मराठी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण १
मराठी विकिपीडिया आणि त्याचे विकिस्रोत, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पांच्या माध्यमाने इतर भाषातील माहिती आणि ज्ञान मोठ्या प्रमाणात मराठीत अनुवादीत करून आणण्याची क्षमता आहे. यात चपखल आणि सुलभ मराठी शब्दांचा उपयोग व्हावा म्हणून शब्द संग्रहाची मोठीच गरज भासते. इतर ऑनलाईन शब्दकोश उपलब्ध असलेतरी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण विषयक माहिती आंतरजालावर अपवादानेच उपलब्ध असते. ऑनलाईन इतर शब्दकोशांची मराठीस उपलब्धता आहेच त्यामुळे मराठी विक्शन्ररी या शब्दकोश बंधूप्रकल्पात केवळ शब्दार्थांपेक्षा सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरणाचा आंतर्भाव करता आल्यास इतर मराठी विकिप्रकल्पांना आणि मराठी भाषेस अधिक फायदा होईल असा एक विचार आहे. मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून भाषाशास्त्र आणि व्याकरण या बाबतीतील प्रगत आणि अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी असाही विचार आहे.
याची सुरवात 'मी' या प्रथमपुरुषी सर्वनाम आणि सर्वनाम या लेखा पासून करू इच्छितो.
१) सर्वनाम हा मराठी विकिपीडियावरील लेख वाचा आणि समीक्षा करून सुधारणा सुचवा.
२) मराठी भाषेतील "सर्वनामांचा विभक्तिविचार" या बद्दल माहिती सांगा
३) मराठी भाषेच्या बोलीभाषातील सर्वनामांची माहिती द्या (जसे की : मराठवाडी, मालवणी, झाडीबोली, नागपूरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, बेळगावी, कोकणी, कोकणस्थी, आगरी, तंजावर, जुदाव, लेवा, चित्पावनी)
४) भारतातील आणि जगातील इतर भाषातील सर्वनामे या बद्दल तौलनिक वैशिष्ट्ये सांगा
५) मराठी विक्शनरी या ऑनलाईन शब्दकोशात 'मी' या प्रथमपुरुषी सर्वनाम असलेल्या लेखाची समीक्षा करून सुधारणा सुचवा.
६) "बाहेर थंडी 'मी' म्हणत होती", यातील मी या शब्दछटेचा अर्थ सांगा; मीपण तें बुडालें यातील मीपण या अर्थछटेचा अर्थ सांगा
७) 'मजला' या शब्दरूपाची विभक्ती द्वितीया असेल का ?
८) 'माझिया' या शब्दरुपाची विभक्ती शष्टी असेल का ?
९) मी या शब्दास वर नमुद केलेल्या मराठी बोली भाषांमध्ये इतर काही समानार्थी शब्द आहेत का ?
१०) इंग्रजी विक्श्नरी प्रकल्पातून जगातील इतर भाषातील समानार्थी शब्द उपलब्ध होतात पण ते त्यांच्या त्यांच्या लिपीत असतात, तुम्हाला माहित असलेल्या भारतीय अथवा आंतरराष्ट्रीय भाषांमधील 'मी' शब्दा करता समानार्थी शब्दांचे देवनागरी मराठीतील अक्षरांतरण उपलब्ध करा.
११) मी हा शब्द आणि जागतीक भाषातील समानार्थी शब्द लक्षात घेऊन प्रोटो हिस्टॉरीक शब्द व्युत्पत्ती आणि उच्चारणांबद्दल तुमचे काही विचार असल्यास त्यांचे स्वागत असेल. (जागतीक भाषांच्या व्युत्पत्तींचे डाटाबेस संकेतस्थळ दुवा)
* मराठी विकिपीडियावरील सर्वनाम लेखाचा दुवा
* मराठी विक्शनरी शब्दकोशातील 'मी' या शब्दकोशीय लेखाचा दुवा
* जे शब्द आणि वाक्ये सर्वनाम आणि मी या लेखात आहेत अथवा जाणार आहेत; शुद्धलेखन सुधारणा तेवढ्यापुरतीच सुचवाव्यात.
* आपले प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पात वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जाईल याची नोंद घ्यावी.
* आपल्या प्रतिसादांसाठी आणि शब्दकोश, भाषाशास्त्र आणि व्याकरणेतर विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वर बोली भाषांच्या यादीत
एका मराठी संकेतस्थळ सुविधेची माहिती हवी.
स्वागत.
प्रतिसादासाठी धन्यवाद
पटकन आठवलेले
सर्वनामेही भाषेत कमी असली तरी
>>कादोडी/सामवेदीत मी ला म्ये
मालवणीत कोंकणीप्रमाणे मला
ल चा क
पूर्वीही कधीतरी मी लिहिले
अनुषंगीक अवांतर: लोकसत्ताच्या
'क' चा फॉर्म असणारा
अह्म् आणि अझॆम
स्तुत्य
आपणही आवडी आणि सवडीनुसार
या धाग्यावर मिपावरील लोकांना
सहमत, ९०००च्यावर हिट्स असूनही
तू तू , मै मै...
विदर्भात सगळीकडे नाही, पण
अजून आठवेल तसे लिहीत जाईन.
झाडीबोलीबद्दल मी मागे वाचलं होतं.
मस्त मधुराताई.. अजून आठवेल
कोकणात बर्याच बोली आहेत. या
कोंकणी दिसतां!!
कोंकणी आहे ती
भौगोलिक कारण
कोंकणीच्या बोली
या धाग्यासाठी अंशतः अवांतर
व्यक्तिगत मतांचा इथे संबंध
संबंधित उपक्रम विकिपिडियाशी
माझ्या अनेक अस्मिता अचानक
हम्म, ते आहेच म्हणा. किमान
*शांत भाषाधारी अबोली, शांत या