Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by anagha kulkarni on Tue, 06/24/2014 - 15:54
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते. गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
  • Log in or register to post comments
  • 40361 views

प्रतिक्रिया

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 06/24/2014 - 15:58

Permalink

खर आहे तुमचं

>>ती बिचारी गोंधळून जाते हिचं अडचण आहे... बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Tue, 06/24/2014 - 15:58

Permalink

छान विषय

शिवाय स्त्रिया विरुद्ध पुरुष...१०० तरी नक्कीच
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 06/24/2014 - 16:03

In reply to छान विषय by राजेंद्र मेहेंदळे

Permalink

-१

अहो १०० ने काय होणार किमान ३०० धरुन चला... :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 16:05

Permalink

स्टिरिओटाईपला धक्का दिल्या

स्टिरिओटाईपला धक्का दिल्या बद्दल अभिनंदन..! बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत.. त्यामुळे त्यांचा खुप गोंधळ उडतो रस्त्यावर हे खरंय... पण पुरुष अत्यंत बेक्कार ड्राइव्ह करताना पाहिले आहेत.. बाईक नागमोडी डुलवत कट मारत जाणारे.. आपण मोठ्या गाडित बसलो म्हणजे बाकीचे सगळे किडे मुंग्या समजुन वाट्टेल तशी गाडी चालवणारे.. कारण नसताना हॉर्न वाजवणारे.. रिक्षावाले (इथे काही वर्णनाची गरजच नाही).. सिग्नल तोडणारे.. बहुतांशी पुरुषच असतात.. आणि कदाचित असंही असेल की ह्याचा बायकांना जेवढा त्रास होतो तेवढा इतर पुरुषांना होत नाही / नसावा..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 06/24/2014 - 16:18

In reply to स्टिरिओटाईपला धक्का दिल्या by पिलीयन रायडर

Permalink

बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग

बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत
याची पाटी लावायची काय??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 16:29

In reply to बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग by टवाळ कार्टा

Permalink

लावा की.. माझ्या पप्पांचं काय

लावा की.. माझ्या पप्पांचं काय जातय..!! आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी.. पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 06/24/2014 - 16:45

In reply to लावा की.. माझ्या पप्पांचं काय by पिलीयन रायडर

Permalink

प्रतिसादाची 'पाटी टाकणे'.

आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 16:51

In reply to प्रतिसादाची 'पाटी टाकणे'. by एस

Permalink

ड्रायवर हे चांगले ड्रायवर

ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा
. तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे.. ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 06/24/2014 - 17:27

In reply to ड्रायवर हे चांगले ड्रायवर by पिलीयन रायडर

Permalink

वैयक्तिक टीका.

माझेच वाक्य मलाच लक्षात ठेवायला सांगून आपण मी सोयीप्रमाणे भूमिका बदलणारा आहे असे ध्वनित केले आहे. माझे मिपावरील कुठलेही लेखन/प्रतिसाद वाचून मी असे काही केल्याचे दाखवून द्या असे मी आपणांस विनम्र आव्हान देत आहे. माझ्या तुम्ही उद्धृत केलेल्या प्रतिसादातही जास्तीत जास्त समतोलपणा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तसेही जर प्रश्न संपल्याचे तुम्हांला मान्य होते तर मग पुन्हा
तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..
ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 17:36

In reply to वैयक्तिक टीका. by एस

Permalink

ओ तुम्ही बरे आहात ना...

ओ तुम्ही बरे आहात ना... तुम्हाला काय जोक बिक कळतो की नाही? कसले डोंबलचे स्कोर सेटलिंग* आणि नम्र आव्हानं... टाईमपास करतेय मी.. बाकी तुम्ही भुमिका बदला न बदला.. (परत एकदा) माझ्या पप्पांचं काहीही जात नाही.. त्यामुळे असलं काही मला म्हणायचही नाही.. पण असोच.... फकत तुमचा असा प्रतिसाद पाहुन अमंळ आश्चर्य वाटले हे जाता जाता सांगुन ठेवते.. (ह्यातुन तुमच्या बद्दल काहीही ध्वनित वगैरे करायचं नाहीये.. नोंद घेणे) * - (आणि तुमच्याशी कशाला ब्वॉ?? आपण तर तुम्हाला इज्जतीत नेहमी चांगलेच प्रतिसाद दिलेत..)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 06/24/2014 - 17:43

In reply to ओ तुम्ही बरे आहात ना... by पिलीयन रायडर

Permalink

हा जोक आहे? ठीक आहे मग.

हा जोक आहे? ठीक आहे मग. माझ्या गैरसमजाबद्द्ल मी आपली माफी मागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 17:48

In reply to हा जोक आहे? ठीक आहे मग. by एस

Permalink

मागाच माफी तुम्ही. जोक

मागाच माफी तुम्ही. जोक करण्याचा हक्क सर्वांना नाहीये.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 06/24/2014 - 17:52

In reply to मागाच माफी तुम्ही. जोक by बॅटमॅन

Permalink

ऑरवेल साहेबांच्या त्या

ऑरवेल साहेबांच्या त्या प्रसिद्ध वाक्याची आठवण झाली.
All animals are equal, but some animals are more equal than others.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 17:55

In reply to ऑरवेल साहेबांच्या त्या by धन्या

Permalink

अगदी अगदी.

All are equal, but some are more equal. Similarly: All are chauvinist, but only a few get to parade their chauvinism as being rational.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 06/24/2014 - 17:58

In reply to अगदी अगदी. by बॅटमॅन

Permalink

All are chauvinist, but only

All are chauvinist, but only a few get to parade their chauvinism as being rational.
=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 06/24/2014 - 18:46

In reply to All are chauvinist, but only by अनुप ढेरे

Permalink

असेच म्हणतो

all मिपाकर्स are equal but some मिपाकर्स are more equal ! =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:48

In reply to असेच म्हणतो by प्रसाद गोडबोले

Permalink

इंडीड!!!!

इंडीड!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 17:54

In reply to मागाच माफी तुम्ही. जोक by बॅटमॅन

Permalink

काय म्हणायचय काय नक्की?

काय म्हणायचय काय नक्की? आणि बादवे.. झालेत हं आमचे गैरसमज दुर.. उगा काड्या लावु नकात..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 17:57

In reply to काय म्हणायचय काय नक्की? by पिलीयन रायडर

Permalink

आम्हीअन काड्या लावणार? भलतंच?

आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? अहो औकात तरी आहे का आमची तेवढी? आम्ही आपले साधे शॉव्हिनिस्ट आहोत ओ. आमची तेवढी लायकी नाही ओ.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 18:00

In reply to आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? by बॅटमॅन

Permalink

लायकी नाही बद्दल सहमत..

लायकी नाही बद्दल सहमत.. शॉव्हिनिस्ट बद्दल अंशतः सहमत.. "साधे" बद्दल असहमत..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:02

In reply to लायकी नाही बद्दल सहमत.. by पिलीयन रायडर

Permalink

चला, मिपावरील 'मोर ईक्वल'

चला, मिपावरील 'मोर ईक्वल' कडून पावती मिळाल्याचे पाहून डॉळे पुनरेकवार निवले.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 18:07

In reply to चला, मिपावरील 'मोर ईक्वल' by बॅटमॅन

Permalink

लेस इक्वलला असं कधी मधी गाजर

लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!! बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!! लगे रहो..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:11

In reply to लेस इक्वलला असं कधी मधी गाजर by पिलीयन रायडर

Permalink

लेस इक्वलला असं कधी मधी गाजर

लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!
त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!
ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Tue, 06/24/2014 - 19:20

In reply to लेस इक्वलला असं कधी मधी गाजर by पिलीयन रायडर

Permalink

(No subject)

*biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by होकाका on Wed, 06/25/2014 - 11:40

In reply to चला, मिपावरील 'मोर ईक्वल' by बॅटमॅन

Permalink

George Orwell च्या Animal

George Orwell च्या Animal Farm मधल्या "... some are more equal" या वाक्याचा चुकीचा अर्थ बरेचदा लावला जातो. इथे more equal चा अर्थ आहे people who are not special at all -- they are "more equal". या उलट, "Less equal" means "people with some (special) difference". बाकी चालू द्या ध्धम्माल.... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by होकाका on Wed, 06/25/2014 - 11:20

In reply to बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग by टवाळ कार्टा

Permalink

~पाटी~

@ टवाळ कार्टा ही घ्या पाटी: As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!" "Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/25/2014 - 16:07

In reply to ~पाटी~ by होकाका

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 16:06

Permalink

मी असा नाही म्हणत आहे स्त्री

मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,
शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले. अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 06/24/2014 - 16:09

In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन

Permalink

हा हा हा

=))
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 06/24/2014 - 16:15

In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन

Permalink

बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला

बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी. पहिल्यापासून असाच तेजस्वी. पुरूषजातीवर अन्याय झाल्याची शंका जरी आली तरी उसळून भांडायला उठे. पुरूष ही "जात" नव्हे हे मी त्याला एकदा असंबद्ध आणि तुटक तुटकपणे सांगत असताना नेमके हेडसर आले आणि "जातीवरून बोलते" म्हणून माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Tue, 06/24/2014 - 16:23

In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ

Permalink

नमस्कार पोपा मॅडम...

कहर... फुटलो. *lol* @बॅटमॅन -_/|\_
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 16:57

In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ

Permalink

पोतदार-पावसकर म्याडमचा विजय

पोतदार-पावसकर म्याडमचा विजय सो =)) _/\_ =)) _/\_ =)) _/\_ =))
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 06/24/2014 - 18:00

In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 06/25/2014 - 05:45

In reply to बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला by आदूबाळ

Permalink

"जातीवरून बोलते"

"जातीवरून बोलते"
आदुबाळ हि स्त्री आय डी कि पुरुष आय डी ?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 06/25/2014 - 20:10

In reply to "जातीवरून बोलते" by खटपट्या

Permalink

--

आपण काय नाड्या चेक कर्णार काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 06/25/2014 - 20:35

In reply to -- by वपाडाव

Permalink

वप्या, चक्क तू? अत्तर संपले

वप्या, चक्क तू? अत्तर संपले काय?
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 06/25/2014 - 23:01

In reply to -- by वपाडाव

Permalink

अहो, स्री आयडी असेल तर ताई

अहो, स्री आयडी असेल तर ताई बोलेन. पुरुष आयडी असेल तर दादा म्हणेन. बाकी काय करणार आम्ही. मला माझी स्वतःची नाडी बघायची आहे (शशिकांत काका कडे)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 16:25

In reply to मी असा नाही म्हणत आहे स्त्री by बॅटमॅन

Permalink

ए तू अपर्णा रामतीर्थकर

ए तू अपर्णा रामतीर्थकर नावाच्या बाईंची भाषणं ऐक.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईचंही ऐकतात.. बायकोचंही ऐकतात.. बहीणीचही ऐकतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या मनात काहिही भरवुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते ऐकतात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. तुमच्या पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 16:57

In reply to ए तू अपर्णा रामतीर्थकर by पिलीयन रायडर

Permalink

ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक

ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक आहेत. त्या आपल्या नवर्‍याला बहुधा म्हणत असाव्यात, "तू मला धाकात ठेव. नै ठेवलास तर याद राख, मारच खाशील माझ्याकडून. मी तुला नेहमी भिऊन राहीन. नै राह्यले तर बघच मग तू!!"
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 16:58

In reply to ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक by बॅटमॅन

Permalink

आई ग्ग!!!! खतरनाक!!!!

आई ग्ग!!!! खतरनाक!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Tue, 06/24/2014 - 19:15

In reply to आई ग्ग!!!! खतरनाक!!!! by पिलीयन रायडर

Permalink

अरारारा ...

अरारारा ... या एका (हिंसक) व्हिडोसारखा प्रसंग डोळ्यासमोर आला.. *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 06/24/2014 - 18:00

In reply to ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक by बॅटमॅन

Permalink

मस्तच.

'I am the boss of my house and I (even) have my wife's permission to say so."
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:03

In reply to मस्तच. by राही

Permalink

हा हा हा, सहीच!!

हा हा हा, सहीच!!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 06/25/2014 - 00:25

In reply to ए तू अपर्णा रामतीर्थकर by पिलीयन रायडर

Permalink

:)

हे घ्या उदाहरणादाखल एक भाषण! एव्हढे सांगून (पुढे काहीच सांगण्यासारखे न राहील्याने) मी माझा प्रतिसाद संपवतो! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 06/25/2014 - 14:16

In reply to ए तू अपर्णा रामतीर्थकर by पिलीयन रायडर

Permalink

अपर्णा रामतीर्थकर

<< अपर्णा रामतीर्थकर >> असहमत . लव जिहाद या विषयावर त्यांचे विचार ऐकले होते . अप्रतिम . फार झोंबणारे खरे बोलत होत्या त्या. बाकी चालू द्या !
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 06/25/2014 - 14:23

In reply to अपर्णा रामतीर्थकर by विटेकर

Permalink

ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच

ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच भाषण ऐकलं.. दिड तासाचं होतं.. पैकी मी ४५ मिनिटं ऐकु शकले.. नंतर माझं डोकं उठलं.. बाईंकडे चांगलं बोलण्याची कला आहेच.. पण "स्त्री" ह्या विषयावर जे काही बोलल्या, ते अतिरेकी होतं हे नक्की.. असो.. हा विषय एका शतकी धाग्याचा आहे.. कशाला इथे वाया घालवा!!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 06/25/2014 - 15:18

In reply to ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच by पिलीयन रायडर

Permalink

जनरली स्त्री या विषयावर

जनरली स्त्री या विषयावर जालावरही चर्चिले जाते ते अतिरेकीच असते. कदाचित रामतीर्थकर बाईंच्या विरुद्ध पण अतिरेकी तर्‍हाच. परंतु तुम्ही असो म्हणून आम्हीही असो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Wed, 06/25/2014 - 15:27

In reply to जनरली स्त्री या विषयावर by llपुण्याचे पेशवेll

Permalink

सुवर्णमध्य कुणाला साधलाय

सुवर्णमध्य कुणाला साधलाय पेशवे?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/25/2014 - 15:30

In reply to सुवर्णमध्य कुणाला साधलाय by पिलीयन रायडर

Permalink

सोनाराला.

सोनाराला.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 06/25/2014 - 20:11

In reply to सोनाराला. by बॅटमॅन

Permalink

"जातीवरून बोलतो"

"जातीवरून बोलतो"
असे तुम्हाला का म्हणू नये ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com