मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल
लेखनविषय:
काव्यरस
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे
माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 -----
आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले ,
माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले ,
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 --------
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे
माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 --------
काही करू पहाता विपरीत होत आहे ,
माझे मला न उमगे का हे असेच होते
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------- 4 --------
माझ्या मनात आता सल एक वाहताहे ,
प्राषुन दु:ख सारे अंमृत वर्षताहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------5 --------
माझाच पोसलेला मी एक मात्र आहे
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ---- 1 ------
डॉ . दत्ता फाटक .
वाचने
1741
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
छान
In reply to छान by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
माफ करा
In reply to छान by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
हम्म
त्यात 'आयुष्य ओघळोनि मी रिक्त
In reply to त्यात 'आयुष्य ओघळोनि मी रिक्त by कवितानागेश
खरंतर मला
तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बगदाद धोक्यात