माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...
तुझ्या वेदनेला लागो ओढ माझ्या वेदनेची....
वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही..
सारे विसरून जाती , वेदना ते वर्म वाही..
डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे..
वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे...
साधू नाही, संत नाही, पाइक मी वेदनेचा...
अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा...
तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... १
तुझं.. माझं.. असं काही, असू नये वेदनेत..
तुझं जे माझंही तेच, सोसू बये वेदनेत..
अश्या सोसण्याने कमी, धार होते वेदनेची...
धगसुद्धा कमी थोडी फार होते वेदनेची...
तळहाती घ्यावे थोड्या, गार झाल्या वेदनेला...
सांत्वनावरती राणी, स्वार झाल्या वेदनेला..
तुझ्या आसवांना मिळो, तोड माझ्या वेदनेची... २
सांजवेळी तळ्याकाठी, गाऊ गाणी वेदनेची..
दुनियेला ऐकवू गं, ही कहाणी वेदनेची..
भरभरून उधळू, दोघं साठा वेदनेचा...
काट्यानं निघतो म्हणे, राणी काटा वेदनेचा..
काटेरी ह्या वाटेवर, खुलवू गं वेदनेला..
पंगू जरी झाली तरी, चालवू गं वेदनेला...
आता अशा वेदनेला, तुझ्या माझ्या विना कोण??
वेदना तिथे नांदते जिथे नांदते गं मौन..
दोघे चाखूया गं फळं, गोड माझ्या वेदनेची... ३
- चेतन दीक्षित….!
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी कथालेखक हा तुम्चाच आयडी
मराठी कथालेखक हा तुम्चाच आयडी काय?
त्या BDSM वाल्या कथेच्या कथेच्या पार्श्वभूमीवर ही वेदनेची कविता रोचक वाटली.
सुंदर लिहिलय.
सुंदर लिहिलय. :)
अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा...
तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची...
या ओळी आवडल्या.
सुंदर कविता
सुंदर कविता
छान
हे खासचं!
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
केवळ अप्रतिम !
केवळ अप्रतिम !
डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे..
वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे..
वाह्ह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Internet of Things
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1}
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2}
What does Verizon's AOL buy have to do with the internet of things?
Samsung takes another step into Internet of Things
Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
अप्रतिम .. वेदनेचे वेद ...
अप्रतिम ..
वेदनेचे वेद ...
सर्वांचे मनापासून आभार.. :)
सर्वांचे मनापासून आभार.. :)
अत्तिशय संपन्न !
अत्तिशय संपन्न !
आभारी आहे...
आभारी आहे...
कल्पना खूप सुंदर! आणि
कल्पना खूप सुंदर! आणि लिहिलीही झकास!वेदना शब्द खुपच जास्त आलाय त्यामुळे अगदी जरा मीठ जास्त व्हाव तस झाल मला. आगौपना करून शेवटचे कडवे परत लिहू का?
सांजवेळी तळ्याकाठी,गाऊ गाणी,
दुनियेला ऐकवु ग,कहाणी वेदनेची.
भरभरून उधळू,दोघं साठा प्रेमाचा,
काट्यांन ग निघतो काटा वेदनेचा.
काटेरी या वाटेवर,फुलवु ग रानफुले,
पंगु जरी झाली तरी चालवू वेदनेला.
ह्या वेदनेला सांग तुझ्या माझ्याविना कोण?
मौनाच्या अंगणी सखे,वाढेल हे झाड,
दोघं चाखुया ग गोड,फळं माझ्या वेदनेची.
(तुम्ही लिहलेली कविता सुंदर आहेच. त्यामुळे हा प्रतिसाद खुप सिरियसली नका घेऊ. :) )
खूप आभारी आहे
In reply to कल्पना खूप सुंदर! आणि by रातराणी
रातराणीजी … खूप आभारी आहे… एक वेगळा प्रयत्न करून पाहिला होता… ही कविता मूलतः रंगमंचीय आहे… त्यामुळे सादर करताना प्रतिसाद छान मिळतो….
अफाट्ट्ट्ट
_/\_
आभारी आहे.... :)
आभारी आहे.... :)
आवडली..
आवडली..