पुन्हा पाऊस, पुन्हा तू...
पावसाने साद दिली
नाद त्यास तुझा होता
भिजलेली सर ओली
चिंब स्पर्श तुझा होता...
दाटलेले नभ वेडे
भाराने ओथंबले
थेंब आले सर सर सर
मृद्गंध तुझा होता...
मत्त गार गार वारा
देहावरती शहारा
लख्ख वीज लकाकली
भास त्यात तुझा होता...
मंद धुंद पावसात
भिजलेल्या तन-मनात
हुंकारला, आसुसला
श्वास, तो ही तुझा होता...
मस्त कविता
छान.
खुप छान कविता!
छान
धन्यवाद...
"भिज-लेल्या-तना-मनात"
व्वाह!
मस्त.
व्वाह!
खलास!