोप लागली . दुसरे दिवशी शनिवारी उरलेली ठिकाणं पाहायची होती .आणि ही सगळी महत्त्वाची होती .सकाळी टिव्ही लावून कालच्या कार्यक्रमाच्या बातम्या पाहिल्या .बऱ्याच जागा रिकाम्या होत्या फारसे प्रेक्षक थंडीत कुडकुडत उघण्यावर गाणे ऐकायला आले नव्हते . सकाळी साडेसातलाच हम्पिबाजार गाठला . विरुपाक्ष देवळापासून समोरच्या मातंगमदिरातल्या नंदीपर्यँत रुंद रस्त्याने दोन्ही बाजूला दगडी खांबांची दुकाने आहेत .ती नँतर सुलतानांनी लढाईत बरीच पाडून टाकली . त्यांनी देवळे मात्र पाडली नाहीत .विरुपाक्षाचे ५०मी उंच गोपूर लक्षवेधक आहे . या ठिकाणी ऑटोवाले विचारायला येतात .पण फार मागे लागत नाहीत .कोणत्या ठीकाणी काय पाहण्यासारखे आहे ते माहिती असेल तरच ऑटो ठरवून फायदा आहे .

मस्त. हंपीचे मूर्तीशास्त्र जरा सविस्तर आले तर अधिक छान होईल. एकंदरीत तिथे शैव मतापेक्षा वैष्णवांचा प्रादुर्भाव बराच जास्त दिसतोय. उदा: लक्ष्मी नरसिंह मंदिर, विरूपाक्ष, विजय विठ्ठल मंदिर, खुद्द राज्याचे राजचिह्न असलेले वराह.

हंपी मधली मंदिरे ,तेथिल शिल्प यावरही वाचायला आवडेल. या डिसेंबरमध्ये जाण्याचा विचार आहे. तिथुन जवळचा विमानतळ कोणता?

वल्ली ,बरोबर आहे . विजयनगराचे स्थापक हरिहर यांचे स्वामि मध्वाचार्य .यांनी प्रथम इथे तुंगभद्रेच्या उत्तर किनाऱ्यावर अनेगुंडी डोंगरावर किल्ला बांधायला सांगितला असे म्हटतात .तो सुलतानानी उध्वस्त केल्यावर दक्षिण तिरावर दुसरे विजयनगर बांधण्यात आले .विरुपाक्ष आणि गणपती तसेच हेमकुटा हे सर्व शैव स्थापत्य यांच्या अगोदरच्या हिंदू राजांचे आहे . मध्वाचार्य राम कृष्ण भक्ती मार्गातले असावेत .त्यामुळे राजांची नावेही कृष्णदेवराय ,रामदेवराय आहेत .देवळेही विष्णू अवताराचीच त्यांनी बांधली .राम कृष्ण अवताराचा इतिहास माहिती असणाऱ्याला येथील शिल्पांचे कथानक लगेच समजते .गाईड लोक एक दोन गोष्टी परदेशी पर्यटकांना समजावतांना दिसतात .फ्रेंच ,रशिअन ,जर्मन मध्ये चालू असते .दशरथाच्या राण्यांना पुत्र होण्यासाठी खिरीचा प्रसाद ,सीता आपली अंगठी मारुतीला देत आहे ,बाळकृष्ण पळू नये म्हणून पायाला दोरी बांधून उखळाला बांधली आहे .असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत .अवर्णनीय आहेत .घोंगडीवाला इथेच आहे .पट्टाभिराम ,हजाररामा आणि कृष्णमंदिर खासच . (घाई करणाऱ्यांबरोबर जाऊ नका ) . नकाशे कसे वाटले ?

नीटपणे फिरण्यासाठी नकाशे उपयुक्त आहेत. हंपीत त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता कमी राहील. हंपीला शिल्प कलेबरोबरच नुसते धोडे देखील देखणे आहेत. त्याचे ही सौंदर्य काही वेगळेच. या दगड धोंड्यातून काही शिल्पे आपल्या कल्पनेनुसार दृगोचर होतात.मला डिसेंबर मधे वल्ली ईई सोबत जायला जमेल की नाही माहीत नाही पण येथे पुन्हा जाणार हे नक्की !

अजया ,हम्पिपासून ६० साठ किमी पूर्वेला बेल्लारी(येडीयुरप्पांचे) एरपॉट आहे .बंगळुरूरून हम्पि एक्सप्रेस सकाळी येते /जाते .होस्पेटहून सकाळची एक्सप्रेस दुपारी दोनला मडगावला (दूधसागर धबधबा मार्गे) पोहोचते . यावर्षी बहुधा २-३-४ जानेवारी २०१५ हम्पि उत्सव असेल .यावेळी गर्दी फार असते .मंदिरांचे वर्णन देईनच .लहान मुलांना बोरिंग आहे .न चालणाऱ्यांनी जाऊ नये . (मुलांसाठी हैदराबाद उत्तम) २९ डिसेंबर २०१४ पौष शु अष्टमी बनशंकरी जत्रा सुरुवात (रथ पाहा )आणि पौर्णिमा ५ जाने २०१५ शेवटचा दिवस .

आता हिलस्टेशनांच्या हिरवळीपेक्षा रस्त्याकडचे धोंडे मलाही खुणवू लागले आहेत चौकटराजा. तुंगभद्रेच्या रक्षक धोंड्यांचे सौंदर्य साठवायला निकॉर /कैनन २८ एम एम पाहीजे HDR नको .

कंजूससाहेब, वर्णन आवडले. एक शंका म्ह. हरिहर आणि बुक्कराय यांचे गुरु मध्वाचार्य नसून विद्यारण्यस्वामी असावेत असे वाटते.

In reply to by कंजूस

माधवाचार्य असेल मग ते नाव. कारण मध्वाचार्य म्ह. द्वैतमतवादी वैष्णव संप्रदायवाले तर हे विद्यारण्य म्ह. शृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य होते. एकवेळ काश्मीर प्रश्न सुटेल पण या दोहोंत अद्वैत होणे इंपॉसिबल ;)

धन्यवाद वल्ली .या GPS च्या काळात रेखानकाशे उपयुक्त वाटतात हे ऐकून बरे वाटले .दुरुस्ती /सूचना येऊ द्या . तुमच्या बरोबर जायला मलाही आवडेल .दोनवेळा गेलो .नोव्हेंबर २०१२ ला गेलो(एकटा) होतो त्यावेळी विनाचिंता हम्पि नऊ तास फिरलो होतो तरी वीस टक्के राहिलेच .अनेगुंडी परीसर .माहितीसाठी लोनली प्लानेट पुस्तकाला (जुनी आवृत्ती) पर्याय नाही .

हम्पि -६ दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही .(पाणी आणि वरचे खाणे जवळ ठेवा ).मग हे ऑटोवाले कसे विठ्ठल मंदिरला जातात ?तर ते कमलापूरकडून तिकडे येतात .(नकाशा पाहा ).मधल्या ठीकाणांना दांडी . कोणत्याही पर्यटन स्थळी हीच तऱ्हा असते .पर्यटक गाडी वेटिंग ठेवून एक तास काढतील अशी ठिकाणे "तिकडे काही नाही "सांगून जात नाहीत .तास दोन तासात पाचशे रुपये मिळवायचे हा धंदा असतो .शिवाय एखाद्या दुकानातले कमिशन पदरात पडले तर उत्तमच .इथे भाडे आणि ठिकाणावरून ऑटोवाल्याशी 'बार्गेन 'करत बसू नका .असो . एरवी हम्पि बजार बस स्टैंड आणि पार्किँगपाशी बरीच चहा वड्याची दुकाने असतात .आज सर्वांना हटवले होते .वेळ न घालवता विरूपाक्ष मंदिराचे भव्य उंच गोपूर पाहत तिकडे निघालो .वाटेत एक भलेमोठे पत्र्याचे धूड दिसेल त्याच्या आत देवळाचा रथ आहे .दिसू नये याची पूर्ण काळजी घेतली आहे .महाशिवरात्रीला या रथासाठी यावे लागेल .पुजा होत असलेले हे एकमेव देऊळ आहे .हजार वर्षाँचे आहे .कृष्णदेवरायाने याची डागडुजी केली म्हटतात .

In reply to by कंजूस

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही काही समस्या नाही. हे अंतर मी सहकुटंब पायी गेलो आहे. जाणे अगदी रंजक .जाताना राजाचे वजन तागडे ही लागते. खेरीज तुंगभद्रेत गोल होडीतून भटकता येते. विष्णु मंदिरात संगीत खांब मात्र लोकानी हाताळून निमुळते केले आहेत.

हम्पि -७ गोपूरातून आत गेल्यावर उजवीकडे हत्ती असतो .पण नदीवर गेला असेल .नदी मागे उजवीकडेच आहे आणि घाटही आहे .देव दर्शना नंतर नदीवर जाऊन आलो . साडेसात झालेले .यावेळी नदीकाठाने दोन किमी चालायला त्रास होत नाही . हम्पि बाजारातून रुंद रस्त्याने जाताना गतवैभवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही .लहान विक्रेत्यांसह हत्तीच्या अंबारीत बसून थेट खरेदी करणाऱ्यांसाठी दगडी गाळे आहेत .पुढे नंदी पाहून मागे आलो .(तशी या मातंग टेकडीवरून पलीकडे अच्युतरायाकडे वाट आहे ) . डावीकडून नदीकाठाने जाताना नदीतल्या कारकल नावाच्या गोल होड्या दिसतात .एक अलीकडे बांधलेले मंदिर दिसते . मातंग मंदिराच्या भोवती वळसा घालून गेल्यावर पाटी दिसेल .पुढे विठ्ठल मंदिराकडे ,तर पुष्करणी ,अच्युतराय उजवीकडे .या दोन ठिकाणी जाऊन पाहून परत यायला अर्धा तास लागेल . पुष्करणी बांधता बांधता अर्धवट सोडल्यासारखी वाटते .अलीकडे खांबांवर महाल योजला असावा .तलाव छान आहे मागे मातंग डोंगर .डावीकडचे मोठे पटांगण आहे तिथे बजार होता .हल्लीचे नाव सुळे बाजार आहे .