✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नियती ...

य
यश पालकर यांनी
गुरुवार, 06/19/2014 - 13:04  ·  लेख
लेख
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट नियतीच्या खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं.कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील .... यशवंत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
11963 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

नियती कधी कशी वागेल?

आयुर्हित
गुरुवार, 06/19/2014 - 13:12 नवीन
नियती म्हणजे काय? नियती कधी कशी वागेल? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर क्रुपया "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचावे.
  • Log in or register to post comments

एक मिपाकर

हाडक्या
गुरुवार, 06/19/2014 - 16:07 नवीन
तुमच्याकडे मधुमेहापासून नियतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे असलेली पाहून फार्फार कवतिक वाटतं. एक मिपाकर म्हणून तुमचा आमाला अभिमान वाटतो.! *biggrin* (ऊर भरून येतो.. मान उंचावते.. इत्यादि इत्यादि बाकी घ्या समजून. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

अहो भगवंतानी स्वतः मिपावरील

बाळ सप्रे
Fri, 06/20/2014 - 15:45 नवीन
अहो भगवंतानी स्वतः मिपावरील अवताराचे कारण इथे सांगितले आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अर्रेच्च्या!! हे तर आमी

हाडक्या
Tue, 06/24/2014 - 17:38 नवीन
अर्रेच्च्या!! हे तर आमी पायलेच नव्हते च्यामायला ..!! ('एक डाव भटाचा' रिक्षावाला ईश्टाईल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

Whats the Point?

प्रसाद१९७१
गुरुवार, 06/19/2014 - 13:58 नवीन
Whats the Point?
  • Log in or register to post comments

अहो.. सुप्राकॉन्शसच्या

गवि
गुरुवार, 06/19/2014 - 14:04 नवीन
अहो.. सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरुन ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना.. बरं का.. नाही.. तुम्ही "इन ट्यून विथ द ट्यून" वाचाच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

वो गवि

विटेकर
गुरुवार, 06/19/2014 - 14:19 नवीन
ते कॉस्मॉस म्हंजे काय हो ? नै आमाला किस्मीस माहीती आहे ..आणि "इन ट्यून विथ द ट्यून" या पुस्तकाचा लेखक कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गुरुदेव!

आदूबाळ
गुरुवार, 06/19/2014 - 15:01 नवीन
गुरुदेव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून

बॅटमॅन
गुरुवार, 06/19/2014 - 15:04 नवीन
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच...अन हा ब्रदर अरुणाचलम-बोगस माणूस आहे साहेब-पण गुरुदेवांचा गाववाला पडला. सगळीकडे वशिलेबाजी आहे!!!! बाकी कायकिणी गोपाळरावांनी नंतर समाधीतून जागं केलं की नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे पुस्तक कुणाचे आहे?

धन्या
गुरुवार, 06/19/2014 - 16:13 नवीन
हे पुस्तक कुणाचे आहे? कशाबद्दल आहे? कुठे मिळेल? गुगलला सपडत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>हे पुस्तक कुणाचे आहे?

सूड
गुरुवार, 06/19/2014 - 16:38 नवीन
>>हे पुस्तक कुणाचे आहे? अहो कुणाचं आहे म्हणजे काय? मीच लिहीलंय. एकदा गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिहा !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माझं नाव प्रोफेसर भगवते.

बॅटमॅन
Fri, 06/20/2014 - 14:18 नवीन
माझं नाव प्रोफेसर भगवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=)) धनाजीराव _/\_ व्यनि पहा.

बॅटमॅन
Fri, 06/20/2014 - 14:17 नवीन
=)) =)) =)) धनाजीराव _/\_ व्यनि पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आपला व्यनि मिळाला. वाचून आनंद

धन्या
Fri, 06/20/2014 - 15:14 नवीन
आपला व्यनि मिळाला. वाचून आनंद झाला. धन्यावाद. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ये "इन ट्युन विथ द ट्युन" नही

बाळ सप्रे
Fri, 06/20/2014 - 15:35 नवीन
ये "इन ट्युन विथ द ट्युन" नही जानता !! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अब बच्चेकी जान लोगे क्या?

धन्या
Fri, 06/20/2014 - 15:41 नवीन
अब बच्चेकी जान लोगे क्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हिमोग्लोबिन इन द अ‍ॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!

तुषार काळभोर
गुरुवार, 06/19/2014 - 14:28 नवीन
यू सी द को-इफिशियंट ऑफ द लिनीयर इज जक्स्टापोझिशन्ड बाय द हिमोग्लोबिन इन द अ‍ॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!
  • Log in or register to post comments

या वाक्यासाठी प्रणाम

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 06/20/2014 - 15:30 नवीन
१० वेळा वाचले तरी डोक्यावरुन गेले...कुठुन उचल्लेय? ( कृपया अभ्यास वाढवा म्हणु नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

माय नेम इज ...... ...... मैं दुनिया में अकेला हूं...

मैत्र
Fri, 06/20/2014 - 15:34 नवीन
आता पूर्ण गाणं लिहिलं तर मजा जाईल ब्वा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

बहुधा

बॅटमॅन
Fri, 06/20/2014 - 15:35 नवीन
३ मूर्ख?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

आयला हे माहित नाही???

टवाळ कार्टा
Sat, 06/21/2014 - 12:40 नवीन
आयला हे माहित नाही???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

३ बाटल्या रक्त...

तुषार काळभोर
Fri, 06/20/2014 - 16:54 नवीन
३ बाटल्या रक्त... मिलना-बिछडना-मिलना ढिश्युम् ढिश्युम् सुपरस्टार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

चला सांगुनच टाकतो..

बाळ सप्रे
Fri, 06/20/2014 - 17:02 नवीन
चला सांगुनच टाकतो.. माय नेम इज अँथनी गोन्सालवीस....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

साफ चूक

विटेकर
गुरुवार, 06/19/2014 - 14:56 नवीन
ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य ......... साफ चूक ! मना त्वाचि रे पूर्वसंचित केले | तयासारखे भोगणे प्राप्त झाले || संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत " आमेन!
  • Log in or register to post comments

संचित म्हणजे काय ? वाचा "

धन्या
गुरुवार, 06/19/2014 - 15:40 नवीन
संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत "
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही. बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

@बाकी हीराभाई ठक्कर यांचे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/19/2014 - 18:52 नवीन
@बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो. >>> अगदी अगदी...! माझ्यासारख्या आळशी माणसाला,स्वतःला प्राप्त झालेल्या दु:ख्खांना अनेक बचावात्मक आणि काल्पनिक गोष्टींना हताशी धरून वाट द्यायला मिळते! लबाड्या लपवायचा चान्स मिळतो. फक्त एकदा असं झालं,की- जे काहि होत आहे,ते गेल्या जन्मीच्या कर्माचं फळं आहे.या मझ्या समजुतिमुळे मी माझ्या मित्राच्या खिशातनं त्याला न विचारता पेन घेतलं. त्यावर तो निर्बुद्ध माणूस , चोर..चोर असे ओरडला! मी त्यास म्हणालो,अरे मित्रा-ही चोरी नाही..हे फक्त कर्म-फलित आहे. तुझ्या नशिबात होतं पेन चोरिला जावं.माझ्या नशिबात होतं,मी ते चोरावं. तेंव्हा..तक्रार करू नकोस..हे आपल्या दोघांच्याही गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. तेंव्हा ते गपचूप खा बरं!!! त्यावर त्यानी माझ्याकडून पेन हिसकाऊन घेतलं,आणि मला एक चापट मारून म्हणाला- हे ही आपल्या दोघांच्या गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे! मग मात्र मला त्या दुष्ट माणसापुढे काहिच बोलता येइ ना! :-/ हे ही "गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ!" आता मी या सगळ्या फळांचं फ्रुटसॅलेड तयार करून भगवंताला पुढं जाणार आहे. आणि,त्याच्या फळांचा त्यालाच नैवेद्य दाखवून, जाब विचारणार आहे.... अर्थातच माझ्या गेल्या जन्मात असं काहि माझ्या हातून घडण्याचं कर्म,मी केलं असेल तर........................आणि तरच...........................!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कोण नियती ?

सस्नेह
गुरुवार, 06/19/2014 - 15:16 नवीन
पाठीमागच्या अपार्टमेंट्च्या चौथ्या माळ्यावरच्या चिकनिसांची मधली कार्टी ? असेल बै ! ती जरा आगावच आहे . काय करेल सांगता येत नाही ! *wink*
  • Log in or register to post comments

चिकनीस???

बॅटमॅन
गुरुवार, 06/19/2014 - 15:19 नवीन
चिकनीस??? नक्की आडनाव आहे की "प्रेयसीस पत्र" सारखे "चिकनीस" असे नाव दिलेय =)) तदुपरि आगाव हा शब्द अगदी बोलीभाषेतल्यागत लिहिला म्हणताना बरं वाटलं. :) (दक्षिणमहाराष्ट्रदाक्षिण्यवादी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ते टंचनिकेसारखं चिकनिस पण

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/19/2014 - 15:55 नवीन
ते टंचनिकेसारखं चिकनिस पण चालौन घेउ की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी

बॅटमॅन
Fri, 06/20/2014 - 14:16 नवीन
हा हा हा, अगदी अगदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आगव असली म्हणुन काय झाली..

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/19/2014 - 15:20 नवीन
आगव असली म्हणुन काय झाली...मला लवशिप देणारै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हे सगळं नियती करते?

धन्या
गुरुवार, 06/19/2014 - 15:31 नवीन
हे सगळं नियती करते? मी तर ऐकलं होतं की जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते. त्यापुढचे सारे सटवीच्या लेख्याप्रमाणे घडते.
  • Log in or register to post comments

काहीच

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 06/19/2014 - 15:51 नवीन
काहीच कळले नाही रे यशा. रिश्तोंके भंवर में उलझी नियती ही सिरियल मी नियमीत् बघायचे हो.
  • Log in or register to post comments

अवांतर

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/19/2014 - 15:57 नवीन
वाऱ्यासारख
कसं लिहायचं हो ? मी लिहायला गेलो तर "वा-यासारखं" असं होत आहे.
  • Log in or register to post comments

वार्‍या = vaaRyaa

धन्या
गुरुवार, 06/19/2014 - 16:03 नवीन
वार्‍या = vaaRyaa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद धन्या ...

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/19/2014 - 16:26 नवीन
धन्यवाद धन्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धन्यवाद मागे घेतो

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/19/2014 - 16:31 नवीन
अहो नाही होत हे बघा : vaaRyaa चं वार्‍या होतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अर्... माफ करा...

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/19/2014 - 16:33 नवीन
typing window मध्ये वेगळं आणि पोस्ट केल्यावर वेगळं !! मिपा धन्य आहे. मागे घेतलेला धन्यवाद पुन्हा देतो हं *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

ओ भौ

पैसा
गुरुवार, 06/19/2014 - 17:58 नवीन
तुम्ही लिनक्स वापरताय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

काकू, माझ्या माहितीप्रमाणे IE

सूड
गुरुवार, 06/19/2014 - 19:16 नवीन
काकू, माझ्या माहितीप्रमाणे IE मध्ये 'र्‍या' दिसतोय आणि Google Chrome मध्ये '-या'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे काय आणखी?

पैसा
गुरुवार, 06/19/2014 - 20:31 नवीन
तू टाईप केलेले दोन्ही मला 'र्‍या' असेच दिसतायत. ते सांगतायत तो पायमोडका 'र्' स्पेसल लिनक्समधे टाईप केला असेल तर दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>पायमोडका 'र्' स्पेसल

सूड
गुरुवार, 06/19/2014 - 21:15 नवीन
>>पायमोडका 'र्' स्पेसल तांच म्हणतांय गे मिया. माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा नि क्रोमात '-या'!! (हो '-या' मियां हायफन देवान लिवलोहां). :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोंती भाषा बे ही

बॅटमॅन
Fri, 06/20/2014 - 17:47 नवीन
तांच म्हणतांय गे मिया
आता हा गे मिया कोण?
माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा
अँड आय थॉट थेअर इज़ ओन्ली हडपसर इन पुणे.
मियां हायफन देवान लिवलोहां
मियां एकदम "हाय फन" आहे हे कळ्ळं , पण पुढं देव कुठनं आला 'मरे' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फोडला की रे ब्याट्या...

वपाडाव
Sat, 06/28/2014 - 09:14 नवीन
फोडला की रे ब्याट्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शिरां पडो

पैसा
Sat, 06/28/2014 - 09:20 नवीन
ही मालवणी कळणां नाय तुका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

yes BOSS

मराठी कथालेखक
Fri, 06/20/2014 - 14:59 नवीन
BOSS (Bharat Operating System Solutions) अशी काहीतरी सरकारी लिनक्स आहे जी उबंटू प्लॅटफॉर्म ला C-DAC ने बनवलीये. त्यात मी chrome टाकू शकलो नाही. फक्त Firefox आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

????

तुषार काळभोर
गुरुवार, 06/19/2014 - 16:33 नवीन
vaaRyaa चं वार्‍या होतंय >>> vaaRyaa चं "वार्‍या " नाही, तर काय टार्‍या होईल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

तुमच्याकडे वारा जोर्रात वाहात

कवितानागेश
गुरुवार, 06/19/2014 - 16:25 नवीन
तुमच्याकडे वारा जोर्रात वाहात असेल. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

हो ना.. हाफिसात एसी नसल्याने

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/19/2014 - 16:27 नवीन
हो ना.. हाफिसात एसी नसल्याने पंखा आणि कुलर फुल स्पीड पळवत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कर्माचा सिद्धांत ह्या

म्हैस
गुरुवार, 06/19/2014 - 16:22 नवीन
कर्माचा सिद्धांत ह्या पुस्तकात लेखकाने इकडून तिकडून वाचलेले किवा स्वताचे opinions टाकलेले आहेत. कर म्हणे मारताना तो माणूस त्याच्या मुलाला नारायण नारायण अश्या हाक मारत होता म्हणून त्याला मुक्ती मिळाली. मागच्या जन्मातली माणसं ह्या जन्मात प्राण्यांच्या स्वरुपात तुमच्या समोर आली तर त्याला तुम्ही मिठी मारली असती वगेरे . कैच्या काही.
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही.
ते माहित नसण्याचं कारण असं आहे कि , कुठल्या कृत्याबद्दल काय शिक्षा होतीये किवा कुठल्या कृत्याचं काय बक्षीस मिळतंय हे समजलं असतं तर माणसं बक्षिसाच्या लोभाने किवा शिक्षेच्या भीतीने कर्म करत राहिली असती . ज्याला काहीही अर्थ नाहीये . एखादी गोष्ट शिक्षेच्या भीतीने न करण आणि मुळातच प्रेम , करुणा ह्या गुणांमुळे न करण ह्यात फरक आहे . दुसरी गोष्ट म्हणजे जन्मोजन्मीची प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या लक्षात राहिली असती तर त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ माजला असता. त्याच त्याच आठवणींमुळे जीवन खूप कठीण झाला असतं. म्हणून विस्मृती हि माणसाला मिळालेली देणगी आहे .
जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते
ते काही माहित नाही. पण हे नशीब आपल्याच पुर्वकर्माची फलं असतं
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा