पायाखालची रायगड जिल्ह्याची माती सुटून आता दहा वर्ष झाली मात्र त्या मातीचा सुगंध आजही मनात दरवळतोय.
असं वाटतं की शाळेत आपल्याला पुर्ण नांव सांगायला सांगितलं आहे आणि आपण नांव सांगून झाल्यानंतर एका दमात "मुक्काम वडगांव कोंड पोष्ट गोरेगांव तालुका माणगांव जिल्हा रायगड" असा पत्ता सांगत आहोत.
गावातून बाहेर पडून पूर्वेला तोंड करुन उभे राहीले की दूरवर समोर दिसणारा कावळे घाट आणि त्याच्या पाठीमागे दिमाखाने उभा असलेला छत्रपतींचा रायगड आजही नजरेसमोर तरळतो. लहानपणी आजीने सांगितलेली आख्यायिकाही आठवते. आमचे पोष्ट असलेल्या गोरेगांवाचे नांव म्हणे पूर्वी घोडेगांव होते. शिवरायांच्या घोडयांच्या पागा इथे असत म्हणे.
पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला नवी मुंबई आणि ठाणे, दक्षिणेला रत्नागिरी आणि सातारा आणि पूर्वेला पुणे जिल्हा अशा सीमा असलेल्या या जिल्ह्याचे नांव पूर्वी कुलाबा असे होते. बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याचे नांव बदलून रायगड असे ठेवण्यात आले.
जिल्ह्याचे वैशिष्टय असे की जिल्हयाच्या दक्षिणोत्तर तीन गोष्टी एकमेकांना जवळपास समांतर धावतात, पश्चिमेला अरबी समुद्राचा किनारा, पूर्वेला सहयाद्री पर्वतरांगा, आणि जिल्हयाच्या मधून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग. अपघातांसाठी देशभरात बदनाम असलेला हा राष्ट्रीय महामार्ग पूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ म्हणून ओळखला जायचा. नुकतेच याचा क्रमांक बदलून ६६ करण्यात आला आहे. शीव - पनवेल द्रुतगती मार्गाला जोडूनच पनवेलपासून सुरु होणारा हा महामार्ग दक्षिणेला कशेडी घाट ओलांडून रत्नागिरी जिल्हयात शिरतो. जिल्हयातून सहयाद्री पर्वत ओलांडून घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे जिल्ह्यात जाण्यासाठी तीन घाट रस्ते आहेत, खोपोली गावातून खंडाळ्याला जाणारा बोर घाट, माणगावातून पौडला जाणारा ताम्हिणी घाट आणि पोलादपूरवरुन भोरला जाणारा वरंधा घाट. या तिन्ही घाटात पावसाळ्यात निसर्ग मुक्त हस्ताने आपल्या सौंदर्याची उधळण करत असतो.
शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून छत्रपतींची राजधानी असलेला रायगड किल्ला महाड तालुक्यात आहे. बळळालेश्वराच्या पाली गावाच्या पाठीमागे भींतीसारखा उभा असलेला सुधागड सुंदर आहे. अलिबागच्या किनार्यापासून साधारण एक किलोमीटर आत समुद्रात असलेला कुलाबा हा जलदुर्ग, मुरुडच्या समुद्रातील जंजिरा हा किल्ला पर्यटकांना भुरळ घालत असतात.
हा जिल्हा पश्चिम किनारपट्टीवर चिंचोळया पट्टयाच्या स्वरुपात पसरला असल्याने जिल्ह्याच्या उरण, अलिबाग, मुरुड, तळा श्रीवर्धन या तालुक्यांना समुद्र किनारा लाभला आहे. दक्षिण काशी म्हणून शिवतीर्थ हरीहरेश्वर हे गांव आणि एकेकाळी सुवर्ण गणेशासाठी प्रसिद्ध असलेले दिवेआगर गांव श्रीवर्धन तालुक्यात आहेत. दिवेआगर गावातून उजव्या बाजूने शेखाडी गावावरुन श्रीवर्धनकडे जाणारा रस्ता आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देतो. हा रस्त्या अगदी समुद्र किनार्याला चिकटून जातो. सूर्यास्ताच्या वेळी हा रस्ता आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो. श्रीवर्धनकडे जाताना डाव्या बाजूला छोटे छोते डोंगर आणि उजव्या हाताला चिकटूनच खडकाळ समुद्रकिनार्यावर धडका देणार्या लाटा. ईतका सुंदर रस्ता महाराष्ट्रात दुसरा नसावा.
या जिल्हयाने देशाला चिंतामणी देशमुखांच्या रुपाने देशाला पहिले अर्थमंत्री दिले. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले आणि श्री. मनोहर जोशी हे रायगड जिल्ह्यामधलेच. सध्याचे जलसंपदा मंत्री श्री. सुनिल तटकरे हे रोहा तालुक्यातील कोलाड गावचे.
महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात माहिती असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ माणगांव तालुक्यातील लोणेरे या गावी आहे. १९८९ साली महाराष्ट्र शासनाने एका अधिनियमाने सुरु केलेले हे विदयापीठ तंत्रशिक्षणाची पंढरी असून इथे अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांमध्ये पदविका,पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच पी एचडी घेता येते. डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींशी निगडीत असणारे चवदार तळे विद्यापीठापासून वीस किमी अंतरावर महाड या छोटेखानी शहरात आहे.
जिल्हयाच्या उत्तर भागात प्रामुख्याने आगरी आणि कोळी बांधवांची वस्ती असून मध्य व दक्षिण भागात कुणबी, वैश्यवाणी तसेच इतर समाज आहेत. भात शेती हा ईथला प्रमुख व्यवसाय असून भातशेतीच्या जोडीला दुधाचा जोडधंदा केला जातो.
असा हा रायगड जिल्हा शेजारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारखे समृद्ध जिल्हे आणि शहरे सीमेवर असूनही काहीसा मागासच राहीला आहे.
वाचने
10378
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझ्याकडून रायगड जिह्यावर
रायगड किंवा एकुणच कोकणाबद्दल अजुन वाचायला आवडेल
+१
In reply to रायगड किंवा एकुणच कोकणाबद्दल अजुन वाचायला आवडेल by केदार-मिसळपाव
'रायगड जिल्ह्याची थोडक्यात
धागा टंकताना तोच उद्देश समोर
In reply to 'रायगड जिल्ह्याची थोडक्यात by प्यारे१
असे असेल तर सरकारी वृत्तांत
In reply to धागा टंकताना तोच उद्देश समोर by धन्या
धनाजीराव
In reply to असे असेल तर सरकारी वृत्तांत by प्यारे१
छान लेख
लेख अपुरा वाटला मला...:-(
तो श्रीवर्धनकडचा रस्ता आठवला
बाकी रायगड जिल्ह्यात अजूनही
In reply to तो श्रीवर्धनकडचा रस्ता आठवला by कवितानागेश
हे एवढचं?
सुरुवात वाचून तुझ्या
धन्या, लेख अजून थोडा मोठा हवा
आमच्या रायगड जिल्ह्याबद्दल
धन्या, सविस्तर लिही जरा.
सुरुवात छान केली. पण, लेख
आमचा सबंध रायगडशी गावी
वडखळ नाक्यावर वळल्यावर पुढे
In reply to आमचा सबंध रायगडशी गावी by खटपट्या
@असा हा रायगड जिल्हा शेजारी
म्हसळ्याचा बाह्यवळण रस्ता
In reply to @असा हा रायगड जिल्हा शेजारी by अत्रुप्त आत्मा
वाचत आहे...
काही तांत्रिक कारणामुळे आज
मान्य...
In reply to काही तांत्रिक कारणामुळे आज by धन्या
ओके...पण अजून लिही. पुभाप्र.
In reply to काही तांत्रिक कारणामुळे आज by धन्या
सुधागड -> सरसगड
माझी चुक...
In reply to सुधागड -> सरसगड by स्पार्टाकस
अपूर्ण
तुम्ही ट्रेकींगच्या
In reply to अपूर्ण by स्पार्टाकस
धन्यवाद आणि अभिनंदन...
रायगड जिल्हा
गाववाले सुंदर माहिती
लेख चांगला पण त्रोटक. अजून
वडघर
साने गुरुजींचं स्मारक मंदिर
In reply to वडघर by राही
शिरढोण
आणखी काही
चांगले आहे लिखाण.
हेच म्हनायला आलो होतो
In reply to चांगले आहे लिखाण. by चौकटराजा
लहाणपणी एकदा खरुज आली असताना
In reply to हेच म्हनायला आलो होतो by असा मी असामी
युसुफ मेहेर अली सेंटरhttp:/
इथली माझ्या आवडीची गो ग्रिन
जागु,आपल्या आवडीची गो ग्रीन
In reply to इथली माझ्या आवडीची गो ग्रिन by जागु
छान माहीती. अजून येऊद्या.
धन्या लेख अपुर्ण वाटलअ अरे...
आणखी लिही रे!
कविता
खरं आहे काका. आयुष्याची पहिली
In reply to कविता by चौकटराजा